मराठी गप्पावरील वैविध्यपूर्ण लेख आपण सातत्याने वाचता आणि इतरांसोबतही शेअर करता. याबद्दल धन्यवाद. आपल्या वाढत्या वाचक संख्येमुळे आमच्या टीमलाही विविध विषयांवर लिहिण्यासाठी प्रोत्साहन मिळते. मराठी मालिका आणि त्यातील कलाकार हे आमच्या लेखांचे अनेक वेळेस मध्यवर्ती मुद्दे असतात. यात अग्गं बाई सासूबाई या मालिकेचा आणि त्यातील कलाकारांचं उल्लेख अनेक वेळेस झालेला आहे. हा लेख लिहीत असताना या मालिकेत होऊ घातलेल्या काही बदलांमुळे ही मालिका पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी येणार, असं चिन्ह आहे.
या मालिकेतील खलनायक म्हणजे आसावरीचा बबड्या. आशुतोष पत्की या अतिशय गुणी नटाने ही व्यक्तिरेखा अतिशय मेहनतीने उभी केली आहे. त्याने त्याचा संपुर्ण अनुभव पणाला लाऊन अभिनय केल्याने व्यक्तिरेखा उठावदार झाली आहे. अनेक प्रेक्षक या व्यक्तिरेखेस नाकं मुरडतात, हे या कलाकाराच्या अभिनयाचं यश होय. मालिकेत अभिजित राजे हे आपली संपूर्ण संपत्ती बबड्याच्या नावावर करून ते आणि आसावरी घरातून निघून जातात. ह्या गोष्टीचा फायदा घेऊन बबड्याने अनेक कुरापती आणि अभिजित राजे ह्यांचा अपमान होईल अश्या गोष्टी केल्या. आता आशुतोषच्या अभिनयाचा आणि अनुभवाचा अजून कस लावणारा बदल मालिकेत होणार आहे. ज्या बदला अन्वये, बबड्या हा आता चांगल्या वळणावर येणार असून त्याच्या व्यक्तिरेखेत सकारात्मक बदल झालेले दिसून येतील, असं वाटतं. कारण नुकत्याच दाखवल्या जाणाऱ्या भागांत, बबड्या आणि आसावरी ह्या व्यक्तिरेखा कुकिंग स्पर्धेत भाग घेत असल्याचं दिसतं आहे. तसेच या स्पर्धेच्या शेवटी आसावरीच्या भाषणाने बबड्याच्या डोळ्यात पाणी तरळलेलं पाहायला मिळतं आहे. आपण केलेल्या कर्माची जाणीव झाल्याचे त्याला मनापासून वाटल्यानंतर, तो आईची क्षमा मागताना दिसत आहे. त्याला त्याची चूक समजली आहे, असे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे ही खल व्यक्तिरेखा आता सकारात्मक होईल, अशी शक्यता व्यक्त होते आहे. आत्ता पर्यंत बबड्या या व्यक्तिरेखेच्या नकारात्मक वागण्याने मालिकेत अनेक वळणं आली. अगदी मालिकेतील इतर मुख्य व्यक्तिरेखांना कमीपणा दाखवण्याची संधी या व्यक्तिरेखेने सोडल्याचे दिसत नाही.
पण या व्यक्तिरेखेच्या वागण्यात कायमस्वरूपी सकारत्मक बदल होणार असल्यास मालिकेतील तो एक मोठा पण मनोरंजक बदल ठरेल. मालिकेने आत्तापर्यंत अनेक वळणं पाहिली आहेत, त्यातील हे एक मोठं वळण ठरण्याची शक्यता आहे. सोहमने माफी मागितल्यानंतर घरातून बाहेर काढलेल्या आसावरी आपल्या मुलाला क्षमा करेल का, हे हि पाहणे तितकंच मनोरंजनक ठरेल. येणाऱ्या काळात अजून कोणकोणते बदल आपल्याला पहावयास मिळतात हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे. अग्गं बाई सासूबाई या मालिकेतील विविध कलाकारांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेण्याचा आमच्या टीमने वेळोवेळी प्रयत्न केला आहे. तसेच मराठी मनोरंजन क्षेत्रातील विविध कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपण हे लेख अजून वाचले नसतील तर नक्की वाचा. त्यासाठी आपल्याला वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करता येईल. मराठी गप्पाचे नियमित वाचक असण्यासाठी मनापासून धन्यवाद !