१९९४ मध्ये विश्वसुंदरीचा मान मिळालेली ऐश्वर्या राय आज बच्चन परिवाराची सून आहे. २० एप्रिल २००७ ला तिने अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन याच्याशी लग्न केले. त्यांची एक मुलगी आहे आराध्य बच्चन. वर्तमानात ऐश आपल्या वैवाहिक जीवनात खूप खुश आहे. अभिषेकशी लग्न करण्या अगोदर तिचे अनेकांबरोबर संबंध तुटले आहेत. एक अभिनेत्री असल्यामुळे तिचे अनेकांशी असलेले प्रेम प्रकरण गाजली आहेत. राजीव मुलचंदानी पासून सलमान खान आणि विवेक ओबेरॉय पर्यंत तिचे नाव जुळले आहे. या सगळ्यांबरोबर जेव्हा ती प्रेम प्रकरणात होती तेव्हा ती खूप चर्चेत होती. तुमच्या पैकी बहुतेक जणांना त्या बद्दल माहिती असेलच. पण ऐश्वर्या चे नाव अजून एका व्यक्ती बरोबर जोडले आहे ज्या बद्दल खूप जणांना माहिती आहे. आता पर्यंत या विषयावर कुठेही बोलले जात नाही. खरतर, हि व्यक्ती दुसरी कोणी नसून धीरूभाई अंबानी ह्यांचा लहान मुलगा अनिल अंबानी आहे. सलमान आणि विवेक बरोबर ब्रेक अप केल्यानंतर या दोघांची माहिती समोर आली आहे.
अनिल अंबानी बरोबर नातं जोडल्याने भडकली ऐश
सामान्यतः ऐश्वर्या आपल्या वैयक्तिक आयुष्य बद्दल बोलताना सहजपणे सामोरी जाते. परंतु जेव्हा २००४ मध्ये एक मुलाखती दरम्यान अनिल अंबानी आणि त्यांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारला गेला तेव्हा ती खूप भडकली होती. तिने या अफवा बद्दल सांगितले कि, मी बसल्या बसल्या विचार करते कि माझं नाव मसालेदार बातम्या बनवण्यासाठी का वापरलं जाते. जेव्हा मला या अफवां बद्दल कळले तेव्हा मी आश्चर्यचकित झाले. मी त्यांना (अनिल अंबानी) कधी तरीच भेटते. ऐश्वर्या पुढे सांगते कि, “शेवटचे आम्ही दोघे भारत शाह च्या वाढदिवसाला भेटले होते. तेव्हा आम्ही टेबल वर तीन अन्य लोकांबरोबर बसलेले. मला हे ऐकून धक्का बसला कि लोक बोलतात माझे त्यांच्या बरोबर करोडो रुपयांचे prenuptial agreement आहे. हॅलो ! काय तुम्ही माझ्या बद्दल बोलत आहेत?”
हि काही पहिली वेळ नाही आहे कि, कोणत्या अभिनेत्रीचे नाव जबरदस्ती कोणाबरोबर जोडले गेले आहे. सिनेसृष्टीत अशा प्रकारच्या अफवा खूप सामान्य गोष्ट आहे. अनेकवेळा प्रसिद्दी मिळविण्यासाठी मीडिया सेलिब्रिटीज मध्ये नातं जोडते. जसे आताची गोष्ट कराल तर ऐश्वर्या अभिषेक बच्चन बरोबर लग्न करून खूप खुश आहे. तसेच दुसरीकडे अनिल अंबानी हे त्यांची पत्नी टिना अंबानी सोबत चांगले वैवाहिक जीवन जगत आहे.
तसेही कधी तुम्ही अनिल अंबानी आणि ऐश्वर्या राय प्रेम प्रकरणा बद्दल ऐकले होते का ?