नुकताच ‘चला हवा येऊ द्या’ चे भाग पार पडले. या भागांमध्ये झी मराठी वर नव्याने दाखल होणाऱ्या दोन मालिकांतील काही कलाकार दाखल झाले होते. त्यात डॉ. गिरीश ओक यांचाही समावेश होता. ते सध्या ‘अग्गं बाई सासूबाई’ या मालिकेतून आपल्या भेटीस येत असतात. पण लवकरच ही मालिका आपल्या शेवटच्या भागासकट आपला निरोप घेईल. पण यात गंमत अशी की याच मालिकेच्या धर्तीवर एक नवीन मालिका ‘अग्गं बाई सुनबाई’ दाखल होणार आहे. अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने या मालिका बंद आणि चालू होतील. या मालिकेतील अभिजीत राजे आणि आसावरी या व्यक्तिरेखा साकारणारे कलाकार तेच राहणार असले तरी शुभ्रा ही व्यक्तिरेखा साकार करणारी अभिनेत्री बदलणार आहे.
आधीच्या मालिकेत ही व्यक्तिरेखा सुप्रसिद्ध अभिनेत्री, सूत्रसंचालिका तेजश्री प्रधान हिने साकार केली होती. या नवीन येउ घातलेल्या मालिकेतील सुनेची व्यक्तिरेखा एक उदयोन्मुख अभिनेत्री साकार करणार आहे. या अभिनेत्रीचं नाव उमा पेंढारकर असं आहे. नवीन मालिकेच्या प्रो’मोज मध्ये एव्हाना आपल्याला त्यांचा सहभाग दिसला असेलंच. उमा या पेशाने कन्सल्टंट आहे. सा’यकॉलॉजी या विषयात त्यांनी विशेष रस घेतलेला दिसतो. शिक्षणासोबतच उमा यांनी कलाक्षेत्रातही सातत्याने वावर कायम ठेवला आहे. कधी गायिका म्हणून, कधी कथक नृत्यांगना म्हणून आणि आता अभिनेत्री म्हणून सुद्धा. याआधी त्यांनी, ‘स्वामिनी’ या गाजलेल्या मालिकेत ‘पार्वतीबाई’ ही व्यक्तिरेखा साकार केली होती. या भूमिकेसाठी त्यांच्या अभिनयाचं सगळ्यांकडून कौतुक झालं होतं. मालिकांआधी त्यांनी संगीत संशयकल्लोळ या नाटकात ही अभिनय केलेला होता. अभिनय, नृत्य, गायन यांच्यासोबतच त्या एक यु’ट्यु’बर ही आहे. ‘U MA tter’ या त्यांच्या यु’ट्यु’ब चॅ’ने’ल द्वारे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.
उमा यांच्या माहेरी आणि सासरी दोन्ही कडे कलेसाठी अगदी पोषक असे वातावरण आहे असे दिसते. कलेचा हाच वारसा उमा या अत्यंत समर्थपणे पेलून धरताना आणि पुढे चालवताना दिसतात. त्यांच्या इतर भूमिकांप्रमाणेच या भूमिकेचंही कौतुक होईल हे नक्की. उमा ह्यांच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !
आमच्या टीमने अनेक कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा यापूर्वी घेतला आहे. त्यांच्या विषयी असलेले लेख सुद्धा आपल्याला वाचायला आवडतीलच. ते लेख वाचण्यासाठी वर उपलब्ध असलेल्या स’र्च ऑ’प्शनचा वापर करा. त्यात जाऊन तुम्ही मालिका किंवा चित्रपट किंवा शॉर्ट फिल्म किंवा आवडत्या कलाकाराचं नाव लिहा आणि स’र्च करा. आपल्याला आमच्या टीमने लिहिलेले लेख वाचण्यास मिळतील. तसेच आपल्याला कोणत्या कलाकारांविषयचे लेख आवडले हे आम्हाला क’मेंट्स से’क्श’न मध्ये लिहून सांगायला विसरू नका. आपल्या वेळेसाठी धन्यवाद !