सध्या करोना व्हायरसच्या नवीन अवताराने जगभरात आगमन केलेले आहे. त्यातही इंग्लंड देशात या नवीन अवताराचे रुग्ण जास्त आढळून आले आहेत हे आपण पाहतोच आहोत. त्यामुळे लंडन आणि बाकीच्या भागांमध्ये पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत. अनेक देशांची इंग्लंडशी असलेली हवाई वाहतूक सध्या याच कारणामुळे बंद आहे. त्यात भारताचाही समावेश आहे. त्यामुळे काही भारतीय हे तिथेच अडकले आहेत. यात काही जण कामानिमित्त तेथे गेले होते. यात मनोरंजन क्षेत्रातील कालाकारांचाही समावेश आहे. आपल्या मराठी चित्रपटांचं शूटिंग ही तिथे चालू असल्याने काही प्रसिद्ध मराठी कलाकारही तिथे अडकले आहेत. त्यात अभिनेता संतोष जुवेकर याचा समावेश आहे.
काही काळापूर्वी संतोष जुवेकर हा एका चित्रपटाच्या निमित्ताने लंडन येथे गेलेला आहे. संतोषच्या या चित्रपटाचं नाव डेटभेट असं आहे. या चित्रपटात हेमंत ढोमे, सोनाली कुलकर्णी हे कलाकारसुद्धा आहेत असं कळतं तसेच लोकेश गुप्ते हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. यातील सर्व कलाकार हे मायदेशी भारतात परत आले होते, तर मित्रांना भेटायचं म्हणून संतोष पाठी राहिला होता असं त्याच्या सोशल मीडिया पोस्ट मधून कळतं आहे. रिंकु राजगुरू ही सुद्धा या ‘छुमंतर’ या तिच्या आगामी चित्रपटासाठी लंडन येथे गेली होती. ती तिथेच अडकल्याची बातमी होती. पण टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार रिंकू ही मायदेशी परतली आहे असं कळतं आहे. मराठी कलाकारांप्रमाणेच हिंदी आणि हॉलिवूड मधील आघाडीची नायिका प्रियांका चोप्रा हीसुद्धा लंडन येथे असल्याचं कळतं आहे. एका हॉलिवूड चित्रपटाच्या निमित्ताने प्रियांका तिथे असल्याचं कळतं आहे. नुकताच तिने तिच्या नवऱ्यासोबत म्हणजेच निक जोनास सोबत एक मस्त फोटो अपलोड केला आहे, ज्याला ‘ख्रिसमस स्पिरिट’ असं नाव तिने दिलं आहे. तसेच सिनेअभिनेता आफताब शिवदासानी हा सुद्धा लंडन येथे गेला होता. बायको आणि मुलीला भेटण्यासाठी तो गेला होता आणि आता लॉक डाऊनमुळे तिथेच अडकला आहे असं कळतं. या कलाकारांपैकी संतोष जुवेकर याने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातुन सद्य परिस्थितीवर आपलं म्हणणं मांडलं आहे.
बघा व्हिडीओ