Breaking News
Home / मनोरंजन / अंगणवाडी मधल्या मुलाला ‘कुठे शिकतो’ असे विचारल्यावर मुलाने जे उत्तर दिले ते ऐकून हसू आवरणार नाही

अंगणवाडी मधल्या मुलाला ‘कुठे शिकतो’ असे विचारल्यावर मुलाने जे उत्तर दिले ते ऐकून हसू आवरणार नाही

लहान पोरं आणि त्यांच्या एकेक करामती म्हणजे किस्सेच किस्से असतात. असे किस्से जे केव्हाही अनुभवावेत आणि हसून घ्यावं. कारण या किश्यांमधून या लहान मुलांचा निरागस स्वभाव आपल्याला पदोपदी जाणवतो. आपल्या धकाधकीच्या जीवनात आपली सतत ओढाताण होत असते. अशावेळी हा निरागसपणा आपल्या मनावर काहीसं गुलाबपाणी शिंपाव तसं शिंपण घालत असतो. तात्पुरता का होईना पण मनाला आराम मिळतो.

अर्थात अशा निरागस मनोरंजनाची मेजवानी आपल्याला सहज भेटण्याचं साधन म्हणजे सोशल मीडिया आहे हे आपण जाणताच. हल्लीच्या काळात तर या नवीन माध्यमाने आपल्या मनोरंजनाच क्षेत्र मोठ्या प्रमाणावर व्यापल आहे. या मनोरंजनतही जे निखळ मनोरंजन असतं त्याचा बराचसा वाटा आपल्या लहान मित्रमंडळींनी व्यापलेला असतो. मग त्यातही अगदी एकदम लहान बाळाचं वागणं असो वा त्यांच्या पेक्षा मोठ्या वयाच्या मुलामुलींचं वागणं असो, त्यांच्या बाळलीलांचे व्हिडियोज आपलं सतत मनोरंजन करत असतात.

त्यात हल्ली एका नवीन प्रकारची भर पडली आहे. म्हणजे प्रकार तसा जुना आहे, पण त्यावर नव्याने काही व्हिडियोज मिम्स म्हणून प्रसिद्ध झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता हा प्रकार आहे तरी काय ? तर लहान पोरांचं चुकीचं बोलणं आणि चुकीचं वाचन होय. आता लहान मुलंमुली म्हंटलं की बोबडे बोल आणि चुकीचे उच्चार हे आलेच. अगदी एखादा लिहिलेला शब्द ही वाचताना गफलत होणं हे आलंच. काही चिललिपील्ली तर लिहिलंय त्यापेक्षा काही तरी वेगळंच वाचतात. पण हे सगळंच आपण गंमत म्हणून घेतो आणि यापुढेही घेऊ. किंबहुना आपल्यासमोर असं काही घडत असेल तर एक पाऊल पुढे जाऊन आपण अनेकवेळा त्यांना समाजवत सुद्धा असतोच. अर्थात अस असलं तरी या लहान मुलांच्या उत्तरांनी जी मजा येते ती ही आपण घेत असतोच. तर असेच काही मजेशीर व्हिडियोज आपल्या टीमच्या पाहण्यात आले.

बरं हे व्हिडियो अगदीच कमी वेळेचे असतात. त्यामुळे पटकन बघून संपतात. पण तरीही त्यातील मजा मात्र व्हिडियो बघून झाल्यावर ही कायम असते. असाच एक व्हिडियो आपल्या टीमला प्रचंड आवडला. यात आपल्याला एक गोंडस मुलगा भेटतो. प्रत्येक लहान मुलं मुली असतात तसा निर्मळ मनाचा असतो. त्यामुळे त्याचा व्हिडियो चित्रित करणारे जेव्हा त्याला तू कुठे शिकतोस हे विचारतात तेव्हा तो आपला सरळ सरळ उत्तर देऊन टाकतो. अर्थात त्याचं मूळ उत्तर हे अंगणवाडी किंवा आंगनबाडी असं असायला हवं असतं. पण त्याला नक्की काय शब्द असायला हवं हे कळत नाही, त्यामुळे त्याला जे वाटतं ते तो बोलतो. उच्चार जवळपास जाणारा असला तरी वेगळा असतो. परिणामतः हशा पिकतो. आपण हा व्हिडियो जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला ही आपसूक हसायला येतं. भले हा व्हिडीओ समोरच्याने केवळ विनोद म्हणून रेकॉर्ड केला असेल, परंतु हा व्हिडीओ इतका वायरल झाला आहे कि लोकं पुन्हा पुन्हा ओपन करून बघत आहेत. तुम्हीसुद्धा ह्या व्हिडिओची मजा घ्या.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *