Breaking News
Home / मराठी तडका / अभिनेता अनिकेत विश्वासराव ह्याची पत्नी आहे हि सुंदर मराठी अभिनेत्री

अभिनेता अनिकेत विश्वासराव ह्याची पत्नी आहे हि सुंदर मराठी अभिनेत्री

‘ब्रेक अप के बाद’ ह्या गाण्यातून आणि ‘फक्त लढ म्हणा’ चित्रपटातून लोकप्रिय झालेला अभिनेता अनिकेत विश्वासराव मराठी चित्रपटसृष्टीत एक उत्कृष्ट अभिनेता आणि चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. अनिकेतचा जन्म ७ मे १९८१ मध्ये मुंबईत झाला, त्याने मुंबईतील बोरिवली येथील सेंट फ्रान्सिस दि असिसी हायस्कुलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले, तर विलेपार्ले येथील एम. एल. डहाणूकर कॉलेजमधून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. कॉलेजमध्ये असताना त्याने अनेक नाट्यस्पर्धांमधून पारितोषिके मिळवली. अनिकेतने अल्फा मराठी वरील ‘नायक’ ह्या सिरीयल मधून पर्दापण केले होते, त्यानंतर ‘झी मराठी’ वरील ‘ऊनपाऊस’ ह्या मालिकेतील त्याची सागरची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. तेव्हापासूनच तो तरुणींमध्ये जास्त लोकप्रिय होत गेला.

अनिकेत आणि स्नेहा दोघांचेही गेल्याच वर्षी १० डिसेंबर २०१८ ला पुण्यात लग्न झाले. जास्त गाजावाजा न करता पुण्यामधील गुलमोहर लॉन्समध्ये दोघांचे कुटुंब, जवळील नातेवाईक, मित्र आणि चित्रपटसृष्टीतील काही कलाकार ह्यांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह झाला. त्या अगोदर ५ डिसेंबर २०१८ ला पुण्यातील हिंजवडी मध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता. स्नेहा चव्हाण मूळची पुण्याची. स्नेहाने सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट डान्सर’ ह्या रिऍलिटी शो मध्ये भाग घेतला होता. ह्याव्यतिरिक्त ‘हृदयात वाजे समथिंग’ ह्या मालिकेत काम केले आहे. तिने स्वप्नील जोशीसोबत ‘लाल इष्क’ ह्या चित्रपटात काम केले आहे. स्नेहा आणि अनिकेत दोघांनीही ‘हृदयात वाजे समथिंग समथिंग’ ह्या चित्रपटात एकत्र काम केलेले आहे. अनिकेत आणि स्नेहा दोघांचेही अरेंजमॅरेज झाले आहे. आपल्या लग्नाबद्दल स्नेहाला विचारल्यावर तिने सांगितले कि, आम्हा दोघांचे अरेंज मॅरेज असून आमचे अफेअर वैगेरे काहीच नव्हते. तसेच आम्ही एकमेकांना डेटदेखील केले नव्हते.

असं जमलं दोघांचं लग्न :

खरंतर, त्या अगोदर दोघांनी एकत्र ‘हृदयात वाजे समथिंग समथिंग’ हा सिनेमा सुद्धा केला होता. परंतु ते तेव्हा फक्त एकमेकांना ओळखत होते. ते फक्त सहकलाकार आणि फक्त मित्र होते. स्नेहाच्या घरचे स्नेहासाठी मुलगा शोधत होते. अनिकेतची मावशीसुद्धा स्नेहाच्या सोसायटीत राहते. स्नेहाची आई आणि अनिकेतची मावशी दोघेही मैत्रीणी असल्यामुळे स्नेहाची आई स्नेहासाठी मुलाच्या शोधात असल्याचे अनिकेतच्या मावशीला कळले. तेव्हा अनिकेतची मावशी स्नेहाच्या आईला म्हणाली कि, माझा पुतण्या अनिकेत साठी सुद्धा आम्ही मुलगी शोधत आहोत. त्याच्याशी स्नेहाबद्दल बोलून पाहू का, असे सांगितले. त्यानंतर स्नेहाची आई आणि अनिकेतची आई ह्या दोघांनीही ह्याबद्दल बोलून घेतले. त्यानंतर त्यांनी अनिकेत आणि स्नेहाला ह्याबद्दल कळवले. दोघांनी प्रथम फोनवर संभाषण केले. चित्रपटात एकत्र काम करत असल्यामुळे दोघेही एकमेकांना चांगले ओळखत होते. दोघानांही एकमेकांचा स्वभाव खूप आवडला आणि दोघांनीही विचार केले केला कि, अनोळखी व्यक्ती सोबत लग्न करण्यापेक्षा ओळखीच्या चांगल्या माणसासोबत आयुष्य घालवणे आणि एकाच क्षेत्रातील असल्यामुळे जीवनसाथी म्हणून एकमेकांचा विचार तर नक्कीच करू शकतो, असे समजून ह्या नात्याला नवीन नाव द्यायचे ठरवले.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *