Breaking News
Home / बॉलीवुड / अंदाज अपना अपना २ मधून पुन्हा परतणार सलमान आमिरची जोडी

अंदाज अपना अपना २ मधून पुन्हा परतणार सलमान आमिरची जोडी

आजच्या घडीतील दोन मोठे सुपरस्टार्स ज्यांना १९९४ मध्ये एकत्र घेऊन बनलेल्या ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटाचा सिक्वेल बनवण्यासाठी खूप वर्षांपासून चर्चा चालू होती. खूप वेळा बोललं गेलं कि ह्या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी प्रोड्युसर आणि डायरेक्टर आमिर खान आणि सलमान खान ला घेऊ इच्छितात. पण आजच्या घडीला हे दोन्हीही इतके महागडे स्टार आहेत कि कोणत्याही प्रोडक्शनसाठी दोघांना एका चित्रपटात घेणे मुश्किल आहे. आणि असंही बोललं जात होतं कि चित्रपटसृष्टीतील दोघांची इमेज आता पहिल्या सारखी राहिली नाही. जिथे पूर्वी आमीर चुलबुलीत भूमिकेत दिसायचा, तोच आता खूप सिरीयस भूमिकेत दिसतो. दुसऱ्या बाजूला सलमान खानसुद्धा आता पहिल्या सारखा राहिला नाही. त्याच्या अंदाजामध्ये थोडी दबंग स्टाईल आली आहे.

जरी, इतकं असलं तरी ह्या जोडीला फॉलो करणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक खुशखबर आहे कि दोघेही चित्रपटाच्या सिक्वेल मध्ये दिसणार आहे. ‘अंदाज अपना अपना २’ ची कथा लवकरच पूर्ण होत आहे. ह्या प्रोजेक्ट वर काम करणाऱ्यांनी सांगितले कि चित्रपटातील ६० ते ७० टक्के सीन लिहून झाले आहेत. सलमानने अगोदरच ह्या प्रोजेक्टला सहमती दर्शवली होती. आता आमिर सुद्दा ऑन बोर्ड येत आहे. त्याच्या जवळील सूत्रांनी ह्यास मंजुरी दिली आहे. इतकंच नाही तर चित्रपटात करिश्मा कपूर आणि रविना टंडन ह्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार. मूळ चित्रपटातल्या सलमान आणि आमिर ह्यांच्या दोन्ही भूमिकांना भेटवण्यात आले आहे. असं बोललं जात आहे कि चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टची कथा अमर प्रेमच्या त्या कथेपासूनच पुढे सरकणार आहे.

चित्रपटात मुख्य अभिनेत्रींच्या भूमिकेसाठी नवीन अभिनेत्रींना संधी मिळणार. कारण ह्या चित्रपटात कमी वयातल्या तरुणींना वयाची पन्नाशी पार केलेले अभिनेते आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवताना दिसणार आहेत. हि आयडिया चित्रपटात कॉमेडीचा तडका लावण्यासाठी केली गेली आहे. पहिल्या चित्रपटात काही मुख्य भूमिका होत्या ज्यांनी ह्या कोमिडी चित्रपटाला मनोरंजक बनवण्यात कोणतीच कसर सोडली नव्हती. त्यात टिकू तलसानिया, शक्ती कपूर, जगदीप, दिवंगत देवेन वर्मा, विजू खोटे, महमूद इत्यादी कलाकार होते. ह्यावेळी ह्या कलाकारांच्या जागी काही नवीन चेहरे दिसतील. लवकरच चित्रपटाची कास्टिंग पूर्ण होईल. हा चित्रपट सलमान-आमीर हे दोघेही मिळून प्रोड्युस करणार आहेत. राजकुमार संतोषीच ह्या चित्रपटाचे सुद्धा प्रोड्युसर असणार आहेत.

 

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.