प्राण्यांचे खूप अनोखे आणि मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होतात, जे पाहून प्रेक्षकांना खूप आनंद होतो. कधी कधी इंटरनेटवर अशा गोष्टी पाहायला मिळतात ज्या प्रेक्षकांनी याआधी कुठेही पाहिल्या नसतील. यामध्ये प्राण्यांचे व्हिडीओ सर्वाधिक पसंत केले जातात. खोडकर आणि हुशार प्राण्यांची यादी केली तर माकडाचे नाव सर्वात आधी येतं. त्यामुळे इंटरनेटवर माकडांचे व्हिडीओ रोज धुमाकूळ घालत आहेत. आजही आम्ही तुम्हाला माकडाचा एक अतिशय भारी आणि एकीचे बळ दाखवणारा व्हिडीओ दाखवणार आहोत. ज्यामध्ये अनेक माकड एकत्र आल्यावर काय होऊ शकते, हे दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही एकीचे बळ या धड्याची आठवण होईल, हे नक्कीच. माकड हे इतर प्राण्यांच्या तुलनेत फारच हुशार असतात. त्यामुळेच बहुदा माकड हेच माणसाचे पुर्वज असावेत असं म्हटलं जातं. माकडं अतिशय चंचल आणि खोडकर असतात.
तुम्ही अनेकदा माकडांना पर्यटकांचे खाद्यपदार्थ चोरताना किंवा त्यांच्याकडून वस्तू हिसकावून घेताना पाहिलं असेलच. यासंबंधित अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या मात्र माकडांच्या अनोख्या गुणांचा एक जबरदस्त असा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. माकडाकडचा हा गुण माणसांनी घ्यावा, असाच आहे. आपण माणसे एकत्र येऊ शकतं नाही, मात्र माकडांनी एकत्र येऊन चक्क एका भल्या मोठ्या अजगराशी लढून दाखवले आहे. माकड माणसांची हुबेहूब नक्कल करण्यात हुशार आहे हे तुम्हाला माहितीच आहे, पण या व्हिडीओत माकडांनी जे केले आहे, त्याची नक्कल माणसांनी करण्याची गरज आहे. वेळोवेळी संकटात आपल्याला माणसांना साथ देण्याची एकत्र येण्याचा गुण माणसात पण येवो, असेच हा व्हिडीओ पाहून वाटते. या व्हायरल व्हिडीओत आपल्यालादिसून येईल की, जंगलातील काही माकडे मोठ्या प्रमाणात एकत्र झालेली आहेत. आणि ती रागीट व आक्रमक झालेली आहेत, असेही दिसून येते. आणि पुढच्या क्षणाला आपल्याला त्यांच्या रागाचे कारण कळते.
याठिकाणी एक माकड अजगराच्या तावडीत सापडलेला दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका माकडाला अजगराने कसं पकडलं आणि त्याला कशा पद्धतीने फस्त केलं. आपली शिकार कशीही करून गिळण्याची क्षमता अजगरामध्ये असते. या व्हिडीओमध्येही तो तसाच प्रयत्न करत आहे. अजगराने या माकडाला पूर्णपणे गुंडाळून ठेवलं होतं. हे पाहून तिथले आजूबाजूचे सारेच माकड जमा होऊ लागले. आपल्यातल्या एका माकडाला अजगराने पकडून ठेवलंय हे पाहून एक एक करत माकडसेना त्याच्या मदतीला पुढे येताना दिसून येत आहेत. कुणी माकडाची शेपूट ओढून तर कुणी त्याचे हात ओढत अजगराच्या तावडीतून सोडण्याचा प्रयत्न करू लागतात. माकडाच्या बचावासाठी आलेली माकडसेना पाहून अजगरही त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. पण ही माकडसेना हूशारीने माकडाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. आणि अखेर या माकडाची अजगराच्या तावडीतून सुटका करतात.
बघा व्हिडीओ :