Breaking News
Home / मनोरंजन / अंकिता राऊतने पार्टीमध्ये केला हटके डान्स, पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

अंकिता राऊतने पार्टीमध्ये केला हटके डान्स, पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

आपली टीम नेहमीच विविध विषयांवर लेखन करत असते. तरीही यातील काही विषय हे वारंवार येत असतात. जसे की वायरल व्हिडियोज, उदयोन्मुख कलाकारांवरील लेख इत्यादी. कारण आम्हाला त्यांवर लिहायला आणि आपल्याला वाचायला आवडतं. यापैकी आज आपण जो लेख वाचणार आहात तो एका उदयोन्मुख कलाकाराविषयी आहे. चला तर मग जाणून घेऊयात या कलाकाराविषयी.

ह्या कलासक्त व्यक्तिमत्वाचं नाव आहे अंकिता राऊत. होय, आपल्या पैकी बहुतांश जणांनी हे नाव ऐकलेलं असेल. कारण अंकिताजी यांनी अवघ्या काही वर्षात स्वतःच्या नृत्याने आणि अभिनयाने स्वतःचा खास असा ठसा प्रेक्षकमनावर उमटवला आहे. आपल्यापैकी बहुतेकांसाठी त्या एक उत्तम नृत्यांगना आहेत. आपण त्यांना झी युवा वरील ‘अप्सरा आली’ या डान्स रियालिटी शो मध्ये नृत्य करताना बघितलं असेलच. एवढंच कशाला अहो, नुकताच त्यांचा एक भन्नाट डान्स व्हिडियो खूप वायरल झाला होता. आपण तो ही बघितला असेल.

तो व्हिडिओ सुरू होतो तेव्हा आपल्याला अंकिताजी मित्र मैत्रिणींच्या गराड्यात उभ्या असलेल्या दिसतात. एखाद्या समारंभात त्या उपस्थित असलेल्या दिसून येतात. मग सुरू होतं ते गाणं – ‘आयो रे मारो ढोलना’. हे गाणं किती उर्जावान आहे हे आपण सगळेच जण जाणतो. एवढा वेळ मंद म्युझिक वर हलके हलके डान्स करणाऱ्या अंकिताजी एकदम जोशात नाचायला सुरुवात करतात. त्यांच्या डान्स स्टेप्स एवढ्या अचूक असतात की आपल्याला एखादं राजस्थानी नृत्य पाहतो आहोत की काय हा भास होतो. तसेच त्यांची ऊर्जा एवढी असते की त्यांच्या पाठी असलेले सगळेच त्यांच्या डान्समुळे आनंदी असलेले दिसून येतात. नंतर तर सगळी मित्रमंडळीच त्यात सामील होतात आणि हा व्हिडियो संपतो. सोबत लोकप्रिय गायक प्रशांत नाकटी हे सुद्धा काही वेळासाठी डान्स करताना दिसतात. सोबतच बाजूला ‘गर्लफ्रेंड नसताना’, ‘माझी बाय गो’ गाण्याची स्टार श्रद्धा पवार हि लोकप्रिय अभिनेत्री आणि लोकप्रिय गायिका सोनाली सोनावणे ह्या सुद्धा दिसत आहेत.

अवघ्या चाळीस सेकंदांचा हा व्हिडियो खूप आनंद देऊन जातो. त्यांच्या नृत्याचे आविष्कार आपण ‘अप्सरा आली’ प्रमाणेच अनेक म्युझिक व्हिडियोज मधून पाहिले आहेतच. वेसावची पारू हे याचं उत्तम उदाहरण असेल. जवळपास पन्नास लाख लोकांनी आजतागायत हा व्हिडियो पाहिला आहे. तसेच पावसाच्या सरिमंदी,नाव डोलतय गो, पिरतीचं गाव, लव मॅशअप ही काही उल्लेखनीय उदाहरणं. यातील लव मॅशअप ला तर साठ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. डान्सच्या क्षेत्रात एवढं उत्तम काम करत असताना त्यांनी अभिनित केलेल्या शॉर्ट फिल्म्सची ही चर्चा झाली आहेच. काया ही त्यांनी अभिनित केलेली अगदी नवीकोरी शॉर्ट फिल्म आहे. तिलाही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. तसेच आपला लाडका दादूस असणाऱ्या विनायक माळी याच्या सोबत ही त्यांनी वेबसिरीज केलेली आहेच. अभिनय, नृत्य यात अगदी मुशाफिरी करणाऱ्या अंकिता या उत्तम निवेदिका सुद्धा आहेत. पाच पैकी पाच या युट्युब कार्यक्रमात त्या सहनिवेदीका आहेत.

या कार्यक्रमातून आपल्याला अलिबाग मधील प्रसिद्ध खाद्यस्थळ बघता येतात. आता युट्युबचा विषय निघाला आहेच तर त्यांनी अभिनित केलेल्या रिल्स तर आपल्या लक्षात असतीलच. एकूणच काय तर अंकिता या अष्टपैलू कलाकार आहेत हे नक्की. तसेच त्या सातत्याने विविध माध्यमातून कार्यरत असल्याचं दिसून येतं त्यामुळे अगदी कमी वयातही त्यांनी मोठ्याप्रमाणात आणि उत्तम काम केलेलं दिसून येतं. याचमुळे आमच्या टीमला असं मनापासून वाटलं की अंकिता यांच्या विषयी आपल्या वाचकांना कळावं. आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच उदयोन्मुख कलाकारांविषयी लिहीत असते. त्यातीलच हे एक लेखपुष्प. आपल्या टीमने केलेला हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मधून कळू द्या. तसेच लेख आठवणीने शेअर करा. कारण आपल्या सकारात्मक कमेंट्स, सूचना आणि लेख शेअर करणं यातून आम्हाला प्रोत्साहन मिळतं. याच प्रोत्साहनातून नवनवे लेख लिहिले जातात आणि आपलं मनोरंजन होतं. तेव्हा लेख नक्की शेअर करा आणि लेखाविषयी अभिप्राय नक्की कळवा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.