Breaking News
Home / बॉलीवुड / अजय देवगणच्या नंतर ह्या बॉलिवूड स्टारच्या प्रेमात वेडी होती रविना टंडन

अजय देवगणच्या नंतर ह्या बॉलिवूड स्टारच्या प्रेमात वेडी होती रविना टंडन

९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये अशा काही निवडक अभिनेत्र्या होत्या, ज्यांची चर्चा नेहमी बॉलीवूडमध्ये होत असे. त्यांचे लाखो चाहते होते आणि आपल्या प्रेमळ अदांनी त्या चाहत्यांना वेड लावायच्या. ह्यात सर्वात जास्त चर्चा रवीना टंडनची होती. रवीना टंडनने १९९१ मध्ये “पत्थर के फूल” या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आणि त्यानंतर, तिच्या सौंदर्याची जादू अशाप्रकारे चालली की, बघता बघता ती बॉलिवूडमध्ये टॉपच्या अभिनेत्रींनपैकी एक बनली. ९० च्या दशकात रवीना जितकी प्रसिद्ध झाली, तितकेच तिचे नाव अनेक कलाकारांशी जोडले गेले. अभिनेता अजय देवगनने “फूल और कांटे” या अ‍ॅक्शन चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. रवीना आणि अजयची मैत्री झाली आणि अजयने रवीनाला डेट करण्यास सुरवात केली. पण अजय आणि रवीना यांचे नाते फार काळ टिकले नाही.

१९९१ व्या वर्षी बॉलीवूड मध्ये आणखी एका अप्सरेने पाऊल ठेवले. ती कपूर घराण्याची मुलगी, करिश्मा कपूर होती. १९९१ मध्ये करिश्माने “प्रेम कैदी” या चित्रपटात एन्ट्री केली होती आणि १९९२ मध्ये करिश्मा आणि अजय “जिगर” या चित्रपटात एकत्र आले होते. अजय आणि करिश्माची जवळीक वाढली आणि अजयने रवीनाला सोडून करिश्माचा हात पकडला. १९९४ मध्ये रवीनाचे नाव बॉलीवूडच्या दुसर्‍या स्टारशी जोडल्या गेले होते. तो बॉलिवूड स्टार इतर कोणीही नसून खिलाडी अक्षय कुमार होता. १९९४ मध्ये रवीना आणि अक्षय कुमार यांची “मोहरा” या चित्रपटाच्या सेटवर भेट झाली होती. शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांना आवडायला लागले. मोहरा सुपरहिट झाला आणि हे दोघे एकमेकांच्या आणखी जवळ आले. यानंतर अक्षय आणि रवीना यांनी मोहरा, खिलाडियों का खिलाडी, कीमत, दावा अश्या चित्रपटांत एकत्र काम केले. दोघांची जोडी ऑन-स्क्रीन खूप मजा करत होती आणि दोघांची जोडी रील लाईफ बरोबरच रिअल लाईफ जोडी बनली होती.

रवीना आणि अक्षय बर्‍याच ठिकाणी एकत्र दिसत. काही दिवसांनी त्या दोघांचा साखरपुडा झाली. रिपोर्ट्सनुसार रवीनाने अक्षयसाठी चित्रपटसृष्टी सोडण्याचा विचार पण केला होता. रविनाने दिलेल्या मुलाखतीनुसार अक्षयने तिला सांगितले कि, ज्या दिवशी ती हा चित्रपट सोडेल त्याच दिवशी ती त्याच्याशी लग्न करेल. रवीना आणि अक्षय यांच्यात सर्वकाही व्यवस्थित चालू होते कि, अचानक एक बातमी आली की त्यांच्या नात्यात पेच फुटला. १९९६ मध्ये ‘खिलाडियों का खिलाडी’ या चित्रपटात अक्षय आणि रविना यांनी एकत्र काम केले पण या चित्रपटात बॉलिवूडची आणखी एक सुंदर अभिनेत्री होती आणि ती रेखा होती. अक्षयचे नाव चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रेखाशी जोडली गेले होते. रेखा आणि अक्षयच्या जवळीक वाढण्याच्या बातमीमुळे रवीना खूप नाराज झाली होती. यानंतर रविना आणि अक्षयचे नातं तुटले. आणि नंतर रवीनाने एका मुलाखतीत सांगितले की, तिला अक्षयवर प्रेम नाही.

काही वर्षानंतर रवीनाने असे पण सांगितले की, तिने अक्षयला रेखा आणि सुष्मितासोबत पाहिले होते. इतकेच नव्हे तर तिने अक्षय फ्रॉड असल्याचे पण सांगितले होते. ती असं पण म्हणाली की, अक्षय सर्वप्रथम मुलींना लग्नाचे आमिष देऊन त्यांच्यासोबत साखरपुडा करतो. अक्षयने दोन मुलींशी साखरपुडा केले असल्याचा आरोपही रवीनाने केला. पण अक्षयने या नात्याबद्दल कधीही कोणाला काही सांगितले नाही. तसेच रवीनाच्या कोणत्याच गोष्टीचे त्याने कधीच उत्तर दिले नाही. पण त्यानेही रवीनासोबत दुरावा बनवला होता. त्यामुळे एकेकाळी नेहमी एकत्र दिसणारी ही जोडी कायमचे तुटून गेली.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *