मराठी गप्पाच्या माध्यमांतून आपण मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या आपल्यासाठी सातत्याने आणत असतो. आमच्या टीमने तयार केलेल्या लेखांना प्रचंड वाचकसंख्येच्या माध्यमांतून आपला जो अमाप प्रतिसाद मिळतो, त्याबद्दल धन्यवाद. आज या लेखातून एका लोकप्रिय पण प्रसिद्धी पासून दूर असणाऱ्या जोडीबद्दल जाणून घेणार आहोत. ही जोडी आहे क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांची. क्रांती यांना आपण त्यांच्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी सजलेल्या कलाकारकिर्दिसाठी ओळखतोच. त्यांनी जत्रा, खो-खो ह्यासारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांत काम केलेले आहे. तीन वर्षाअगोदरच त्यांचे प्रसिद्ध व्यक्तीशी लग्न झाले. चला तर जाणून घेऊया ह्या जोडीबद्दल.
क्रांती रेडकर ह्यांच्या पतीचे नाव समीर वानखेडे. आय.आर.एस. असलेल्या समीर यांना आपण त्यांच्या धडाकेबाज कारकिर्दीसाठी ओळखतो. हे दोघेही लग्नाअगोदार एकमेकांना ओळखत होते. २०१७ साली त्यांचं लग्न झालं. काहीच काळापूर्वी या जोडीला जुळी कन्यारत्ने झाली आहेत. समीर हे २००४ सालच्या आय.आर.एस. बॅच चे अधिकारी. आजपर्यंत त्यांनी अनेक वरिष्ठ पदांवर कार्यरत राहून कामगिरी बजावली आहे. त्यांच्या अधिपत्याखाली केल्या गेलेल्या कामांची नोंद प्रथितयश वृत्तपत्रांनीही वेळोवेळी घेतली आहे. आय. आर. एस. बनल्यानंतर त्यांची मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवर पहिली पोस्टिंग झाली होती. येथे डेप्युटी कस्टम कमिश्नर म्हणून ते कार्यरत होते. त्यांची योग्यता आणि कामाप्रती असलेली निष्ठा पाहून आंध्र प्रदेश आणि नंतर दिल्लीमध्ये के ससाठी त्यांना पाठवले गेले. समीर ह्यांना ड्र-ग्ज आणि न-शेसंबंधी घटनांसाठी स्पेशालिस्ट मानले जाते. समीर ह्यांनी नेहमीच आपल्या कामाच्या आगळ्या वेगळ्या स्टाईलने सर्वाना प्रभावित केले आहे. ते खूपच स्मार्ट काम करतात. हेच कारण आहे कि त्यांच्याजवळ खूप मोठ्या केसेस सोपवल्या गेल्या. त्यांनी त्यांच्या का रवाई अंतर्गत मागील दोन वर्षांत जवळजवळ १७ हजार कोटी रुपयांच्या ड्र-ग्ज आणि न-शेच्या रॅकेटचे प्रकरण उघडकीस आणले.
सतर्क आणि सुगावा ह्यांच्या आधारावर समीर वानखेडे ह्यांना सध्या ना-र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मध्ये ट्रान्सफर केले गेले आहे. बॉलिवूडमध्ये सध्या गाजत असलेल्या ड्र-ग्ज प्रकरणात देखील समीर वानखेडे महत्वाची कामगिरी बजावत आहेत. ते बॉलिवूड कलाकारांची कसून चौ-कशी करत आहेत. त्याच सोबत २०१३ मध्ये मिका सिंग ह्याला मुंबई एअरपोर्ट वर कस्टम अधिकाऱ्यांनी परदेशी चालनासोबत पकडलं होतं. त्यावेळी समीर वानखेडे ह्यांनीच मिका वर का-रवाई केली होती. सध्या ही जोडी, आपापल्या कारकिर्दीत व्यस्त आहे. क्रांतीजी या अभिनय, दिग्दर्शक या भूमिकांतून आपल्याला सातत्याने भेटत असतात. तसेच त्या स्वतः एक बिझनेस वुमन आहेत. त्यांनी स्वतःचे दोन ब्रँड्स अगदी यशस्वीरीत्या प्रस्थापित केलेले दिसून येतात. नुकताच समीर यांचा वाढदिवस झाला. सहसा या दोघांचे एकत्र फोटोज शेअर केलेले दिसत नाहीत. पण वाढदिवसानिमित्ताने क्रांती यांनी समीर यांच्यासोबतचा एका समारंभादरम्यानचा व्हिडियो शेअर केला आहे. क्रांती यांनी या व्हिडियो मार्फत समीर यांच्या विषयी वाटत असलेलं प्रेम आणि अभिमान या पोस्ट मधून व्यक्त केलं आहे.
क्रांती यांच्या या व्हिडियो वर अनेकांनी कमेंट्स करून, समीर यांचे अभिष्टचिंतन केले आहे. यात अभिनेत्री अमृता खानविलकर, भार्गवी चिरमुले, प्राजक्ता माळी, सोनली खरे, क्षिती जोग, नेहा पेंडसे तसेच प्रसिद्ध सिने पत्रकार जयंती यांचा समावेश आहे. आपापल्या कारकिर्दीत मोलाचं योगदान देणाऱ्या या जोडीला पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून शुभेच्छा ! वर उल्लेख केल्याप्रमाणे, क्रांतीजी यांनी स्वतःचे ब्रँड्स प्रस्थापित केले आहेत. त्यांच्याप्रमाणे अन्य मराठी अभिनेत्रीही व्यवसाय क्षेत्रांत उतरत आहेत. त्याविषयी वेळोवेळी आमच्या टीमने सुंदर लेख लिहिलेले आहेत. आपल्याला ते लेख वाचायचे असल्यास वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करा. सर्च ऑप्शनमध्ये जाऊन, ‘बिझनेस’ असे सर्च केल्यास आपल्याला ते लेख मिळतील. आपल्या वेळेसाठी आणि मराठी गप्पाचे नियमित वाचक होण्यासाठी धन्यवाद !