अबबब…. हा शब्द ऐकून किंवा वाचून अनेकांना बराच काळ लोटला असेल. पण आजचा हा लेख अशा एका वायरल व्हिडियो बद्दल आहे जो पाहून पोटात गोळा आणि तोंडात अबबब…. असं आल्याशिवाय राहणार नाही. हा वायरल व्हिडियो आहे एका लग्नाच्या पंगतीतला. लग्नाची पंगत म्हणजे गंमतच गंमत. एकेकाची खाण्याची तऱ्हा तर वेगवेगळी असतेच सोबतच प्रत्येकाने ताटात जे जे खाद्यपदार्थ वाढून घेतलेले असतात त्याचाही काही तोड नाही. काहींना पापड खूप आवडतात, तर कोणाला भातच जास्त लागतो. पण एक पदार्थ मात्र या सगळ्यांना पुरून उरतो. गुलाबजाम. हाय… नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं असा हा पदार्थ. अस्सल खवय्ये असाल किंवा नसाल पण लग्नात हक्काने गुलाबजाम खाल्ले असतीलच. पण आमच्या टीमने जो व्हिडियो पाहिला त्यातील एका दादांनी एका मिनिटात ज्या प्रकारे गुलाबजाम फस्त केले आहेत त्याला तोड नाही.
व्हिडियो सुरूच होतो तो या दादांना केंद्रस्थानी धरून. कारणही तसंच असतं. या दादांनी आपल्या ताटात जवळपास २२ गुलाबजाम घेतलेले असतात. एवढे गुलाबजाम एकाच ताटात दिसल्यावर कोणता कॅमेरामन दुसरं ताट दाखवील बरं. पण तोपर्यंत दादांचं काही लक्ष नसतं. त्यांना आवडणाऱ्या गुलाबजाम वर लक्ष केंद्रित करून दादा घास घ्यायला सुरू करतात. खरं तर एक घास एक गुलाबजाम या नात्याने त्यांचं काम चालू असतं. पण मध्येच कोणी तरी त्यांना व्हिडियो रेकॉर्ड करण्याबाबत सांगत, तेव्हा त्यांना या कॅमेरामन ची जाणीव होते. मग काय अजून उत्साहात दादा पटापट त्या गुलाबजामांचा निक्काल लावायला लागतात. आपल्याला आश्चर्य वाटत राहतं कारण अवघ्या एका मिनिटांत हे दादा जवळपास १३ गुलाबजाम फस्त करतात. गुलाबजाम कितीही गोड वाटत असला तरी काही वेळाने त्याचा कंटाळा येऊ शकतो. पण अस्सल खवय्ये असणाऱ्यांना मात्र ही पर्वणीच.
हे दादा म्हणजे अस्सल खवय्येच. ते ज्या आवडीने हे गुलाबजाम संपवतात त्याला तोड नाही. त्यांना सलाम. पण त्याचसोबत एवढे गुलाबजाम खाल्ल्यावर दादा, तब्येतीची पण काळजी घ्या बरं का, हे सांगावंसं वाटतं. तसेच आपल्या सगळ्या वाचकांना एक विनंती. हा लेख वाचून किंवा तत्सम व्हिडियोज बघून आपणही असं काही धाडस करायला जाऊ नये. याचं कारण आपल्या देशात आणि परदेशातही काही केसेस अशा ही झाल्या आहेत जिथे लागोपाठ खाणं खाल्याने जीवावर बेतलं आहे. तेव्हा आपल्याला जमेल, प्रकृतीला झेपेल आणि त्यामुळे आपलं काही नुकसान होणार नाही असं मनापासून जेवा, खा आणि मजा करा. सोबतच काय कराल. अगदी बरोब्बर. हा लेख शेअर करा. तसेच आपल्या टीमने लिहिलेले अन्य लेखही नक्की वाचा. आपल्या वेळेसाठी धन्यवाद !!!
बघा हा व्हिडीओ: