जरा कल्पना करा, जर तुम्ही मैदानात फिरायला, खेळायला किंवा पिकनिकसाठी गेलात आणि अचानक उडणाऱ्या नोटा पाहिल्या तर ? सर्वांना वाटेल कि आम्ही कोणते स्वप्न सांगत आहोत, परंतु हे कोणते स्वप्न नाही तर सत्य आहे. खरंतर केरळ येथील पलक्कड जिल्ह्यातील कोट्टयाय येथे त्यावेळी सर्व हैराण झाले जेव्हा एका खेळाच्या मैदानात पैसे उडत असल्याची बातमी पसरली. खरंतर ह्या ५०० आणि १०००च्या नोटा होत्या, ज्या आता बंद झालेल्या आहेत. सर्वात अगोदर ह्या नोटांवर तिथे खेळत असलेल्या लहान मुलांची नजर गेली. मुलांनी समजूतदारपणा दाखवत ह्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. परंतु जेव्हा पोलिसांनी ह्या घटनेचा संपूर्ण तपास केला तेव्हा सर्वांना हैराण करणारे सत्य समोर आले.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ह्या नोटा केरळ येथील पलक्कड मध्ये राहणाऱ्या ८० वर्षीय वृद्ध महिलेच्या होत्या. ह्या वृद्द महिलेकडून ५०० आणि १००० च्या नोटा जप्त केल्या आहेत. खरंतर ह्या वृद्ध महिलेचे पैसे काही कारणास्तव पावसात भिजले होते. त्यामुळे नोटांना सुकवण्यासाठी तिने त्या मैदानात ठेवल्या होत्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चार वर्षाअगोदरच २०१६ मध्ये सरकारने नोटबंदी केली होती. ज्यात जुन्या ५०० आणि १००० च्या नोटांवर सरकारने बंदी घातली होती. पोलिसांची टीम जेव्हा ह्या घटनेचा संपूर्ण तपास करण्यासाठी पोहोचली तेव्हा त्यांनी त्या वृद्ध महिलेच्या घराचासुद्धा तपास केला. पोलिसांना त्यांच्या तपासात कळले कि ती वृद्द महिला एकटीच आपले जीवन जगत आहे, ह्याशिवाय तिचे तिच्या कोणत्याच नातेवाईकांसोबत संपर्क नाही आहे. इतकंच काय तर तिच्या घरात येण्याची परवानगीसुद्धा ती कोणाला देत नव्हती.
ह्या महिलेचे नाव थथा असून तिच्या जवळ ३० हजार रुपयांपर्यंत नोटा आहेत ज्या तिने जमा करून ठेवल्या होत्या. वृद्ध महिलेच्या म्हणण्यानुसार तिला २०१६ मध्ये झालेल्या नोटबंदी बद्दल कोणतीच माहिती नव्हती. पोलिसांच्या तपासात हि गोष्ट सुद्धा समोर आली कि हे पैसे त्या वृद्द महिलेच्या खऱ्या कमाईचे आहेत, ज्यांना तिने काम करून मेहनतीने कमावलेले आहेत. त्या महिलेच्या म्हणण्यानुसार तिने हे पैसे लोकांच्या इथे काम करून, भंगार विकून तसेच मेहनत करून कमावले होते. तपस करणाऱ्या टीमच्या म्हणण्यानुसार ह्या महिलेजवळ एक जुने बँक खाते आहे, परंतु त्याचा उपयोग तिने खूप वर्षांपासून केलेले नाही आहे. ती जे काही कमावून आणत होती, ती एका पोत्यात टाकत होती, हे पोटंच तिच्यासाठी बँक होती. महिलेने आपल्या कोणत्या नातेवाईकांना सुद्धा नाही सांगितले होते कि ती अश्याप्रकारे पैसे जमवून ठेवते ते. हि संपूर्ण घटना जेव्हा समोर आली तेव्हा स्थानिक नेता आणि लोकं समोर आले आणि त्यांनी वृद्ध महिलेला हा विश्वास दिला कि तिला जेव्हा सुद्दा पैश्यांची गरज लागेल तेव्हा तिची मदत केली जाईल. आश्चर्याची गोष्ट अशी कि अश्या अनेक घटना समोर येत आहेत ज्यात अनेक निर्धन लोकं आहेत ज्यांना नोटबंदी बद्दल काहीच माहिती नव्हती आणि आता त्यांना पैसे बदलून घ्यायचे आहे. सरकारने ह्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे.