Breaking News
Home / मनोरंजन / अतिउत्साहात स्टेजवर गाणे गाताना उड्या मारत होती महिला, पण पुढे जी फजिती झाली ते पाहून हसू आवरणार नाही

अतिउत्साहात स्टेजवर गाणे गाताना उड्या मारत होती महिला, पण पुढे जी फजिती झाली ते पाहून हसू आवरणार नाही

सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. काही व्हिडीओंना पाहून आपण हैराण होतो. तर काही व्हिडीओंमुळे आपण पोट धरून हसायला लागतो. सध्या एक अतिशय मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी खळखळून हसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागे एक किरकोळ कारण आहे मात्र कारण छोटं असलं तरी लोक मात्र हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसत आहेत. स्टेजवर असणाऱ्या लोकांना एकप्रकारे हुरूप असतो. अगदी एखादा नेता जरी बोलायला उठला तरी भावनेच्या भरात तो लोकांना एवढा बोर करतो की लोक भाषण सोडून जातात आणि मग होते ती फजिती… हेच कलाकार मंडळींना पण लागू होते. गायन, नृत्य किंवा इतर कुठलीही कला सादर करायला कलाकार स्टेजवर गेले की, मग ते उत्साहात येतात आणि उत्स्फूर्तपणे असे काही करतात की, ज्यामुळे सगळ्यांसमोर स्वतःची फजिती करून घेतात.

सोशल मीडियावर या ना त्या कारणाने व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ खळखळून हसायला भाग पाडतात. तर काही व्हिडीओ पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसतो. कधी कधी व्हिडीओ चित्रित करताना एखादी गोष्ट घडते आणि ती वाऱ्यासारखी पसरते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान कलाकार सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकतील. पण कधी-कधी चांगले काम करत असताना विचित्र घटना घडते. असंच काहीसं स्टेजवर नाचणाऱ्या एका महिलेसोबत घडलं आणि एकच धावपळ उडाली.

व्हायरल व्हिडिओत आपल्याला दिसून येईल की, हा व्हिडिओ एका कार्यक्रमादरम्यान रेकॉर्ड करण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला सभागृह प्रेक्षकांनी भरलेला दिसेल. मोठा स्टेजही तयार आहे. यावर एक महिला गाणे गात आहे. गाणं सुरु होताच लोक त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. प्रेक्षकही या गाण्याचा आनंद घेताना दिसत आहे. दरम्यान त्या गायिका अजून उत्स्फूर्तपणे गाणी गायलं सुरुवात करतात. पुन्हा लोक टाळ्या वाजवतात. आता त्यांचा आत्मविश्वास आणि उत्साह दोन्ही वाढलेला असतो. आता पुढे त्यांचे गाणे बदलते मात्र उत्साह, उर्मी तीच राहते. लोकंही त्यांच्या गाण्याला दाद देत असतात. गाणं जरा भारी आणि नाचण्याजोग असल्याने त्या आता गाण्यावर डान्स करतील की काय? असे आपल्याला वाटून जाते. आणि अचानक गाणं म्हणता म्हणता या गायिका नाचू लागतात.

एकतर कधी नाचण्याची सवय नसल्याने आणि अचानक उत्स्फूर्तपणे नाचू लागल्याने त्या मागे पुढे काही बघत नाहीत. बर या गायिका साधं नाचत नाहीत तर चक्क उड्या मारून नाचू लागतात. आणि त्या नाचत असताना मागचा पुढचा काही अंदाज न घेता शेजारी असलेल्या मोठ्या साऊंडला धक्का लागून जोरदार खाली आपटतात. हे पाहून काही लोक त्यांना वाचवण्यासाठी धावतात. एक व्यक्ती तर थेट लोकांमधून धावत येऊन त्यांना उचलतो.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये या गायिका गाणं गाताना अतिशय उत्साही असल्याचं दिसतंय. त्यांचा गाणं पाहण्यासाठी बाजूचे लोकही आतूर झाले आहेत. बाजूला बसलेले लोक त्यांना टाळ्या वाजवून प्रोत्साहित करत आहेत. मात्र, मध्येच मोठा घोळ झाला आहे. डान्स करत असताना गायिका साऊंडला लागल्या आणि त्यांचा तोल गेला. तोल गेल्यामुळे या गायिका अचानकपणे खाली आदळल्यामुळे त्यांची चांगलीच फजिती उडाली आहे.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *