८० च्या दशकातील सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री रीना रॉय आपल्या काळात नेहमी चर्चेत असायची. रीना रॉय आणि सोनाक्षी सिंहा हिचे वडील शत्रुघ्न सिन्हा दोघांचेही अफेअर खूप काळ चालले होते. आपल्या मनमोहक अदांनी सर्वाना वेड लावणारी रीना रॉय लग्नानंतर गायबच झाली आहे आणि झगमगती दुनियेपासून दूर कुठेतरी अनोळखी आयुष्य जगत आहे. आपल्या अप्रतिम सौंदर्याने वेड लावणारी लोकप्रिय अभिनेत्री रीना रॉयची अशी दशा झाली आहे कि आता तिला फोटोंमध्ये ओळखायला सुद्धा कठीण होईल. मीडियाचा कॅमेरा बॉलिवूड सेलिब्रेटींच्या आसपासच फिरत असतो आणि सेलिब्रेटी खूपच कमी वेळा ह्या कॅमेरापासून वाचतात. ह्याच दरम्यान ८० च्या दशकातली लोकप्रिय अभिनेत्री रिना रॉय कॅमेरामध्ये कैद झाली, ज्यांनी जवळजवळ सर्वच मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. आता अभिनेत्री रीना रॉय ह्यांचे फोटोस पाहून ओळखू यात नाही आहे. रिना रॉय ह्यांना एका पार्टी मध्ये पाहण्यात आले होते, एकेकाळी सुंदर कमनीय बांधा असलेल्या रीना रॉयचे वजन खूपच वाढले आहे.
रिना रॉय आता वयासोबतच खूप वजन असलेली महिला दिसू लागली आहे. आणि तिला ओळखणेही खूप कठीण झाले आहे. आणि असं होणं सुद्धा स्वाभाविकच आहे. कारण त्यांचे वय आता ६० च्या वर झाले आहे. जास्त काळापर्यंत शत्रुघ्न सिन्हा सोबत अफेअरनंतर जेव्हा शत्रुघ्न ह्यांनी दुसरे कुठेतरी लग्न केले तेव्हा रीना ने पाकिस्तानी क्रिकेटर मोहसीन खान ह्याला आपला जीवन साठी बनवले आणि साल १९८३ मध्ये लग्न केले. मोहसीन खान ह्याने काही हिंदी चित्रपटांत सुद्धा काम केले आहे. लग्नाच्या काही वर्षानंतरच दोघांचे घटस्फोट झाले आणि रीना रॉय आपली मुलगी सनमला घेऊन भारतात आली. आता ती आपल्या मुलीसोबत मुंबईमध्ये राहते. साल १९७२ मध्ये आलेल्या ‘जरुरत’ चित्रपटातून रिना रॉयने पर्दापण केले होते. ह्या चित्रपटात तिने अनेक भडक दृशे दिली होती. अगोदर तर रिनाने ह्या दृश्यांसाठी नकार दिला होता, परंतु करिअर बनवण्याचे आकांशाने तिने मग होकार दिला. खरंतर तिला १९७३ मध्ये आलेल्या ‘जैसे को तैसा’ ह्या चित्रपटातून लोकप्रियता मिळाली, ज्यात तिने जितेंद्र सोबत केलेल्या रेन डान्सने धुमाकूळ घातला होता.
‘जैसे को तैसा’ चित्रपट सुपरहिट झाला. त्यानंतर रिना रॉयने ‘नागीन’ चित्रपटांत काम केले. हा चित्रपट खूप गाजला होता. ह्या चित्रपटांत तिने साकारलेली नागीनची भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती. त्यानंतर तिने ‘जानी दुश्मन’, ‘नशीब’, ‘बदले कि आग’, ‘कालिचरण’, ‘हथकडी’, ‘प्यासा सावन’, ‘आशा’ ह्यासारख्या सुपरहिट चित्रपटांत काम केले. ‘कालिचरण’ चित्रपटापासून रिना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा ह्यांचे अफेअर्स सुरु झाले आणि रिना शत्रुघ्नच्या प्रेमात वेडी झाली होती. शत्रुघ्न सिन्हांनी रिना रॉय ला लग्नासाठी प्रपोज सुद्धा केला होता. शत्रुघ्न ह्यांनी एका मुलाखतीत आपले आणि रिनासोबत नातं असल्याच्या बातमीचा स्वीकार सुद्धा केला होता. शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले होते कि, “रीना सोबत माझं नातं आहे. मी खूप नशीबवान आहे कि, तिने आपल्या जीवनातील ७ वर्षे माझ्या नावे केले.” परंतु त्याच दरम्यानच्या काळात १९८० मध्ये शत्रुघ्न सिन्हा ह्यांनी कोण्या वेगळ्या महिलेसोबत लग्न करून सर्वांना चकित केले होते.