Breaking News
Home / मनोरंजन / अर्रे बापरे कहरच… ह्या भाऊंनी दुचाकीवर किती माणसं बसवली हे पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल

अर्रे बापरे कहरच… ह्या भाऊंनी दुचाकीवर किती माणसं बसवली हे पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल

माणसाच्या आयुष्यात जुगाड नावाची गोष्ट फार महत्वाची असते. ज्याला जुगाड करायला जमले त्याला आयुष्य जगायला जमले. आता जुगाड म्हणजे बेसिकली काय? हे आपल्याला लहानपणी पासून माहिती आहे. लहानपणी चड्डी फिट नाही म्हणून कमरेचा करदूडा पॅन्टला लावणे, हाही जुगाडच होता. आणि खिशातले पैसे वाचावे म्हणून दोस्तांनी एकाच गाडीवर ट्रिपल सीट फिरणे, हाही एक जुगाडच असतोय. आता आता को’रोनामुळे ऑनलाईन परीक्षांचे फॅड आले. तेव्हा कॅमेरात न दिसता कॉपी करणे, हाही लेटेस्ट जुगाडच होता.

‘आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या असंख्य समस्या काटकसरीने सोडवण्यासाठी केलेल्या कल्पक उपाययोजना म्हणजे जुगाड संशोधन’ ही यामागची संकल्पना आहे. एकविसाव्या शतकात विकास साधण्यासाठी जगभरात लोक झगडत असतात. भारतीय लोकं मात्र जुगाड करण्यात गुंतलेली आहेत. जगात कुठे कितीबी संशोधन होऊ द्या… पण भारतीय लोकांचे सोशल मीडियावर असणारे व्हिडीओ बघून अवघ्या अखंड जगाने मान्य केलंय की, सगळ्यात जुगाडू देश भारत आहे आणि या भूतलावर सगळ्यात हुशार माणसं भारतात सापडतात.

को’रोना काळात तर असले असले व्हिडीओ व्हायरल झाले की, काय विचारता सोय नाही. आता असाच एक व्हायरल झालेला व्हिडीओ आमच्यासमोर आला आणि आम्ही म्हणालो ही सगळी जुगाडू मंडळी भेटली तर त्यांचे थेट लोटांगण घालून दर्शन घेऊ. जुगाड ही एक कला आहे, असे आम्हाला वाटते कारण ‘जुगाड’ म्हणजे ‘लो कॉस्ट इन्व्हेन्शन अ‍ॅण्ड इनोव्हेशन्स’! ‘जुगाड’ हा हिंदी बोलीभाषेतला एक शब्द आहे आणि त्याचा साधारण अर्थ ‘निकड भागवण्यासाठी सहज, सोप्या पद्धतीनं आणि हुशारीनं केलेलं कल्पक संशोधन’! आणखी सोपं करून सांगायचं तर- अत्यंत विपरीत परिस्थितीतही संधी शोधून काढण्याची आणि हाताशी उपलब्ध असलेल्या साध्यासुध्या साधनसामग्रीसह पुढे उभ्या ठाकलेल्या समस्येचा धाडसानं सामना करण्याची कला. आजच्या या व्हिडीओत एका दुचाकी म्हणजेच बाईकवर इतकी लोकं बसलेली आहेत की, ते पाहून तुम्ही हैराण व्हाल. सर्वसामान्य लोकं नियम मोडून एका बाईकवर जास्तीत जास्त 3 माणसांना बसवू शकतात. किंवा 2 छोटी मुले आणि 2 मोठी माणसे बसू शकतात. पण इथे एका पठ्ठ्याने चक्क कहर केला आहे.

त्याने चक्क एका दुचाकीवर तब्बल 7 व्यक्ती बसवले आहेत. 2 मुले टाकीवर त्याच्यामागे एक पुरुष, त्याच्यामागे 2 महिला आणि दोघींच्या हातात प्रत्येकी एक-एक मूल. अशी एकूण 7 लोकांची मंडळी ही एकाच गाडिवर बसली होती. व्हिडीओ बघताना या जुगाडू भावाचं कौतुक वाटलं पण त्यानंतर क्षणात मनाशी भीती दाटून आली. कारण एकाच वेळी एवढ्या सगळ्यांना घेऊन गाडी चालवणे हे कसब असले तरी एक छोटीशी चूकही त्यांना महागात पडू शकते. साधी गाडी जरी स्लिप झाली तर अपघात घडू शकतो आणि हाच अपघात जिवघेना सुद्धा ठरू शकतो. पाहिलं तर ही मजा आहे पण एका क्षणात ती मजा सजा ठरू शकते. म्हणून काळजी घेणेही गरजेचे आहे.

हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.