सतत आपल्या स्वतः विषयी हव्या नको त्या बातम्या देऊन प्रसिद्धीत असलेली बॉलिवूडची आयटम गर्ल राखी सावंतने गेल्या महिन्यात 25 नोव्हेंबरला आपला जन्मदिवस साजरा केला. ऑन स्क्रीन आणि वेगवेगळ्या हरकतीमुळे ती लोकांच्या नजरेत येते. राखी सावंतने आपले बालपण खूप वाईट परिस्थितीत आणि घाबरून काढले आहे. फक्त १० वर्षाच्या वयात तिने नीता अंबानीच्या लग्नात जेवण वाढपी म्हणून काम केले होते आणि आज तीच राखी सावंत मुंबईच्या आलिशान जागेतील बंगल्यात राहते. राखीचे वडील आनंद सावंत हे मुुंबई पोलिस विभागात कॉन्स्टेबल होते. आई जयासोबत राखी मुंबईत राहते. आज आम्ही तुम्हाला तिच्या जीवनातील न ऐकलेल्या गोष्टी विषयी सांगतोय.
फक्त ११ वर्षाच्या वयात दांडिया खेळण्यासाठी तिच्या आईने आणि मामाने तिचे लांब सडक केस कापले होते. केस असे कापलेले होते की त्यांना पाहिल्यावर असे वाटत होते, त्यांना जाळले आहे. राखी पुर्ण दिवस आरश्या समोर उभी राहून रडत होती. त्याच दिवशी राखीने मनात ठाण मांडले की, आपल्या कुटुंबाच्या विरुद्ध जाऊन सर्व काम करेन.
खुपवेळा राखीने मुलाखतीत सांगितले आहे कि, ती अशा कुटुंबातून आहे जिथे महिलांसाठी कोणत्याही प्रकारची सूट नाही. अशा कुटुंबात बायकांना पायातील चप्पल समजले जाते. एका मुलाखतीत हेही सांगितले की, घरातील पुरुषां समोर बायकांना नजर मिळवण्याची अनुमती नसे. तसेच महिला घराच्या छतावर किंवा बाल्कनीत उभे राहण्याची परवानगी नव्हती. त्यांना पार्लर किंवा बाजारात जाण्याची परवानगी नव्हती.
पुढे राखीने सांगितले की, एवढं सगळं करून मुलीना पैसे कमावण्यासाठी काहीही करायला सांगत होते. १० वर्षाच्या वयात टिना अंबानीच्या लग्नात जेवण वाढपी म्हणून काम करायला लावले. कँटरींगच्या कामात तिला दिवसाचे ५० रुपये मिळायचे. राखीने सांगितले तिने चित्रपट सृष्टीत काम पाहणे सुरु केले तेव्हा तिच्या जवळ चांगले कपडे नव्हते. ती काहीही कपडे परिधान करून लोकांना भेटत असे. आज त्याप्रकारचे कपडे फॅशन झाली आहे. लोकं काहीही घालतात, म्हणून तिचे म्हणणे आहे की, कपडे काम देत नाहीत. तिने स्वतःला काम मिळण्यासाठी नृत्य, अभिनय आणि राजकारण शिकले.
राखी सावंत आणि अभिषेक अवस्थी यांची ओळख ‘राखी का स्वयंवर’ मधे झाली. त्यानंतर त्या दोघांनी विवाह बंधनात अडकण्याचे ठरवले होते. पण काही कारणाने ते वेगळे झाले. अभिषेक विषयी बोलताना ती एका मुलाखतीत म्हणाली ‘अभिषेक खूप चांगला डांसर आहे, आणि त्याच्या सारखे बनणे खूप मुश्कील आहे.’
अभिषेकचे तिच्यावर प्रेम होते की नाही माहित नाही पण तो तिची खूप काळजी घ्यायचा. तो नेहमी कठीण वेळी सुद्धा तिच्या सोबत असायचा. ती उदास झाल्यावर तो जसा तिच्या डोक्यावर हाथ फिरवायचा तसे आईने सुध्दा कधी फिरवले नसेल. राखीने टीव्ही वर आपला स्वयंवर केला पण असली जीवनात ती लग्ना पासून दूर आहे. ती कधीही लग्न करणे पसंत करत नाही, किंवा तिला मुलां विषयी आवड नाही. राखीचे म्हणणे आहे कि मी माझ्या कुटूंबा पासून खुप त्रासलेली आहे म्हणून ती कधीही लग्न करू इच्छित नाही. ती फक्त समाजसेवा करू इच्छिते, ती आज १५ करोड संपत्तीची मालकीण आहे. राखी सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. कोणतेही चित्रपट किंवा जाहिराती न करताही ती करोडोंची मालकीण आहे. इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार तिच्याकडे १५ कोटींची संपत्ती आहे. राखीचे मुंबईमध्ये दोन फ्लॅट आणि एक बंगला असून त्यांची एकूण किंमत ११ कोटी आहे. ह्याशिवाय राखीकडे फोर्ड एन्डेव्हर कार असून त्या कारची किंमत २१ लाखांपेक्षाहि जास्त आहे. हि सर्व कमाई राखी आपल्या स्टेज परफॉर्मन्सच्या माध्यमातून करत असते.