मराठी कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातल्या जोड्या या प्रेक्षकांच्या आकर्षणाचा आणि आवडीचा विषय. गेल्या काही काळात अनेक मराठी कलाकारांनी साखरपुडे आणि लग्नं केल्याने याविषयीच्या अनेक बातम्या चाहत्यांना वाचता आल्या. या सगळ्या जोड्यांत एका जोडीचं नाव अगदी अग्रक्रमाने पुढे येत होतं आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये त्यांच्या लग्नाविषयी उत्सुकता लागून राहिली होती. लोकप्रिय मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याच्या प्रेयसी ह्या दोघांचे लग्न कधी एकदाचे होणार, असं चाहत्यांना झालं होतं. ही जोडी २०२१ मध्ये लग्न करणार हे नक्की झालं होतं पण केव्हा ह्याची उत्सुकता लागून राहिली होती. ती उत्सुकता आता संपते आहे. कारण लवकरच या जोडीचा विवाह सोहळा संपन्न झाला आहे. आमच्या नियमित वाचकांनी ओळखलं असेलंच.
होय आम्ही सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या जोडीविषयी बोलत आहोत. गेले काही वर्षे ही दोघेही एकमेकांसोबत रिलेशनशिप मध्ये होती. त्यांचं ‘टायनी पांडा’ हे इंस्टाग्राम अकाउंट ही प्रसिद्ध झालं होतं. या जोडीने साखरपुडा केला आणि त्यांच्या लग्नाचे वेध लागले होते. हे लग्न २०२० मध्ये होणार असं वाटत असताना को’विड आणि मग लॉक डाऊन यांच्यामुळे हे लग्न पुढे ढकललं गेलं. एका अर्थाने चाहत्यांनी खूप काळ वाट पाहिली ते हे लग्न होय. अशा या लग्नाच्या ज्याला इंग्रजीत आपण ‘मोस्ट अवटेड’ लग्न म्हणू, त्याच्या विधींना नुकतीच सुरवात झाली. ग्र’हमख ह्या विधीचे फोटो सिद्धार्थ चांदेकर याने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलेले आहेत. गेला काही काळ, या जोडीला अनेक कलाकार मित्र मैत्रिणींनी केळवणास बोलावले होते. त्यामुळे लग्न लवकरच होणार हे लक्षात आलं होतं आणि तो दिवस आला. २४ जानेवारी २०२१ ला प्रेक्षकांचे लाडके ‘tiny panda’ विवाह बंधनात अडकले. या दिवशी सई ताम्हणकर, उमेश कामत या मातब्बर सेलिब्रिटीज नी हजेरी लावली होती.
तसेच या लग्नाच्या आधी हळद आणि संगीत हे कार्यक्रम खूप छान पद्ध्तीने रंगले. या जोडीने यात इतक्या उत्साहाने भाग घेतला की इतर सहभागी वऱ्हाडी मंडळीही उत्साहात होती. या उत्साहात संगीत हा कार्यक्रम होत असताना सिद्धार्थ आणि मिताली यांनी विविध गाण्यांवर ताल धरला. एका गाण्यात त्यांच्यासोबत इतर वऱ्हाडी मंडळीही गाण्यावर ताल धरताना दिसली होती. त्याआधीचा हळद समारंभ ही उत्तम रीतीने पार पडला. त्या समारंभातही सेलिब्रिटीजचा वावर होता. उदयोन्मुख अभिनेत्री गायत्री दातार हिची उपस्थिती लक्षणीय ठरली होती. तसेच ईशा केसकर, ऋतुजा बागवे, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे हे कलाकारही उपस्थित होते. हा सोहळा पुण्यात एका वाड्यात पार पडला. लग्नसोहळ्यासाठी केलेली तयारी ही अतिशय उत्तम आणि आकर्षक होती. एकदम राजेशाही थाटात हा विवाह सोहळा संपन्न झाला. या दोघांच्या विवाहाचे फोटोज आपल्याला त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरती पाहायला मिळतात.
या फोटोज वरही अनेक सेलिब्रिटीज आणि या जोडीच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे. गेल्या वर्षा दोन वर्षात सिद्धार्थ आणि मिताली या जोडीच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली होती. खासकरून त्यांचा साखरपुडा झाल्यानंतर. पण गेल्या वर्षी करोना आणि पाठोपाठ आलेल्या निर्बंधांमुळे त्यांचं लग्न पुढे ढकललं गेलं. पण आज मात्र या प्रतिक्षेची कसर भरून काढत अगदी आनंदात आणि जल्लोषात हा लग्नसोहळा पार पडला. सिद्धार्थ आणि मिताली यांचा एक खूप मोठा चाहता वर्ग आहे आणि त्याचा एक छोटासा भाग म्हणजे मराठी गप्पाची टीम. आमची टीमही या चाहते म्हणून या दोघांच्या लग्नाच्या आनंदात सहभागी आहे. आमच्या कडून या लाडक्या जोडीला, त्यांच्या सुखी, आनंदी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !