प्रमुख खेळाडू ज’खमी झाले असताना संघातील इतर खेळाडूंनी हार न मानता अजिंक्य राहणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम केला. फक्त भारतातीलच नाही तर विश्वातील क्रिकेट खेळणाऱ्या विविध देशांतील लोकांकडुन भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. त्यात दिग्गज क्रिकेटपटुंनी देखील मनापासून तारीफ केली. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यंत जिंकल्या गेलेल्या सर्वोत्तम ५ सिरीज विजयांपैकी हि सिरीज असल्याचे बहुतेक दिग्गज क्रिकेटपटूंनी मान्यदेखील केले. सोशिअल मीडियावर देखील भरतीय क्रिकेट संघांवर स्तुतीसुमने उधळली जात आहे. गुरुवारी राहणे सोबत शार्दूल ठाकूर, पृथ्वी शॉ, रोहित शर्मा, रवी शास्त्री ह्यांचे मुंबई विमानतळावर जोरदार स्वागत झाले. जर इतकं सर्व देशभरातून आणि परदेशातून होत असेल तर खेळाडूंच्या राहत्या घरासमोर राहणारे मित्रमंडळी आणि चाहते गप्प बसतील, असं होऊच शकणार नाही.
गुरुवारी मायदेशी परतल्यावर मुंबईतील त्याच्या राहत्या घरी चाहत्यांनी आणि मित्रमंडळींनी जल्लोषात स्वागत केले. व्हिडिओमध्ये अजिंक्य आपल्या लहान मुलीसोबत चाहत्यांमधून जाताना दिसत आहे. अजिंक्यच्या घराखाली आणि आजूबाजूच्या परिसरात शेजारील मंडळी आणि चाहते बाहेर येऊन स्वागतासाठी जमा झालेले आहेत. ‘आला रे आला.. अजिंक्य आला…’ ह्या घोषणा देत चाहते त्याच्यावर पुष्पांचा वर्षाव करत आहेत. त्याचसोबत पारंपरिक ढोल ताशे वाजवत आपला आनंद देखील व्यक्त करत आहेत. त्यासाठी खास ढोल ताशा पथक बोलावण्यात आले होते. शेजाऱ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण असून अजिंक्यला पाहण्यासाठी आणि हा क्षण कॅमेरा-मोबाईलमध्ये कैद करताना देखील लोकं दिसत आहे. दरवेळी वेगवेगळ्या घोषणा देत अजिंक्यवर फुलांचा वर्षाव करत चाहते आपला आनंद साजरा करताना दिसत आहेत. आम्ही खाली व्हिडीओ देत आहोत नक्की पहा. त्याचसोबत केक सेलिब्रेशन करतेवेळी अशी एक घ’टना घडली ज्यातून अजिंक्यची खिलाडूवूत्ती पुन्हा एकदा दिसून आली. तो सुद्धा व्हिडीओ आम्ही खाली देत आहोत.
पहिला व्हिडीओ अजिंक्यचे स्वागत होताना :
घडलं असं कि चाहत्यांनी स्वागत केल्यानंतर सोसायटीतील लोकांनी सेलिब्रेशन म्हणून केक मागवण्यात आला होता. ह्या केकवर कांगारू प्राण्याची प्रतिकृती होती. कांगारू म्हणजे ऑस्ट्रेलियाचे प्रतीक. ऑस्ट्रेलियाला हरवलं म्हणून चाहत्यांनी कांगारू असलेला खास केक सेलिब्रेशन साठी बनवला होता. हा केक चाहत्यांनी अजिंक्यला क’ट करण्यास सांगितला. परंतु कांगारू हा आस्ट्रेलिआचा राष्ट्रीय प्राणी असून त्याची प्रतिकृती असलेला केक का’पणे रहाणेला योग्य वाटले नाही. त्यामुळे त्याने खिलाडूवूत्ती दाखवत हा केक का’पण्यास नकार दिला. रहाणेच्या ह्या कृतूमुळे सर्वांची मने जिंकली. हा व्हिडीओ जसजसा वायरल होत गेला, तसे चाहत्यांनी देखील त्याच्या ह्या खिलाडीवूत्तीचे कौतुक केले. काहींनी म्हटले ‘एकच हृदय आहे, किती वेळा जिंकणार.’ खरंच अजिंक्यने मैदानाबाहेर दाखवलेल्या ह्या खिलाडीवृत्तीला सलाम. तसेच त्याच्या करिअरमधील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
दुसरा व्हिडीओ केक सेलिब्रेशन :