Breaking News
Home / बॉलीवुड / अनिल कपूरने अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीला ह्यामुळे ५० टक्के संबोधले होते

अनिल कपूरने अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीला ह्यामुळे ५० टक्के संबोधले होते

सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार ऍक्शनच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आले आणि आज हे जिथे कुठे आहेत ते आपल्या मेहनतीच्या जोरावर आहेत. अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी जेव्हा सुरुवातीला बॉलिवूडमध्ये आले होते तेव्हा ते चित्रपटात ऍक्शन करायचे. ऍक्शन व्यतिरिक्त जेव्हा ते चित्रपटात अभिनय करायचे तेव्हा त्यांच्या अभिनयाची तुलना फर्निचर, सोफा, टेबल ह्यांच्याशी केली जायची. ह्याउलट एकदा अनिल कपूर ने ह्या दोघांना ५० टक्के संबोधले होते. तर आजच्या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत केव्हा अनिल कपूरने अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी ह्यांना ५० टक्के संबोधले, का त्याने त्यावेळी असे म्हटले, आणि नंतर कसे ह्या दोघांच्या टॅलेंटला त्याने मानलं. गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा दिगदर्शक राजीव राय जवळ एक चित्रपट होता आणि तो त्या चित्रपटासाठी २ ऍक्शन हिरोच्या शोधात होता. ह्या अगोदर त्याने ह्या चित्रपटासाठी अनिल कपूर आणि अजय देवगण ह्यांना सुद्धा विचारले. परंतु काही कारणास्तव हे दोन्ही अभिनेते ह्या चित्रपटाचा भाग बनु शकले नाही. हा चित्रपट होता ‘मोहरा’. राजीव राय ह्यांनी ह्या चित्रपटासाठी शेवटी अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीला घेतले.

गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा दिग्दर्शक राजीव राय ‘विश्वात्मा’ आणि ‘त्रिदेव’ नंतर एका नवीन चित्रपटावर काम करत होते. सर्वांना माहिती होते कि राजीव राय ह्यांचे त्यावेळी फेव्हरेट अभिनेते सनी देओल, जॅकी श्रॉफ आणि नासिरुद्दीन शाह. त्यांनी ह्यांनाच घेऊन अगोदर चित्रपट बनवले होते. परंतु ह्यावेळी ते वेगळे अभिनेते घेणार होते म्हणून ह्या चित्रपटासाठी त्यांनी अनिल कपूरला विचारले. अनिल कपूर त्यावेळी इतर चित्रपटांमध्ये व्यस्त होता म्हणून तो ह्या गोष्टी टाळत गेला. परंतु अनिल कपूरने कधीच ह्या चित्रपटासाठी तारखा दिल्या नाहीत. त्यामुळे राजीव राय ह्यांनी ह्या चित्रपटामध्ये अनिल कपूरला घेण्याचे मन बदलले. ह्यानंतर त्यांनी दुसऱ्या रोल साठी अजय देवगणला सुद्धा विचारले. अजय देवगण सुद्धा त्यावेळी त्याच्या इतर चित्रपटात व्यस्त असल्या कारणाने त्याने सुद्धा ह्या चित्रपटासाठी नकार दिला. त्याचा फेव्हरेट अभिनेता सनी देओल सुद्धा त्यावेळी खूप व्यस्त होता त्यामुळे त्याने सुद्धा ह्या चित्रपटासाठी नकार दिला. त्यामुळे त्यांनी ह्या चित्रपटासाठी शेवटी अक्षय कुमारला साईन केले. त्याच्या काही दिवसांअगोदर अक्षय कुमारचा सुनील शेट्टी सोबत ‘वक्त हमारा है’ हा चित्रपट आला होता. त्या चित्रपटातली दोघांची केमिस्ट्री पाहून ह्यावेळी राजीव रायने आपल्या चित्रपटात सुद्धा अक्षय कुमार सोबत सुनील शेट्टीला घेतले.

हा चित्रपट होता ‘मोहरा’ आणि चित्रपटाची मुख्य अभिनेत्री होती रविना टंडन. चित्रपटाची कास्टिंग पूर्ण झाली होती आणि चित्रपटाच्या शूटिंगला सुद्धा सुरुवात झाली होती. त्यानंतर एकदा राजीव राय आणि अनिल कपूर एका पार्टीत भेटले. तेव्हा अनिल कपूरने राजीव रायला विचारले कि तुमच्या त्या चित्रपटाची प्लॅनिंग कशी चालू आहे. आता काही संधी असेल तर मी तो चित्रपट करू शकतो. तेव्हा राजीव राय ह्यांनी सांगितले कि ह्या चित्रपटाची कास्टिंग झाली आहे. मी अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीला चित्रपटात घेतले आहे. चित्रपटाची शूटिंग सुद्धा केव्हाच चालू झाली आहे. ह्यावर अनिल कपूरने राजीव रायला उत्तर दिले कि सनी देओल आणि जॅकी श्रॉफ काय पळून गेले होते का, जे तुम्ही ह्या ५० टक्के ऍक्टर्सना घेऊन चित्रपट बनवत आहेत. हे दोन्ही हिरो ५० टक्केच्या बरोबरचे आहेत. आणि हे दोन्ही हिरो मिळून फक्त एका हिरोचेच काम करू शकतात. त्यावेळी अनिल कपूरची हि गोष्ट ऐकून राजीव कपूरने त्याला कोणतेच उत्तर दिली नाही.

कारण त्यावेळी अनिल कपूर एक मोठा स्टार होता आणि त्यांना आपलं नातं खराब करायचं नव्हतं. परंतु ‘मोहरा’ चित्रपट जेव्हा रिलीज झाला तेव्हा खूप मोठा हिट झाला. चित्रपटाच्या रिलीजनंतर अनिल कपूरला सुद्धा कळले कि बॉलिवूडमध्ये फक्त अनिल कपूर, सनी देओल आणि जॅकी श्रॉफच स्टार नाही आहेत, अजून एक मोठा स्टार मिळाला आहे बॉलीवूडला, तो म्हणजे अक्षय कुमार. मजेची गोष्ट म्हणजे पुढे जाऊन त्याच अनिल कपूरने अक्षय कुमार ज्याला त्याने ५० टक्के बोललं होतं त्याच्याच सोबत पुढे जाऊन अनेक चित्रपटात कामे केली. जसे कि ‘बेवफा’, ‘हम को दिवाना कर गए’, ‘टशन’ आणि ‘वेलकम’. आणि ह्या सर्व चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता तर अनिल कपूर सहाय्य्क अभिनेत्याच्या भूमिकेत होता. ह्याशिवाय सुनील शेट्टीला तर अनिल कपूरने स्वतः आपल्या होम प्रोडक्शन चित्रपट ‘नो प्रॉब्लेम’ मध्ये सुद्धा घेतले होते. तर आजच्या लेखात आपण पाहिले कि कश्याप्रकारे एकदा अनिल कपूरने सुनील शेट्टी आणि अक्षय कुमारला ५० टक्के संबोधले होते, पुढे जाऊन ह्या दोघांना १०० टक्के मानलं.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *