Breaking News
Home / मनोरंजन / अमृता खानविलकरसोबत ह्या चिमुकलीने जो डान्स केला आहे तो पाहुन तुम्हीदेखील प्रशंसा केल्याशिवाय राहणार नाही

अमृता खानविलकरसोबत ह्या चिमुकलीने जो डान्स केला आहे तो पाहुन तुम्हीदेखील प्रशंसा केल्याशिवाय राहणार नाही

गेल्या काही महिन्यांत आपल्याला अनेक उत्तमोत्तम चित्रपट पाहायला मिळाले आहेत. त्यातही कोविड नियम थोडे शिथिल झाल्यामुळे बाहेर फिरण्याची मुभा मिळाली आणि सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहण्याची मजा पुन्हा घेता येऊ लागली. परिणामतः जे सिनेमे मुळातच उत्तम होते त्यांनी अतिशय जबरदस्त कामगिरी केली. यातही विशेष कौतुक करायला हवं ते आपल्या मराठी सिनेमांच ! आशयघनता हा आपल्या कलाकृतींचा गाभा असतोच. त्यामुळे मराठी सिनेमा पाहून झाल्यावर पैसा वसूल झाले असं वाटणं हे नेहमीचंच असतं. त्यात आता आपला सिनेमा कात टाकतोय.

आपल्या प्रेक्षकांना आवडणारे विषय अजून ताकदीने सादर केले जात आहेत. तसेच प्रेक्षकांच्या कक्षा ही रुंदवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो यशस्वी ही होतोय. याचं नजीकच्या काळातलं अप्रतिम उदाहरण म्हणजे चंद्रमुखी हा सिनेमा होय. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिस वर घवघवीत यश मिळवत सुरुवात केली. आजही हा लेख लिहीत असताना ही वाटचाल अगदी जोमाने चालू आहे. अनेक प्रथितयश कलाकारांनी या सिनेमाचं कौतुक केलेलं आहे. इतकंच काय तर महाराष्ट्र आणि भारतासोबतच चक्क यु. ए. ई. म्हणजे आखातात ही हा चित्रपट तुफान चालतोय.

तिथल्या प्रथितयश वृत्तसंस्थानी सुद्धा याची दखल घेतली आहे. यावरून ही वाढती लोकप्रियता लक्षात यावी. आपल्याकडे ही या सिनेमाची चर्चा आहेच. किंबहुना यातील गाणी, त्यावरील परफॉर्मन्स यांचं प्रतिबिंब आपल्याला सोशल मीडिया मधून पाहायला मिळतंय. अनेक ठिकाणी अमृता खानविलकर यांनी केलेल्या नृत्यांचे व्हिडियोज वायरल होताना दिसताहेत. अनेक जणं स्वतः सुद्धा अमृता यांचे हे डान्स परफॉर्मन्स स्वतः करून पाहताहेत. त्यातील एका लहानग्या मुलीचं तर विशेष कौतुक होतं आहे. कारण या मुलीने हा डान्स चक्क अमृता खानविलकर यांच्या समवेत केलेला आहे. या दोघींचा हा डान्स परफॉर्मन्स सध्या नेटकाऱ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. ‘चंद्रा’ या टायटल ट्रॅकवर या दोघींनी अप्रतिम असा परफॉर्मन्स दिला आहे. मूळ परफॉर्मन्स मधील सगळ्या स्टेप्स आपल्याला यात बघायला मिळतात. आता अमृता स्वतः असल्या की डान्स उत्तम होणार याची खात्रीच असते. त्यात या गोंडस पोरीची भर पडल्याने हा परफॉर्मन्स अजून गोड होतो. तसेच दोघींमधलं ट्युनिंग ही आपल्याला आवडून जातं. अर्थात अमृता या सराईत आणि अनुभवी नृत्यांगना असल्याने त्यांचं नृत्य मनात घर करून जातं आणि या चुणचुणीत मुलीचं नृत्य छाप पाडून जातं. या चुणचुणीत मुलीचं नाव वैष्णवी प्रजापती आहे. आपल्यापैकी काही जणं जर हिंदी मालिका बघत असतील तर त्यात आपण वैष्णवी हिला काही मालिकांमध्ये अभिनय करताना बघितलेलं असेल.

‘माँ’, ‘मेरे साई’ या तिने अभिनित केलेल्या मालिकांपैकी काही प्रातिनिधिक नावं आहेत. तसेच ती उत्तम डान्स ही करते. म्हणजे केवळ आताच हा व्हिडियो बघून नव्हे तर तिच्या आधीच्या डान्स परफॉर्मन्स वरून आम्ही हे म्हणतो आहोत. तिच्या युट्युबर चॅनेल वरील एका व्हिडियोला काही वर्षांपूर्वी तीन करोड व्ह्यूज मिळाले होते. यावरून आपल्याला तिच्या नृत्याच्या लोकप्रियतेची चुणूक दिसावी. तिने एका मालिकेत, अमृता यांचे अहो, म्हणजे हिमांशू यांच्या सोबत काम केलेलं आहे. तसेच वर उल्लेख केलेल्या अमृता, वैष्णवी या जोडीच्या व्हिडियोचं चित्रीकरण ही स्वतः हिमांशू यांनी केल्याचं कळतं. हा व्हिडियो म्हणजे चंद्रमुखी सिनेमाच्या वाढत्या लोकप्रियतेचं एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. या लेखाच्या निमित्ताने, येत्या काळात या सिनेमाची लोकप्रियता, चंद्राच्या लोकप्रियतेप्रमाणे कलाकलाने वाढतच जावो या आमच्या टीमकडून सदिच्छा !

बरं तर मंडळी हा होता आपल्या टीमने लिहिलेला आजचा लेख ! आपल्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *