बॉलिवूडच्या कलाकारांप्रमाणेच आता मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळी सुद्धा अभिनयक्षेत्रा व्यतिरिक्त आपले इतर व्यवसाय सांभाळताना दिसत आहेत. हि कलाकार मंडळी देखील अभिनयाव्यतिरिक्त आपल्या इतर छंदाचे व्यवसायात रूपांतर करू लागले आहेत. व्यवसायाचे महत्व त्यांनाही खूप चांगल्या पद्धतीने समजले आहे. मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे ह्यांनी स्वतःचे असे फॅशन ब्रँड तयार केले आहे. तर अभिनेत्री प्रिया मराठे हिने मीरा रोड येथे स्वतःचे कॅफे सुरु केले आहे. दुसरीकडे लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ ह्यांचा स्वतःच्या सारीचा ब्रँड आहे. त्याचप्रमाणे आता ह्या यादीत अजून एका अभिनेत्रीचे नाव जोडले गेलेले आहे. आणि त्या अभिनेत्रीचे नाव आहे प्रिया बेर्डे. प्रियाला आपल्या व्यवसाय सुरु करण्याअगोदर ह्या व्यवसायाची आवड निर्माण झाली ते अगोदर पाहूया. प्रियाला स्वयंपाकाची खूप आवड आहे. ती सगळ्या प्रकारचे पदार्थ उत्तम पद्धतीने बनवते. प्रिया स्वतः कोल्हापूरची असल्यामुळे तांबडा पांढरा रस्सा, सुके चिकन वैगेरे बनवण्याची सवय होती. प्रियाचे लहानपण ब्राम्हणांच्या वस्तीमध्ये गेल्यामुळे चिंचे गुळाची आमटी, बटाट्याची भाजी, पुरी, श्रीखंड, आळूचे गरगटे ह्या पासून ते सर्व गोष्टी तिला माहिती असल्यामूळे ती त्या गोष्टी बनवायला शिकली.
जेव्हा लग्न झाल्यानंतर त्या लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांच्या घरात आली तेव्हा बेर्डे ह्यांचे कुटुंब कोकणी असल्यामुळे कोकणी प्रकारचे व्हेज, नॉनव्हेज जेवण शिकली. प्रियाची नणंद भंडारी असल्यामुळे मग त्याप्रकारचे जेवण बनवायला शिकली. म्हणजेच सामान्यतः सर्व प्रकारच्या जेवणाचा प्रियाला अनुभव आहे. त्याचप्रकारे एखाद्या जेवणाची क्वांटिटी किती असावी आणि त्यानुसार क्वालिटी कशी ठेवायची हे सुद्धा प्रियाला माहिती आहे. त्याचबरोबर तिची मुले अभिनय आणि स्वानंदी सुद्धा उत्तम सायंपाक करतात. प्रियाची स्वयंपाकातील आवड आणि वेगवेगळे पदार्थ शिकणायची सवय ह्यामुळे प्रियाचे खूप स्वप्न होते कि, तिला काहीतरी करायचे आहे, हॉटेल काढायचे आहे. परंतु ते मुंबईत शक्य नव्हते. कारण त्यासाठी पूर्ण वेळ द्यावा लागणार होता. आणि प्रियाला कुटुंबाची जबाबदारी आणि अभिनयक्षेत्र ह्यामुळे इतकं शक्य नव्हते. त्यामुळे तिने पुण्यातील मित्र अमर गवळी, त्यांच्या पत्नी सायली गवळी ह्या दोघांना आपली हॉटेलविषयीची कल्पना सांगितली. ते जवळपास ५ ते ६ वर्षे फक्त जागेच्या शोधात होते. त्यांना हॉटेलसाठी योग्य जागा मिळत नव्हती. मुंबई, लोणावळा सर्व ठिकाणी शोधून पाहिले, परंतु त्यांना काही मनासारखी जागा नाही मिळाली.
त्यामुळे मग पुण्यातच जागा शोधण्याचा निर्णय घेतला. कारण पुण्यामध्ये जास्त खवय्ये आहेत, येथील लोकांना वेगवेगळ्या पदार्थांची चव घ्यायला आवडते. तिघांनी पुण्यात हॉटेल काढायचे ठरवले. त्यामुळे पुण्यातील बावधन येथील मराठा मंदिरजवळ ‘चख ले’ नावाचे हॉटेल उघडले. आजूबाजूची वस्ती आणि राहणारे लोक पाहून त्यांनी शुद्ध शाकाहारी पदार्थ ठेवले. येथील चव उत्तम आहे. येथे चहा बनमस्का पासून पावभाजी, छोले भटोरे, पंजाबी भाज्या, पनीर कढई, चायनीज ह्यासारख्या पदार्थे बनतात. सुरुवातीला हॉटेल व्हेज असल्यामुळे प्रियाची इच्छा होती कि, हॉटेल चांगले चालू लागल्यावर येथे नॉनव्हेज पदार्थे सुद्धा मिळायला हवीत. येथील लोकांना वेगवेगळ्या प्रकारची नॉनव्हेज डिश सुद्धा चाखायला मिळावी. हळूहळू हॉटेल चांगले चालू लागले. येथील खवय्यांना हॉटेलमधील पदार्थ खूप आवडू लागले. खवय्यांच्या वाढत्या मागणीमुळे हळहळू मग नॉनव्हेज पदार्थे सुद्दा येथे मिळू लागली. नॉनव्हेज मध्ये अंडा मसाला, मटण थाळी, चिकन थाळी, हैद्राबादी बिर्याणी ह्यासारखे पदार्थ मिळतात. प्रिया जेव्हा पुण्यात नसते तेव्हा अमर गवळी आणि त्यांच्या पत्नी सायली गवळी ह्या मुख्यतः हॉटेल सांभाळतात. ‘पप्पू डोसा’ हे येथील सर्वात लोकप्रिय पदार्थ आहे. ५ वेगवेगळ्या पिठांपासून हा पप्पू डोसा बनवला जातो. छोले भटुरे, व्हेज थाळी ह्यांना हॉटेलमध्ये जास्त मागणी आहे. येथील पदार्थांची चव चाखण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांवरून खवय्ये येतात. आणि ह्या हॉटेलमधील वेगवेगळ्या आणि चविष्ट पदार्थांची मागणी वाढल्यामुळे हॉटेलने देखील चांगलाच जम बसवला आहे. ह्याशिवाय प्रिया देखील आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळात वेळ काढून ह्या हॉटेलला भेट देत असते. प्रियाला तिच्या ह्या व्यवसायासाठी मराठी गप्पा कडून खूप खूप शुभेच्छा.