Breaking News
Home / मनोरंजन / अमेरिकेतील वकिलाचा ऑनलाईन खटल्याचा हा व्हिडीओ होत आहे वायरल, बघा काय घडलं नेमकं

अमेरिकेतील वकिलाचा ऑनलाईन खटल्याचा हा व्हिडीओ होत आहे वायरल, बघा काय घडलं नेमकं

मराठी गप्पाच्या टीमने अनेक वायरल व्हिडियोज वर लेखन केलेलं आहे. त्यातले काही हे जुने वायरल व्हिडियो होते तर काही नवीन. पण आज ज्या व्हिडियोबद्दल लिहिलं आहे, तो अगदीच ताजा आहे आणि अमेरिकेत झालेला असून जगभर वायरल झालेला आहे. हा वायरल व्हिडीओ आहे एका अमेरिकन वकिलाचा. सध्या कोविड मुळे जगभरातील अनके ठिकाणी कामकाज हे ऑनलाईन होतं आहे. अनेक ठिकाणची मान्यवर कोर्टस ही सुद्धा यांस अपवाद नाहीत. अशावेळी जर तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात काही गफलत झाल्यास काही गंमतीदार क्षण निर्माण होउ शकतात. असंच काहीसं घडलं अमेरिकेत. तेथील एक वकील एका खटल्यानिमित्त ऑनलाईन आले होते. सोबत जज साहेबही उपस्थित होते. पण हे वकील साहेब जसे ऑनलाईन आले तसे काही तरी झाल्याचे जज साहेबांनी त्यांच्या लक्षात आणून दिलं होतं.

वकील साहेबांच्या लॅपटॉपवरील एका ऍप्लिकेशन मधील फिल्टर चालू झाल्यामुळे असेल कदाचित पण वकील साहेबांच्या जागी एका मांजराचा चेहरा दिसत होता. जजसाहेबांनी ही बाब लक्षात आणून दिल्यावर वकील साहेबांनी त्यांची स्वीय सहाय्यक हे फिल्टर काढून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. त्यात या वकील साहेबांचा आवाज त्या मांजराच्या प्रतिमेस अगदी साजेसा वाटल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडिया वरती वायलर झाल्या होत्या. हा व्हिडियो संपत असताना ही तो फिल्टर निघत नसल्याने गोंधळलेले वकील साहेब ‘मी मांजर नाहीये’ असं म्हणतात. त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर नकळत एक स्मित येतं. हा वायरल व्हिडियो जगभर प्रसिद्ध झाला असून अनेक प्रथितयश वृत्तसंस्थानी याची दखल घेतलेली दिसते.

तसेच काहींनी त्या वकिलसाहेबांची मुलाखतही घेतलेली आहे. झाला प्रकार खेळकरपणे घेत या वकिलसाहेबांनी झाला प्रकार कसा झाला असावा हे त्याच्या मुलाखतींतून नमूद केलेलं आहे. कारण काहीही असो, पण काही सेकंद का असेना या वायरल विडियो मुळे नकळत आपण हसतो हे नक्की. आपल्याला अशाच वायरल व्हीडीयोज विषयी आमच्या टीमने केलेलं लेखन वाचायचं असल्यास वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात जाऊन वायरल असं लिहून सर्च केल्यास आपल्याला वैविध्यपूर्ण लेख वाचनास उपलब्ध होतील. आपल्या वेळेसाठी धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *