जर आपण ‘खिलाडी कुमार’चे फॅन असाल तर आपल्याला ठाऊक आहे का, कि त्याचे खरं नाव अक्षय कुमार नाही. खरं तर सीधे साधे अक्षय दिल्लीतील चांदनी चौक मध्ये राहणारा राजीव हरिओम भाटिया आहे. हिंदी सिनेमात नाव बदलणे नवीन गोष्ट नाही, तसं पाहिले तर खूप अभिनेत्यांनी आपली नावे बदलली आहेत. आणि ते प्रसिध्द सुद्धा झाली आहेत. यात दिलीप कुमार आणि मधुबाला ह्या सारखी खूप मोठी नावे सामील आहेत. पण आपण इथे राजीव हरिओम भाटिया ह्याने स्वतःसाठी अक्षय कुमार हेच नाव का ठरवले? ह्यामागे आहे एक वेगळीच कहाणी. चला तर जाणून घेऊया.
एका चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी अक्षय कुमारला एक इव्हेंट मधे विचारले की, तुम्ही तुमचे नाव राजीव हरिओम भाटिया बदलून अक्षय कुमार का ठेवले? तेव्हा अक्षयने त्यामागची पूर्ण गोष्ट सांगितली. त्याने हेही सांगितले की नाव बदलण्या मागे ज्योतिष कारण नाही. ‘हिंदुस्तान टाईम्स’ नुसार, अक्षयचे नाव बदलण्या मागे प्रसिध्द अभिनेता कुमार गौरव सोबतचा एक किस्सा आहे.
पहिल्या वेळेस विचारला हा प्रश्न
तो म्हणाला की, पहिल्या वेळी हा प्रश्न मला कोणीतरी विचारला. अक्षय उत्तर देताना म्हणाला, माझा पहिला चित्रपट ‘आज’ हा ‘1987 मधे आला. या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश भट होते आणि मुख्य कलाकार कुमार गौरव होते. कुमार गौरवचे या चित्रपटातील नाव अक्षय असे होते. या चित्रपटात अक्षय कुमारची खूप छोटी भूमिका होती. मी फक्त गौरव आणि त्याचा अभिनय बघत होता. त्याला पाहून शिकत होतो. माहिती नाही पण मला त्या चित्रपटातील त्याचे नाव इतके आवडले कि मी कोर्टात गेलो आणि नाव बदलून घेतले, असे अक्षय म्हणाला.
नाव बदलल्या बरोबर नशीब बदलले
तो पुढे म्हणाला, मला नाही माहिती मी माझे नाव का बदलले. मी वांद्रे पूर्व च्या कोर्टात जाऊन नाव बदलून घेतले. मी त्यावेळी काहीच नव्हतो. तरी मी व्हिजिटिंग कार्ड बनवले. त्यानंतर मी कामाच्या शोधात निघालो आणि चांगली वेळ माझ्या बरोबर होती. त्यानंतर मला चित्रपट मिळाले.