Breaking News
Home / माहिती / अमूलच्या बटरवर असणाऱ्या अमूल गर्लची हि कहाणी तुम्हांला माहिती आहे का

अमूलच्या बटरवर असणाऱ्या अमूल गर्लची हि कहाणी तुम्हांला माहिती आहे का

‘मिल्कमॅन ऑफ इंडिया’, ‘फादर ऑफ व्हाईट रिव्होल्यूशन इन इंडिया’ हे आणि अशाप्रकारचे अनेक नावांनी डॉ. वर्गीस कुरियन ओळखले जातात. हे डॉ. कुरीयन ह्यांचे भविष्यातील कल्पना होती ज्यांनी भारताला जगातील सर्वाधिक दूध उत्पादक देश बनवले. त्यांचा जन्मदिवस २६ नोव्हेंबर ‘नॅशनल मिल्क डे’ च्या रूपात सेलिब्रेट केला जातो. ते देशाचे प्रमुख ब्रँड ‘अमूल’ चे सहसंस्थापक आणि नॅशनल डेअरी डेव्हलोपमेंट बोर्डाचे संस्थापक होते. परंतु आजच्या लेखात डॉ. कुरियन बद्दल नाही तर त्यांची मुलगी म्हणजेच ‘अमूल गर्ल’ बद्धल जाणून घेणार आहोत, कारण ह्याची कहाणी सुद्धा खूपच मनोरंजक आहे.

आजच्या घडीला ‘अमूल गर्ल’ फक्त एक डेअरी प्रॉडक्टचा चेहरा नसून त्याची ओळख एक अशी चुलबुली मुलगी आहे जी प्रत्येक गोष्टीवर विनोद करते, मस्ती करते, गंभीर विषयांवर सुद्धा भाष्य करते. ह्या अमूल गर्लची लोकप्रियता देशापेक्षा सुद्धा विदेशात सुद्धा जास्त आहे. लाल आणि सफेद रंगाच्या ठिपक्यांच्या ड्रेसमध्ये दिसून येणारी ‘अमूल गर्ल’ आता ५३ वर्षांची झाली आहे. ह्यात कोणतीच शंका नाही कि बटरच्या जाहिरातीत दिसून येणारी ‘अतरली बटरली गर्ल’ नेच ‘अमूल’ ला एक ब्रँड म्हणून एक नवीन ओळख दिली. परंतु त्यामागची कहाणी सुद्धा खूप रंजक आहे.

‘पॉल्सन गर्ल’ला टक्कर द्यायला आली होती ‘अमुल गर्ल’

डॉ. कुरियन ‘अमूल’ चे संस्थापक जरूर होते, परंतु त्यांनी ‘अमूल गर्ल’ची रचना स्वतः केली नव्हती. होय, त्यांनी ‘अमूल गर्ल’ वर विश्वास नक्की ठेवला होता. हेच कारण होते कि २०१२ ला डॉ. कुरियन ह्यांच्या जाण्यानंतर सुद्धा ५३ वर्षांपासून ‘अमूल गर्ल’ कंपनीच्या जाहिरातीचा सर्वात प्रमुख चेहरा बनला आहे. मजेशीर गोष्ट हि सुद्धा आहे कि ‘अमूल गर्ल’ ला आणण्यामागे हे सुद्धा कारण आहे कि त्याकाळी बाजारात पहिल्यापासून ‘पॉल्सन’ डेअरी फार्म लोकप्रिय होती. पॉल्सन फर्म ची ‘पॉल्सन गर्ल’ ला टक्कर देण्यासाठी ‘अमूल’ फर्म विचार करत होते.

कंपनीने खूप मोठी केली अँडव्हरटायजींग एजन्सी

गोष्ट 1966 ची आहे, ‘अमूल बटर’ 10 वर्षा पासून बाजारात विकत होते. परंतु त्यावेळी डेअरी प्रॉडक्ट विकणारी कंपनी ‘पॉल्सन’ ची ‘पॉल्सन गर्ल’ खूपच लोकप्रिय होती. डॉ. कुरियन आपल्या प्रॉडक्टला काही करून कमी लेखू शकत नव्हते. व्यापार वाढवणे आणि प्रतिस्पर्धी कंपनीवर मात करणे जरुरी असते. अशातच अमूलने जाहिरात बनवणारी एजन्सी ASP (अँडव्हरटायजींग अँड सेल्स प्रमोशन) सोबत बैठक केली. एजन्सीचे आर्ट डायरेक्टर युस्टस फर्नांडीसला एक असे स्लोगन तयार करायला सांगितले कि जे प्रत्येक गृहिणींना आवडेल आणि पॉल्सन गर्ल ला टक्कर देऊ शकेल.

या दोन लोकांची कल्पना ‘अमूल गर्ल’

एएसपी चे कम्युनिकेशन चे प्रमुख ‘सिलव्हेस्टर दाकुन्हा’ आणि युस्टेस फर्नांडीसने ‘अमूल गर्ल’ ला तयार केले. डॉ. वर्गीस कुरियन ने दकुन्हाला ‘अमूल गर्ल’ बनवण्यासाठी पूर्णपणे सूट दिली होती. ‘अमूल गर्ल’ ला सगळ्यात पहिले मुंबईच्या बसवर पेंटिंग करून जागा दिली. रस्त्यावर होर्डींग्स लागायला सुरुवात झाली. ‘अमूल गर्ल’ ची पहिली जाहिरात 1966 मधे आली. नाव होते ‘थ्रुबेड’. परिस्थिती नुसार अमूल गर्लने खूप बदल केले. पण थीम तीच राहिली.

इमेर्जन्सीच्या वेळी बेभान राहिली ‘अमूल गर्ल’

‘अमूल गर्ल’ पॉप्युलर होण्यासाठी हळू हळू वेगवेगळ्या विषयाच्या आधारे कमेंट्स आणि कटाक्ष सुरु झाले. खास करून 90 च्या दशकात यावर जास्त लक्ष केंद्रित केलं गेलं. अमूल गर्लने राष्ट्रीय आणि राजनीतिक मुद्यांवर बोलणे सुरु केले आणि ते समाजाला आवडले. देशात इमर्जन्सीच्या वेळी ‘अमूल गर्ल’ चा हा अंदाज सुरु राहिला आणि तिने लोकप्रितेचा कळस गाठला. काळानुसार अंदाज बदलला, त्याच बरोबर टॅग लाईन सुद्धा.

‘अमूल गर्ल’ ची जाहिरात कैंपेन डिझाईन करणारी टीम फक्त तीन लोकांची होती. सिलव्हेस्टर दकुन्हा, युस्टर फर्नांडीस आणि उषा कतरक. 1969 मधे सिलव्हेस्टर ASP चे एकटे मालक बनले आणि नंतर कंपनीचा नाव बदलून ‘दाकुन्हा कम्युनिकेशन्स ‘ केला. त्याबरोबर ‘अमूल’ची टॅग लाईन बदलली पहिली ती ‘प्योरली द बेस्ट ‘ अशी होती. तिला बदलून त्यांच्या पत्नीच्या सांगण्या नुसार अटर्ली बटर्ली अमूल अशी ठेवण्यात आली.

 

मुलगा राहुलने ‘अमूल गर्ल’ ला केले प्रसार

सिलव्हेस्टर दाकुन्हा चा मुलगा राहुल आपल्या वडिलांना 90 साली जॉईंट झाला. आत्ता राहुल जाहिरातीचे काम पाहू लागले. राहुल म्हणतो की, वडिलांनी मला शिकवले कि, वादाच्या भोवऱ्यात कधीच फसू नकोस. पण प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन कर. राहुल कंपनीत आल्याबरोबर ‘अमूल गर्ल’ची जाहिरात जास्त येऊ लागली. पहिले 15 दिवसातून एकदा जाहिरात यायची, नंतर आठवड्यातून एकदा यायला लागली आत्ता तर आठवड्यातून 4 ते 5 वेळा जाहिरात येते.

तीन लोकांची टीम आणि त्यांची ‘अमूल गर्ल’

‘अमूल गर्ल’ आपली प्रसिद्धी, रचनात्मकता मुळे आपली लोकप्रियता वाढवत चालली आहे. अमूल ला दुनियातील खुप काळ चालणार ऍड कॅम्पेन मानले जाते. खास गोष्ट ही आहे आत्ता पर्यंतच्या काळात त्याच्या चवीत आणि रचनात्मकतेत काही फरक झाला नाही. राहुल दाकुन्हा शिवाय ऍड कॅम्पेन सांभाळणारी टीम मधे मनीषा जावेरी आहे. जी कॉपी रायटर आहे. ती मागील 22 -23 वर्षापासून याच्याशी जोडली आहे. जयंत राणे जो इलेस्टेटर आहे आणि अमूल गर्ल ला नवीन ढंगात सादर करतो. जयंत सुध्दा 30 वर्षा पासून दाकुन्हा सोबत आहेत.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *