Breaking News
Home / मराठी तडका / अभिनेत्री प्रिया मराठे हिचा नवरा आहे प्रसिद्ध अभिनेता, खूपच रोमँटिक आहे प्रेमकहाणी

अभिनेत्री प्रिया मराठे हिचा नवरा आहे प्रसिद्ध अभिनेता, खूपच रोमँटिक आहे प्रेमकहाणी

आपण आत्ता पर्यंत अशा अनेक जोड्या मनोरंजन क्षेत्रात पाहिल्या ज्या कामानिमित्त एकत्र आल्या, प्रेमात पडल्या आणि पुढे लग्नही केलं. पण अशी एखादी जोडी तुम्हाला माहिती आहे का कि जी, प्रेक्षकांची फेवरीट जोडी तर आहे पण अजून एकत्र काम केलं नाहीये. पण जर ते एकत्र काम करायला आले तर नक्की धमाल येईल कारण त्यांच्या आयुष्यातील केमिस्ट्री इतकी नैसर्गिक आणि भन्नाट आहे कि विचारू नका. ती आपली लाडकी जोडी म्हणजे शंतनू मोघे आणि प्रिया मराठे. आज दोघेही आपल्या कामांमुळे मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. नुकतंच, शंतनू यांना आपण छत्रपती शिवराय यांची भूमिका मनापासून साकारताना, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेतून पाहिलं आहेच.

सध्या ते ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेतून शहाजी राजे भोसले यांची ऐतिहासिक व्यक्तिरेखा तेवढ्याच तन्मयतेने निभावताना दिसतील. प्रिया या सुद्धा ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेच्या काही काळासाठी भाग होत्या. पण दोघांचे एकत्र सिन्स न्हवते. असं असलं तरीही प्रिया या आपल्याला नवीन नाहीत. त्यांना आपण ‘या सुखांनो या’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’ या मराठी, तर ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘पवित्र रिश्ता’, ‘कॉमेडी सर्कस’ या हिंदी शोजसाठी ओळखतोच. तर अशा या प्रतिभावान जोडीची लवस्टोरी हि त्यांच्या अंदाजासारखीच मस्त आहे. शंतनू हे ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे यांचे चिरंजीव. आपलं इंजिनियरिंगचं शिक्षण संपवून ते मुंबईला आले. काम करता करता अभिनयासाठी ऑडीशन्स देत होते, कामं करत होते. त्याच दरम्यान प्रिया या मुंबईत कामानिमित्त रहात होत्या. त्या आपल्या दोन मैत्रिणींसमवेत रेंटवर घेतलेल्या घरात रहात होत्या.

त्यापैकी एक मैत्रीण म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री, शर्वरी लोहकरे. शर्वरी आणि शंतनू हे सिरीयलनिमित्त एकत्र काम करत होते. सिरियल्सचं काम म्हणजे शिफ्ट्स वेगवेगळ्या. अशावेळी शर्वरी यांना त्यांच्या घरी सोडायला ते येत असतं. प्रिया यांची भेट सुद्धा झाली होती. कळत-नकळत शंतनू यांना प्रिया आवडायला लागल्या होत्या. आता ओळख वाढवायची कशी म्हणून त्यांनी शर्वरी यांच्याकडून प्रिया यांचा फोन नंबर मिळवला. बोलणं सुरु झालं, मैत्री खुलली आणि घट्ट होत गेली. आपले खूप विचार जुळतात हे त्यांच्या लक्षात आलं आणि पाहता पाहता त्याचं प्रेमात रुपांतर झालं सुद्धा. काही काळ एकमेकांसोबत मित्र म्हणून घालवल्यावर त्यांनी २०१२ मध्ये विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.

पण हे बंधन न राहता, एक सुंदर अनुभव त्या दोघांसाठी झाला आहे. प्रिया यांचा गोड स्वभाव शंतनू यांना भावतो तर प्रिया यांना शंतनू यांचा समजूतदार आणि शांत स्वभाव. अगदी एकमेकांसाठीच बनले आहेत असं वाटणाऱ्या या जोडीने एकत्र अभिनय जरी केला नसला तरीही स्वतःचा एक कॅफे सूर केलाय. तरुणाईला डोळ्यामोर ठेऊन हा कॅफे त्यांनी बनवला आहे. याचं इंटिरियर अगदी उत्तम असल्याची चर्चा या कॅफेला भेट देणाऱ्यांमध्ये असते. अभिनय करता करता आपल्या आवडीनिवडी मनमोकळेपणाने जगताना हि जोडी दिसते आणि त्याचमुळे खऱ्या अर्थाने युथ आयकॉन ठरते. त्यानी अभिनयात अनेक शिखरं पादाक्रांत तर करावीतच, पण त्याच सोबत त्यांच्या कॅफेचा सुद्धा विस्तार अफाट व्हावा आणि हि जोडी प्रेक्षकांना सतत आनंद देत राहावी याच टीम मराठी गप्पाकडून या लोकप्रिय जोडीला मराठी गप्पा टीमकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.