Breaking News
Home / बॉलीवुड / अमिताभ बच्चन पेक्षा खूप जास्त श्रीमंत आहेत त्यांचा जावई, बघा किती आहे संपत्ती

अमिताभ बच्चन पेक्षा खूप जास्त श्रीमंत आहेत त्यांचा जावई, बघा किती आहे संपत्ती

चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय कलाकार अमिताभ बच्चन ह्यांना युगाचा महानायक म्हणून ओळखले जाते. हे जाणून तुम्हाला कदाचित आश्चर्य होणार नाही की अमिताभ बच्चन ह्यांचे चाहते केवळ भारतातच नाहीत तर संपूर्ण जगभरात सुद्धा आहेत. अमिताभ बच्चन ह्यांनी आपल्या करियरची सुरुवात ‘सात हिंदुस्थानी’ या चित्रपटाने केली. त्यानंतर त्यांनी केव्हाच मागे वळून पाहिले नाही. अमिताभ बच्चन ह्यांनी आपल्या करियरमध्ये एकापेक्षा एक असे अनेक हिट आणि लक्षात राहतील असे चित्रपट दिले. पण त्यांनी ‘दिवार’ आणि ‘शोले’ चित्रपटात तर असा अप्रतिम अभिनय केला, ज्यामुळे लोकं त्यांना विसरुच शकत नाहीत. हे चित्रपट केल्यानंतर अमिताभ बच्चन ह्यांचे नाव बॉलिवूडच्या सुपरहिट कलाकारांच्या यादीत गेले. अमिताभ बच्चन अजूनही चित्रपटात काम करताना दिसतात. हल्ली अमिताभ बच्चन सोनी टीव्ही वरच्या “कौन बनेगा करोडपती” शो ला होस्ट करत आहेत. आपण जाणता का की आजच्या वेळी अमिताभ बच्चन हे जवळजवळ २८०० कोटी रुपये इतक्या संपत्तीचे मालक आहेत. येवढ्या मालमत्तेचे मालक असून सुध्दा अमिताभ बच्चन ह्यांनी अजून काम करणे बंद केले नाही. आजही ते सतत काम करीत असतात.

आपल्याला ऐकून विश्वास बसणार नाही की, त्यांचा जावई याही पेक्षा श्रीमंत आहे. अमिताभ बच्चन ह्यांच्या मुलीचे नाव श्वेता आहे आणि ती प्रसिध्द उद्योगपती निखिल नंदा ह्यांची पत्नी आहे. निखिल नंदा भारतातील एक यशस्वी उद्योगपती आहेत. २२ वर्षा अगोदर १६ फेब्रुवारी १९९७ रोजी अमिताभ बच्चन ह्यांची मुलगी श्वेता बच्चन हिचे निखिल नंदा सोबत लग्न झाले होते. निखिल नंदा हे हिंदी चित्रपटसृष्टीचे लोकप्रिय अभिनेते आणि प्रोड्युसर राज कपूर ह्यांची मुलगी रितू नंदा आणि राजन नंदा ह्यांचा मुलगा आहे. निखिल ‘एस्कॉर्टस लिमिटेड’ कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. निखिल ह्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील उद्योगपती आहेत. ते २०१३ साली एस्कॉर्टस मध्ये मॅनेजिंग डिरेक्टर बनले. ते १९९७ पासूनच निर्देशक मंडळाचे प्रमुख सदस्य आहेत. त्यांनी अमिरिकेतील व्हार्टन बिजनेस स्कुल मधून बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले. निखिलकडे खूप जास्त संपत्ती आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे संपत्तीच्या तुलनेत निखिल हे आपल्या सासरा अमिताभ बच्चन ह्यांच्या सुद्धा पुढे आहेत. होय, सध्या अमिताभ बच्चन २८०० कोटी रुपये इतक्या संपत्तीचे मालक आहेत. आणि रिपोर्ट्सनुसार त्यांचे जावई निखिल नंदा ह्यांची संपत्ती जवळपास ३५०० कोटी रुपये इतकी आहे. निखिल नंदा ह्यांचे नाव मोठ्या मोठ्या बिझनेसमॅन मध्ये घेतले जाते. श्वेता आणि निखिल ह्यांना दोन मुले आहेत. मुलीचे नाव नव्या नवेली तर मुलाचे नाव अगस्त्या नंदा.

अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन जवळ २४८ करोडची मालमत्ता आहे. अभिषेक बच्चनने बॉलिवूड मधील प्रसिद्ध सिनेतारका ऐश्वर्या राय सोबत विवाह केलं. ऐश्वर्या रायने आपल्या बॉलिवूड करियर मधे एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण अभिषेक बच्चन बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही. अमिताभ बच्चनची पत्नी जया बच्चन ह्या सुद्धा एकेकाळी प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांच्या जवळ १००० कोटींची मालमत्ता आहे. जया बच्चन आजपर्यंतची सर्वात श्रीमंत राज्यसभा उमेदवार होऊ शकते. काही दिवस अगोदर जयाने चौथ्यांदा समाजवादी पार्टी कडून राज्य सभेच्या उमेदवार म्हणून अर्ज सादर केला होता. नॉमिनेशन भरण्यासाठी जयाने आपल्या आणि अमिताभ बच्चनच्या मालमत्तेची माहिती दिली होती. या माहिती आधारे जया आणि अमिताभ जवळ १००० करोड मालमत्तेचे मालक आहेत. पण आश्चर्य असं आहे कि, जयाने २०१२ च्या निवडणूकी वेळी ४९३ करोड मालमत्ता दाखवली होती. फक्त ६ वर्षात यांची मालमत्ता जास्त पटीने वाढली आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *