आताच्या काळात सेलिब्रेटीजच्या मुलांना लोकं तितकेच जाणण्याचा प्रयत्न करतात, जितके ते एका बॉलिवूड सेलेब्रेटीजबद्दल जाणू इच्छितात. मग ती गोष्ट त्यांच्या अभ्यासाबद्दल असू दे कि त्यांच्या मित्रांबद्दल किंवा मग त्यांच्या लाइफस्टाइल बद्दल. तुम्ही ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या, करीना-सैफ च्या तैमूर पासून ते आमिर खानचा मुलगा आजाद पर्यंत सर्वांचे फोटोज पाहिले असतील. परंतु तुम्ही अक्षय कुमारच्या मुलीचा फोटो क्वचितच पाहिला असेल. अक्षय कुमार एक उत्कृष्ट अभिनेता आहे, हे तर सर्वजण मानतातच. परंतु तो एक चांगला पती आणि पिता सुद्धा आहे हे आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत. आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्यासोबत तो त्यांना मीडियापासून सुद्धा खूप लांब ठेवतो आहे. म्हणूनच त्याची मुलगी नितारा आणि मुलगा आरव ह्यांचे फोटोज तुम्हांला खूपच कमी पाहायला मिळतील.
अक्षय सोबत नितारा खूप ठिकाणी दिसून आली आहे परंतु अक्षयने कधी तिचा चेहरा लपवला आहे तर कधी मीडियाला चकमा देऊन अक्षय मुलीला घेऊन मीडियापासून निसटला आहे. इतकेच नाही तर सोशिअल मीडियावर सुद्दा जेव्हा अक्षय आपल्या मुलीचे फोटो शेअर करतो तेव्हा कधीच नितारा चा चेहरा दाखवत नाही. आता हा प्रश्न निर्माण होतो कि अक्षय असं का करतो. तर चला तुमच्या ह्या प्रश्नाचे समाधान करून घेऊया. अभिनेता अक्षय कुमार बॉलिवूड मधील मोठ्या स्टारपैकी एक आहे परंतु तरीसुद्धा आपल्या पर्सनल लाईफ ला तो आपल्या ग्लॅमरस जीवनापासून दूर ठेवतो. अक्षय आपल्या मुलांना मीडियापासून दूर ठेवतो. तुम्ही क्वचितच अक्षयच्या मुलीचा फोटो पाहिला असेल ज्यात तिचा चेहरा दिसत असेल.
अक्षय आणि पत्नी ट्विंकल दोघेही आपली मुलगी नितारा असे कोणतेच फोटोज शेअर करत नाहीत ज्यात तिचा चेहरा दिसत असेल. अक्षयला नाही वाटत कि छोट्या वयात त्याची मुले मीडियाची बातमी व्हावी. अक्षयचं असं मानणं आहे कि छोट्या वयात आपल्या मुलीने एका चांगल्या प्रकारे आयुष्य एन्जॉय करावे आणि स्टारडमपासून दूर राहावे. खरंतर अक्षय आपल्या कुटुंबासाठी खूप प्रोटेक्टिव्ह आहे. त्याला माहिती आहे कि मीडिया अनेकदा मसालेदार बातमी बनवण्यासाठी काही जास्तच लिहून जाते. आणि अक्षयला असे आवडणार नाही कि मीडिया त्याच्या मुलीसोबत सुद्धा असे काही करेल. त्याला आवडणार नाही कि मीडिया त्याच्या मुलीबद्दल काहीही वाईट लिहिलेलं. ह्याच कारणामुळे अक्षय आपल्या मुलीचा चेहरा नेहमी मीडियापासून लपवतो.