बॉलिवूडच्या काही कलाकारांना नेहमीच त्यांच्या उत्कृष्ठ अभिनयासाठी प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत असते, त्यांच्या अभिनयाची खूप प्रशंसा सुद्धा होते. तर दुसरीकडे काही सेलिब्रेटी आहे आहेत, ज्यांच्या अभिनयापेक्षा त्यांच्या वैयक्तिक जीवनासंबंधित जास्त चर्चा होत असते. परंतु आज आम्ही अश्या सेलेब्रेटींबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे भाऊबहीण अगदी कार्बन कॉपीच आहेत. जर त्यांना एकत्र उभे केले गेले, तर कदाचित ओळखूही येणार नाही. ह्या सेलिब्रेटींचे चेहरे आपल्या भावंडांच्या चेहऱ्याशी इतके साम्य दिसतात कि तुम्ही पण त्यांचे फोटोज पाहून काही क्षण गोंधळून जाल.
कॅटरिना कैफ आणि इजाबेल कैफ
बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे कॅटरिना कैफ. कॅटरिना कैफ आणि तिची बहीण इजाबेल कैफ खूप सारख्या दिसतात. अनेकदा दोघींचे फोटोज सोशल मीडियावर वायरल होत असतात. सुरुवातीला लोकांना इजाबेल आणि कॅटरिना मध्ये फरक ओळखू यायचा नाही. परंतु आता लोकांना दोघांमध्ये फरक समजू लागला आहे.
शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी
बॉलिवूडमधील सर्वात फिटेस्ट अभिनेत्री म्हणून शिल्पा शेट्टीचे नाव घेतली जाते. शिल्पा शेट्टीचा चेहरा सुद्धा तिची बहीण शमिता शेट्टीच्या चेहऱ्याशी अगदी मिळता जुळता आहे. चित्रपटसृष्टीत दोघांचे करिअर खूप वेगवेगळे राहिले आहे. एकीकडे जिथे शिल्पा शेट्टीने यशाची शिखरे गाठली तर दुसरीकडे तिची बहीण श्मिट शेट्टीचे फिल्मी करिअर एकदम फ्लॉप राहिले. परंतु दोन्ही बहिणी आपले फिटनेस आणि प्रकृतीविषयी नेहमी जागरूक असतात आणि ते आपल्या चाहत्यांना देखील प्रोत्साहन करत असतात.
भूमी पेडणेकर आणि समीक्षा पेडणेकर
बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये भूमी पेडणेकर हिचे नाव एक यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत घेतले जाते. परंतु तुम्हांला हे जाणून आश्चर्य होईल कि तिची बहीण समीक्षा पेडणेकर सुद्धा तिच्या मोठ्या बहिणीसारखीच दिसते. दोन्ही बहिणी खूप ग्लॅ मरस आहेत, परंतु एकीकडे समीक्षा आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करत आहे तर दुसरीकडे भूमी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांचे मने जिंकत आहे.
अनिल कपूर आणि संजय कपूर
अभिनेता अनिल कपूर आणि त्यांचे भाऊ संजय कपूर ह्यांचे चेहरे सुद्धा खूप प्रमाणात एकमेकांशी मिळते जुळते आहेत. फक्त फिटनेसच नाही तर दोघांची स्टाईल आणि पद्धती सुद्धा एकमेकांसारखे आहेत. दोघांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांत कामे केली आहेत आणि आपल्या करियरमध्ये यशस्वी सुद्धा झालेत. एक वेळ अशी सुद्धा होती, जेव्हा दोघांमध्ये फरक करणे फार मुश्किल होते.
अनुपम खेर आणि राजू खेर
बॉलिवूडमध्ये दिग्गज अभिनेत्यांमध्ये अनुपम खेर ह्यांचे नाव घेतले जाते. चित्रपट कारकिर्दीत त्यांनी आपल्या दंडारी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. अनुपम खेर ह्यांचे लाखों करोडो चाहते सुद्धा आहेत. अनुपम खेर ह्यांच्याप्रमाणेच त्यांचे भाऊ राजू खेर ह्यांनी सुद्धा अभिनयाचा मार्ग अवलंबला होता. परंतु राजू ह्यांना ह्यात यश मिळू शकले नाही. काही चित्रपटांत काम केल्यानंतर राजू ह्यांनी माघार घेतली. परंतु आपले भाऊ अनुपम खेर ह्यांच्यासारख्या चेहरा असल्यामुळे त्यांची खूप चर्चा होत असते.