Breaking News
Home / मराठी तडका / ‘अग्गबाई सुनबाई’ मालिकेतील अनुराग खऱ्या आयुष्यात क’सा आहे, पत्नीसुद्धा आहे अभिनेत्री

‘अग्गबाई सुनबाई’ मालिकेतील अनुराग खऱ्या आयुष्यात क’सा आहे, पत्नीसुद्धा आहे अभिनेत्री

आपल्याला मनोरंजन क्षेत्रातील विविध बातम्या, कलाकारांविषयीची थोडक्यात माहिती आणि बऱ्याच वेगवगळ्या विषयांवर लेख वाचायला मिळावेत यासाठी आपली टीम नेहमीच प्रयत्नशील असते. त्यातही एखादी नवीन कलाकृती आली की त्याविषयी सुद्धा आपली टीम अगदी प्रामुख्याने लिहीत असते. आजच्या आपल्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत ते आपल्या एका लाडक्या अभिनेत्या विषयी. नुकताच तो एका शो मध्ये सूत्रसंचालक म्हणून आपल्याला दिसून येतो आहे, तसेच एका आघाडीच्या मालिकेत त्याची नव्याने एन्ट्री होते आहे. होय, आपल्यापैकी अनेकांनी बरोबर ओळखलं आहे. आज आपण जाणून घेणार आहोत चिन्मय उदगीरकर यांच्या विषयी. चिन्मय यांना अभिनय क्षेत्रात येऊन बरीच वर्षे झाली. त्यातही गेल्या दशकभराच्या काळात आपण त्यांना अनेक मालिका आणि सिनेमांतून अभिनय करताना अनुभवलं आहे. मग त्यात घाडगे अँड सून, नांदा सौख्यभरे या मालिकांची नावे अगदी प्रामुख्याने घ्यावी लागतील.

तसेच मेकअप, वाजवूया बँड बाजा, श्यामचे वडील हे चित्रपटही आहेतच. मालिका आणि सिनेक्षेत्रात अतिशय सहजतेने वावरणारे चिन्मय यांनी नाटकांतूनही उत्तम अभिनय केलेला आहे. अगदी कॉलेज जीवनापासून त्यांनी अनेक एकांकिका आणि नाटकांतून अभिनय केलेला आहे. तसेच काही वर्षांपूर्वी आलेल्या महाराष्ट्राचा सुपरस्टार या रियालिटी शोचा ही ते एक महत्त्वपूर्ण भाग होते. कलाक्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या चिन्मय यांना जीवनसाथी मिळाली आहे ती सुद्धा कलाकार. गिरीजा जोशी असं त्यांचं नाव आहे. उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच त्या उत्तम नृत्यांगना ही आहेत. त्यांनी काही चित्रपटातूनही अभिनय केलेला आहे. या दोघांची प्रथमतः ओळख झाली, मग कालांतराने मैत्री आणि मग प्रेम. ही जोडी जवळपास पाच वर्षांपूर्वी लग्नबंधनात अडकली. सध्या चिन्मय हे आपल्याला ‘अग्गबाई सुनबाई’ या मालिकेतून अनुराग ही भूमिका साकार करताना बघायला मिळतात. तसेच शेजारी शेजारी सख्खे शेजारी या मालिकेचं सुत्रसंचालनही ते अतिशय खुबीने करताना दिसतात.

गेल्या दशकभराहून अधिक काळात त्यांनी स्वतःच्या अभिनयाने स्वतःचा असा चाहतावर्ग तयार केला आहे. त्यामुळे चिन्मय यांच्या प्रत्येक कलाकृतीत चिन्मय यांच्या व्यक्तिरेखा कशा घडत जातात आणि कथानकात बदल घडवत जातात हे चाहत्यांना पाहायला आवडतं. यात आपली टीमही आहेच. त्यामुळे येत्या काळात ते साकारत असलेली अनुराग ही व्यक्तिरेखा काय काय वळणं घेत जाते हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. या लेखानिमित्त चिन्मय यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !! आपल्याला आमचे लेख जेव्हा जेव्हा आवडतात तेव्हा तेव्हा तुम्ही हे लेख शेअर करत असता. त्यातून आम्हाला हुरूप मिळतो, प्रोत्साहन मिळत जातं. आपला हा पाठींबा आमच्या पाठी कायमस्वरूपी असू द्या ही सदिच्छा. लोभ असावा. धन्यवाद !!!

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.