Breaking News
Home / जरा हटके / अचानक आलेल्या सापापासून आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी बघा ह्या कोंबडीने काय केले ते, शेवटी आई ती आईच असते

अचानक आलेल्या सापापासून आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी बघा ह्या कोंबडीने काय केले ते, शेवटी आई ती आईच असते

‘आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्री कारच्या नंतर शिकणे ,अ आई’.. हे शिकत शिकत आपण मोठे झाले आहोत. बरं ह्या केवळ ओळी नाहीत तर आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचं एक माध्यम आहेत. त्यामुळे वरचे शब्द नुसते वाचताना सुद्धा आपण लयीत वाचतो. इतकं ते आपल्या मनावर बिंबलेलं आहे. अर्थातच आईचा महिमा किती मोठा असतो हे काही वेगळं सांगायला नको. पण काही वेळेस याचा पुनःप्रत्यय येत राहतो. असाच अनुभव एक व्हिडियो बघताना आपल्या टीमला आला. यावर लिहावं असं मनापासून वाटलं आणि आजचा हा लेख लिहिला जातो आहे.

हा व्हिडियो आहे एका गावातील घरातला. खरं तर तेथील खुरड्यातला. या खुरड्यात एक कोंबडी आणि तिची पिल्लं दिसून येतात. कदाचित जवळच असलेल्या कॅमेऱ्यातून या खुरड्यात घडणाऱ्या गोष्टी कळून येतात. यात कैद झालेली एक घटना म्हणजे आपल्या टीमने पाहिलेला वायरल व्हिडियो. व्हिडियोच्या सुरुवातीसच आपल्याला खुराड्याच्या उजव्या बाजूने एक साप सरपटत जाताना दिसतो. तर डाव्या बाजूला कोंबडी आणि तिची पिल्लं असतात.

 

आता साप पुढे काय करु शकेल हे काही वेगळं सांगायची गरज नसते. अशावेळी खरं तर कोंबडी पळून जाऊ शकते आणि स्वतःचा जीव वाचवू शकते. पण निसर्गतः आपल्या पुढील पिढीचं संरक्षण करण्याची मूलभूत भावना प्रत्येक प्राणिमात्रांत असते. त्यामुळे ही कोंबडी तिला जेवढं शक्य होईल तेवढं या सापाशी झुंजायला जाते. ती काय करते तर या सापाचं लक्ष केवळ स्वतः वर केंद्रित करून घेते. त्यासाठी त्याच्या अंगावर चालून जाते. तो पण सापच. तो फणा काढून दंश मारायला जातोच. याच लगबगीत या कोंबडीची काही पिल्लं त्या सापापासून दूर जाण्यात यशस्वी होतात. पण इथे साप काही केवळ कोंबडी कडे लक्ष ठेऊन नसतो. त्याचं लक्ष या कोवळ्या पिल्लांवर असतं. पण कोंबडीचा आक्रमकपणा इतका असतो की त्याला तिला अव्हेरता येत नाही. त्याचं लक्ष तिच्यावर खिळून राहतं. आता पर्यंत सगळी पिल्लं सुखरूप बाजूला झालेली असतात. पण…. त्यातलं एक अभागी पिल्लू पाठी राहतं. आता हा तरी जाणारच बळी असं आपल्याला वाटतं. पण कोंबडी मात्र जिद्द हरलेली नसते. आपलं पिल्लू सापाच्या विळख्यात सापडू नयेत यासाठी ती पुन्हा त्याच्यावर चालून जाते. पुन्हा त्याचं लक्ष विचलित होतं. ही काही सेकंद त्या पिलाला दुसऱ्या जागी येण्यास पुरेशी ठरतात.

एकदा का ते पिल्लू सुरक्षित अंतरावर आलं की ही कोंबडी त्या पिल्लासकट जी धूम ठोकते की विचारता सोय नाही. काळ आला होता पण तिच्या ममत्वाने पिल्लांवर वेळ येऊ दिली नाही.

खरं तर बघायला गेलं तर अतिशय साधी वाटणारी ही घटना. केवळ सव्वा मिनिटांत संपते. पण तरीही लक्षात राहते. आईचं ममत्व हे कशाशी ही तोलता येणारच नाही याचं उदाहरण म्हणजे हा व्हिडियो. वेळ आली की एरवी शांत असणारी गोमाय सुद्धा आक्रमक होते म्हणतात. निसर्ग आणि मायेची किमया सगळी. आपल्या टीमला तर हा व्हिडियो आवडला आणि आपल्या वाचकांना यावर वाचायला मिळावा असं वाटलं. त्यातूनच हा लेख आकारास आला आहे. आपल्याला हा लेख आवडला असेल, अशी अपेक्षा आहे. तसेच तुम्ही नेहमीप्रमाणे हा लेखही मोठया प्रमाणावर शेअर कराल हे नक्की. आपल्या या पाठींब्यामुळे आपल्या टीमला नवनवीन विषयांवर लिहिण्याची ऊर्जा मिळते आणि उत्साह टिकून राहतो. तेव्हा येत्या काळात आपला हा पाठिंबा कायम टिकवून ठेवा. आपला लोभ कायम असावा ही सदिच्छा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *