1991 साली आलेला अक्षय कुमारचा सौगंध चित्रपट तर तुम्हाला लक्षात असेलच, या सिनेमात अक्षयने गरीब मुलाची भूमिका साकारली होती. हा अक्षय कुमारचा पहिला चित्रपट होता बॉक्स ऑफिस वर या चित्रपटाने फार काही चांगली कामगिरी केली नव्हती. परंतु अक्षय कुमारच्या अभिनयाची वाहवा केली गेली. या चित्रपटात अक्षय सोबत शांतीप्रिया नावाच्या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. चित्रपटात अक्षय- शांतिप्रियाच्या केमिस्ट्रीला सिनेरसिकांनी पंसती दर्शवली होती. या चित्रपटात शांतीप्रिया आणि अक्षय यांच्यामध्ये चित्रित झालेल्या चुंबन दृश्याची खूप चर्चा रंगली. हा चित्रपट जरी फ्लॉप झाला असला तरीसुद्धा नंतर आलेल्या ‘खिलाडी’ सिरीज मुळे अक्षय स्टार बनला. अक्षय तर अजूनसुद्धा चित्रपटात काम करतोय पण त्याच्यासोबत काम करणाऱ्या अनेक हिरोइन्स आता कुठे आहेत कोणालाच नाही माहिती. तर दुसरीकडे शांतीप्रिया सिनेसृष्टीत संघर्ष करतच राहिली. तुम्हास ठाऊक आहे का शांतीप्रिया कोण आहे? व ती आजकाल काय करत आहे?
शांतीप्रिया साऊथ अभिनेत्री भानुप्रियाची बहीण आहे. भानुमती तिच्या काळात साऊथ ची सर्वात बीजी हिरोईन म्हणून ओळखली जायची. शांतिप्रियाने अनेक तेलगू आणि तामिळ चित्रपटात काम केले आहे. शांतीप्रिया साऊथ इंडस्ट्री मध्ये खूप मोठे नाव होती. ‘एंगा उरू पट्टुकरन’ नावाच्या तामिळ चित्रपटातून तिच्या कारकिर्दीचा प्रवास सुरु झाला. त्या चित्रपटात तिची बहीण सुद्धा होती. हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला. साऊथ चित्रपटातील परफॉर्मन्स आणि फॉलोईंग पाहून तिला बॉलिवूडच्या ऑफर्स येऊ लागल्या. सौगंध नंतर शांतीप्रिया अनेक हिंदी चित्रपटात दिसून आली. ‘मेरे सजना साथ निभाना’, ‘फूल और अंगार’, ‘वीरता’, ‘अंधा इंतेकाम’, ‘मेहरबान’, ‘इक्के पे इक्का’ ह्या चित्रपटात तिने काम केले. तिचा ‘हेमिल्टन पैलेस’ हा शेवटचा चित्रपट होता.
परंतु बॉलीवूड मध्ये समाधानकारक यश न मिळाल्याने अखेरीस तिने 1999 साली अभिनेता सुशांत रे यांच्यासोबत विवाह करुन बॉलिवूडला रामराम ठोकला. सुशांत लोकप्रिय चित्रपट प्रोड्युसर व्ही. शांताराम ह्यांचे नातू होते. त्याने शाहरुख सोबत ‘बाजीगर’ आणि ‘वंश’ ह्या चित्रपटात काम केले होते. त्यांनी अनेक मराठी चित्रपटात सुद्धा काम केले आहे. अशी हि बनवाबनवी मध्ये सिद्धार्थने अशोक सराफ ह्यांच्या भावाची भूमिका केली होती. नियतीला हे सारं काही मंजूर नव्हतं. 2004 साली तिच्या पतीचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. पतीच्या निधनानंतर कुटुंबाची सारी जबाबदारी तिच्या खांद्यावर येऊन पडली. आपल्या दोन मुलांच्या पालनपोषण करण्याच्या हेतुने किंवा ध्येयाने तिने छोट्या पडद्याद्वारे कमबॅक केले. ‘माता की चौकी’ आणि ‘द्वारकाधीश’ सारख्या मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली. २०११ साली तिचा शेवटचा चित्रपट आला होता. त्यानंतर आजतागायत तिच्या कोणत्याही नवीन चित्रपटाविषयी माहिती उपलब्ध नाही.