Breaking News
Home / बॉलीवुड / अजय सोबत भेट झाली नसती तर शाहरुख सोबत लग्न केलं असतं का, काजोलने दिले उत्तर

अजय सोबत भेट झाली नसती तर शाहरुख सोबत लग्न केलं असतं का, काजोलने दिले उत्तर

कोणत्याही बॉलिवूडच्या चित्रपटात प्रामुख्याने दोन व्यक्ती महत्वाच्या असतात. त्या म्हणजे एक चित्रपटाचा मुख्य अभिनेता आणि अभिनेत्री. जो पर्यंत हे दोघे धडाकेबाज अभिनय करीत नाहीत तो पर्यंत चित्रपट चालण्याचे चान्स खूप कमी असतात. पण चांगल्या अभिनया बरोबरच मुख्य गोष्ट गरजेची असते ती म्हणजे दोघांमधे चांगली केमिस्ट्री असणे. तेव्हा प्रेक्षक चित्रपट आवडीने बघतात. बॉलिवूड मधे खूप जोड्या आल्या आणि गेल्या पण 90 व्या दशकातील ही जोडी लोकांना खूप पसंत येते. ती जोडी म्हणजे – शाहरुख खान आणि काजोल. बाजीगर, कुछ कुछ होता है, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कभी ख़ुशी कभी गम, माय नेम इज खान, दिलवाले अशासारखे खूप हिट चित्रपट या जोडीने दिले. ज्यात काजोल आणि शाहरुख खान या जोडीची ऑनस्क्रिन केमिस्ट्री लोकांना खूप आवडली. जेव्हा जेव्हा हे दोघे ऑनस्क्रिन एकत्र दिसले तेव्हा ते चित्रपट सुपर डुपर हिट झाले. 90 च्या दशकात तर लोक रियल लाईफ मधे शाहरुख खान आणि काजोल या दोघांना पती पत्नी मानत होते. अशातच लोकांच्या मनात प्रश्न येतो निर्माण होतो की जर या दोघांनी लग्न केलं असतं तर किंवा या दोघांने लग्न का केले नाही?

एक मोठं कारण म्हणजे शाहरुख खानने चित्रपटात येण्या अगोदरच गौरी बरोबर लग्न झाले होते. तसं तर फिल्म इंडस्ट्री मधे घटस्फोट घेऊन नवीन लग्न करणे नवीन गोष्ट नाही. हे फिल्म इंडस्ट्री मधे चालतच असते. म्हणून काही फॅन्सच्या मनात असा प्रश्न उठणे साहजिक आहे, की जर काजोलला अजय देवगण भेटला नसता तर काजोलने शाहरुख सोबत लग्न केला असता? या प्रश्नाचे उत्तर स्वतः काजोलने दिले. भावांनो उत्तरही असे दिले सर्व बघतच राहिले. इंस्टाग्राम वर काजोलने Ask Me Anything ( ‘मला काहीही विचारा’ )असा एक सेक्शन ठेवलं होतं. यात काजोलने फॅन्सला शब्द दिला की तुम्ही मला कोणताही प्रश्न विचारा, मी त्याचे नक्की उत्तर देईन. अशातच या संधीचा फायदा उचलून एका युजरने एक प्रश्न विचारला. जर तू अजयला भेटली नसलीस तर शाहरुख सोबत लग्न केले असतेस का? लक्षात ठेवा तुम्ही सांगितले होते सर्व प्रश्नांची उत्तरे देईन. बस आपलं वचन पाळून प्रश्नाचे अप्रतिम उत्तर दिले.

शाहरुख सोबतच्या लग्ना बद्दल काजोलने खूप छान उत्तर दिले. काजोलने आपले उत्तर देताना लिहिले होते की “प्रपोज करणे पुरुषांचे काम आहे ना?” म्हणजे खूप चातुर्याने काजोलने प्रश्नाचे जाळ शाहरुख वर टाकली. तिचा इशारा असा होता जर अजय मला जीवनात आला नसता तर लग्ना साठी प्रपोज करण्याचे काम शाहरुखचे असते. पण या गोष्टीने हे कळले नाही की जरी शाहरुखने प्रपोज केले असते तरी काजोलने त्याला काय उत्तर दिले असते? कजोलही हि गोष्ट जाणते की शाहरुख पहिल्या पासूनन विवाहित आहेत. आणि तो त्याच्या पत्नी जवळ प्रामाणिक आहे. अशातच त्याचा काजोलला प्रपोज करणे शक्य नव्हते. तसेही दोघेही खूप चांगले मित्र आहेत. त्यांची मैत्री पवित्र आहे. पण जर शाहरुख अविवाहित असते तर काजोल आणि शाहरुखच्या लग्ना विषयीविचार करणे योग्य असते.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *