चुलबुली या नावाने बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेली जुही चावलाची आज कोणालाही ओळख सांगण्याची गरज नाही. चित्रपटांमध्ये आपल्या सौंदर्याने नेहमी सर्वांना वेड लावणाऱ्या या अभिनेत्रीने चित्रपटांपेक्षा तिच्या सौंदर्याद्वारे लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. या अभिनेत्रीने वर्ष १९९५ मध्ये लग्न करून अनेकांचे मन मोडले पण लग्नानंतरही जूही चावलाने हे सर्वांपासून लपवून ठेवले. पण आता लग्नाच्या २५ वर्षानंतर जूही चावलाने हे रहस्य उघड केले आहे. आज बरेच स्टार्स सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातील काही रहस्ये उघड करतात. अशीच एक अभिनेत्री जूही चावला असे करतांना दिसली आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खुलेपणाने बोलली. तिचा नवरा जय मेहताने तिला कसे प्रपोज केले आणि प्रत्येक परिस्थितीत तिच्याबरोबर राहिले, असे जूहीने सांगितले. याबरोबरच जूही चावलानेही असे खुलासे केले की तिने आपले लग्न बरेच दिवस मीडियापासून दूर ठेवले होते. अलीकडेच जूही चावलाने न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत बर्याच गोष्टी सांगितल्या.
यात त्यांना लग्नाविषयीच्या प्रश्नावर आणि जुहीला विचारलेल्या प्रश्नात विचारले होते, की त्यांनी जय मेहताचे लग्न इतके गुप्त का ठेवले? आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीही काहीही न बोलणारी अभिनेत्री जूहीने उघडपणे उत्तरे दिली. ती म्हणाली, त्यावेळी आपल्याकडे इंटरनेट नव्हते. आपल्या फोनमध्ये कॅमेरासुद्धा नव्हता, तर असच व्हायचं. मी त्या दरम्यान माझी ओळख निर्माण करण्यास सुरवात केली होती आणि मला चांगली कामे पण मिळत होती. जय माझ्या आयुष्यात आला तेव्हा मला अशी भीती वाटली की माझ करिअर बुडेल. मला हे देखील सुरू ठेवायचे आहे आणि मला असे करण्याचा हाच मध्यम मार्ग वाटला. या मुलाखतीत जूही चावलाने तिच्या प्रेमकथेविषयी सांगितले. तिने सांगितले की ति करियरच्या सुरुवातीला जयला भेटली आणि त्यानंतर या दोघांबद्दल काही काळ चर्चा झाली नव्हती, परंतु जेव्हा दोघे पुन्हा एकदा भेटले तेव्हा जयला जुहीचं वेड लागलेलं होतं.
जुही जिथं जायची तिथे जय पुष्पगुच्छ आणि प्रेमाच्या नोट्स घेऊन तेथे पोहोचत होता. जूही सांगते की तिच्या वाढदिवसाच्या वेळी जयने एक ट्रक भरुन लाल गुलाब पाठवले आणि ते पाहून तिला आश्चर्य वाटले. यानंतर १९९५ मध्ये जुहीने बिझनेसमन जय मेहताशी लग्न केले आणि आज त्यांना दोन मुलेही झाली. जुहीने १९८६ मध्ये ‘सुल्ताना’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड कारकिर्दीची सुरूवात केली होती पण १९८८ मधील ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातून तिला ओळख मिळाली. हा चित्रपट ब्लॉकबस्टर बनला आणि त्यानंतर जुही प्रत्येक चित्रपट निर्मात्यांची पहिली पसंत बनली. यानंतर जुहीने डर, इश्क, यस बॉस, फिर भी दिल है हिंदुस्तानी, हम हैं राही प्यार के, अर्जुन पंडित, दीवाना-मस्ताना, आइना, भूतनाथ, स्वर्ग, दरार, बोल राधा बोल, अंदाज, लुटेरा, मिस्टर एंड मिसेज खिलाड़ी, राजू बन गया जैंटलमैन, साजन का घर, बेनाम बादशाह, सन ऑफ सरदार, लक बाय चांस, चॉल्क एंड डस्टर, झंकार बीट्स, झूठ बोले कौवा काटे, दौलत की जंग, भाग्यवान, आमदनी अट्ठनी खर्चा रुपैया, बस एक पल, माई ब्रदर निखिल या यशस्वी सिनेमांमध्ये काम केले.