Breaking News
Home / मनोरंजन / अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळी ह्यांनी मिळून केला जबरदस्त डान्स, पहा व्हिडीओ

अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळी ह्यांनी मिळून केला जबरदस्त डान्स, पहा व्हिडीओ

दळणवळणाची साधनं बदलत गेली आणि आपल्या आयुष्यात बराच बदल घडत गेला. तो आजही घडतो आहे आणि यापुढेही होत राहिल. या काळाने आपल्या आयुष्यातील सगळ्याच बाबींना स्पर्श केला. अगदी आपलं मनोरंजन ज्या पद्ध्तीने होत असे त्यात ही आमूलाग्र असे बदल होत गेले. एवढे की आज आपल्या मनोरंजनासाठी कित्येक माध्यमं आपल्यासमोर हात जोडून उभी असतात. आपणही त्यांचा आस्वाद घेत असतो.

पण हे सगळं होत असताना आपण आपल्या जुन्या मनोरंजन साधनांना विसरतो का ? कदाचित हो. काही प्रमाणात ते होतं. पण याच्यावर उपाय म्हणून जेव्हा नवीन माध्यमातून या जुन्या जाणत्या साधनांना संजीवनी दिली जाते आणि आपल्याला पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो. आता आपलंच उदाहरण घ्या ना. आपण कितीही प्रगत झालो तरी आपली आपल्या लोक कलेविषयी असलेली ओढ काही सुटत नाही. ढोलकीवरची थाप आजही आपल्या मनाला धुंद करून सोडते. लावणी बघताना आजही मन बेभान होतं. महाराष्ट्राच्या या लोककलेचं आपल्यावर असलेलं गारुडच वेगळं आहे. म्हणूनच की काय, स्वतः फडात जाऊन लावणी बघायला आपल्याला जेवढं आवडत, तेवढाच आनंद आपल्याला ती सिनेमाच्या मोठाल्या पडदयावर बघताना होतो. याची अनेक उदाहरणं आपल्याला जुन्या तसेच नवीन चित्रपटात बघायला मिळतील.

याच मांदियाळीत आता एका नवीन चित्रपटाची भर पडणार आहे. आपणही एव्हाना या चित्रपटाचे ट्रेलर आणि टिजर, पोस्टर्स बघितले असतील. बरोबर ओळखलंत. चंद्रमुखी हा तो चित्रपट आहे. यात एका लावणी कलाकार आणि एक राजकारणी व्यक्ती यांची प्रेम कहाणी बघायला मिळेल. अर्थात मुख्य व्यक्तिरेखाच लावणी नृत्य करणारी असल्याने, विविध लावणी नृत्य बघायला मिळणार हे नक्की ! त्यात सोने पे सुहागा म्हणजे यातील मध्यवर्ती भूमिका , लोकप्रिय अभिनेत्री, नृत्यांगना अमृता खानविलकर यांनी केली आहे. त्यांच्या अभिनय आणि नृत्याविषयी आपल्या सगळ्यांनाच कौतुक आणि अभिमान वाटतो. त्यांनी आपल्या नृत्याने गाजवलेलं ,वाजले की बारा हे गाणं विस्मरणात जाणं तसंही अशक्यच आहे. पण त्या जोडीला आता नवनवीन गाण्यांची आणि अमृताजींच्या डान्सची भर पडणार आहे. याचीच एक झलक काही काळापूर्वी आपल्या सगळ्यांना बघायला मिळाली. अमृताजी बहुधा त्यावेळी महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या मंचावर गेल्या होत्या. त्यावेळी अमृताजींनी आणि प्राजक्ता माळी यांनी बहारदार नृत्य केलं होतं. याचंच चित्रीकरण केलं गेलं आणि पुढे अपेक्षेप्रमाणे ते वायरल ही झालं. कारण अमृताजींसारख्याच प्राजक्ता या सुद्धा अप्रतिम डान्सर आहेत हे आपण जाणतो.

गेली कित्येक वर्षे त्या नटराजाची आराधना करताहेत हे आपण जाणतोच. त्यामुळे अशा या गुणी नृत्यांगना एकाच व्हिडियोत दिसणं म्हणजे पर्वणीच म्हणायची ! आणि हा व्हिडियो ज्यांनी बघितला त्यांना खरंच ही एक नृत्य पर्वणी होती याचा अंदाज आला असेल. आमच्या टीमला तर हा व्हिडियो प्रचंड आवडला आहे. यात या दोघांनी केलेलं सादरीकरण मस्त जबरदस्त असच आहे. त्यात आपल्याला या दोघींची नजाकत, त्यांच्या मुरक्या, त्यांचे गाण्याला सुसंगत असे हावभाव आणि यांमुळे तयार होणारं, डोळ्यांचं पारणं फेडणारे नृत्य बघायला मिळतं. खरं तर याविषयी खूप लिहिता येईल. पण हे नृत्य बघणं यात जी मजा आहे ती वाचन करून आनंद घेण्यात नाही. म्हणूनच आमची टीम आपल्या वाचकांसाठी सदर व्हिडियो खाली शेअर करते आहे. आपण या व्हिडियोचा आनंद जरूर घ्या. या लेखाच्या निमित्ताने या दोन्ही नृत्यांगनांना आमच्या टीमचा मानाचा मुजरा ! तसेच अमृताजी आणि टीम चंद्रमुखी यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! या सिनेमाने एक नवीन इतिहास लिहिला जाऊ दे आणि अनेक विक्रम मोडीत काढू देत ही सदिच्छा !

आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *