काही लोकांना कुठे नेण्याआधी दहा वेळा विचार करा, अशी लोक तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्र-मैत्रिणींमध्ये नक्कीच असतील. त्यामुळे अशांना तुम्ही कितपत आपल्या रिस्क वर घेऊ शकता, हे तुमचं तुम्ही ठरवायचं असतं. कारण त्यांनी जर एकदा घोळ केला तर पुढं जाऊन तुम्हाला त्या गोष्टी महागात पडू शकतात. लग्नापासून तर अशा लोकांना चार हात लांब ठेवावे लागतात. पण ते आपलेच नातेवाईक असल्यामुळे नाईलाजाने त्यांच्याकडेही पत्रिका नारळा सकट पोहोचवावी लागते. अन्यथा त्यांचा कोप होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून आपण नाईलाजाने या लोकांना बोलावतो. पडती आपले कोण काही सोडत नाहीत नको तिथे नको त्या वेळी नको त्या गोष्टी करणार आणि आपला अपमान करणं हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. अशाच अविर्भावात ही मंडळी वावरत असतात. त्यांच्याकडे आपला अपमान करणे वाचून दुसरे काही काम शिल्लक राहत नाही, की काय असा प्रश्न आपल्याला पडत राहतो, असा प्रश्न स्वतःलाच आपण विचारत असतो.
आता एवढा रागवायचं कारण हेच आहे की, हा व्हिडीओ तुम्ही पुन्हा पुन्हा पहा. त्यामुळे तुम्हाला नेमकं प्रकरण काय? हे लक्षात येईल. एका मित्राचं लगीन होतं. आता लगीन म्हटलं की कोण साधासुध करतं का? आता गावची पोर पण लगीन एकदां थाटामाटात करायला की शहरातली लोक त्यांचा भव्यदिव्य पणा पाहून तोंडात बोटं घालतात, पण गावच्या पोरांनी लगीन कितीही थाटामाटात करू द्या वर्हाडी मंडळी त्यांची नाकं कापायच्या तयारीत आलेली असतात. म्हणून अशा लोकांनी पासून चार हात लांब राहिलेलंच बरं. तर झालं असं की नवरा नवरी आली, मांडवात वेळेत हजर झाली, शुभ मुहूर्तावर अक्षताही पडल्या, भटजींनी मंत्रोच्चारात पूजाअर्चाही केली. सात फेरे घेऊन झाले, लग्न मंडपातील लोकांनी अक्षता ही टाकल्या. कोणीही जेवल्याशिवाय घरी जाऊ नये असं नवर्याच्या मामाची अनाउन्समेंट झाली आणि सगळेजण जेवणाकडे वळले. जेवण अगदी छान होते पण जेवल्यानंतर हात धुवायचे कुठे म्हणून गर्दी झाली होती. बुफे डिनर म्हटला की वॉशरूम मध्ये जाऊन हात धुवायची पद्धत होती. पण एवढेच या कारणासाठी एवढ्या लांब वॉशरुममध्ये कोण जाईल? म्हणून काही काका आणि मामा मंडळींनी भारीच गंमत केली.
नवऱ्याच्या आणि नवरीचा हट्टापायी आई-बाबांनी एक कारंजा सजवला होता. सेल्फी पॉइंट म्हणून या कारंज्याचा वापर करता यावा, अशी त्यांची कल्पना होती. पण वऱ्हाडी मंडळींना जेवल्यानंतर या कारंज्याचा असा काही वापर केलाय की डोक्याला हात मारून घेण्याची वेळ आली. वऱ्हाडी मंडळींच्या करामती पाहण्याशिवाय नवरा नवरीला काहीच पर्याय उरला नाही. या मंडळींच्या एक गोष्ट लक्षात आली नाही की आपण जे करतोय ते तर फार चुकीचं आहे. आता शो साठी लावलेल्या कारंज्यांमध्ये जेवून कुणी चूळ मारतं का? नवरा नवरीला लाज आणणारी ही गोष्ट आहे, पण त्यासोबतच स्वतःची लाज काढणारी देखील आहे. काही मंडळींना कुठे काय माहिती असतं पण त्यांना काही गोष्टी सांगायला सुरुवात तरी केली पाहिजे होती. पण या पोरांनी त्यांना काहीच सांगितलं नाही. जेवण झाल्या नंतर सगळ्यांनी त्या कारंजात हात धुऊन घेतले. हात धुणे पर्यंत तरी ठीक होते माणूस आळसाने असं करतो. या पोरांनी पुढे जाऊन कहरच केला. सगळ्यांनी जाऊन तिथे प्लेट्स धुतल्या आणि स्वच्छ करून बाजूला आणून ठेवले या प्रकाराला काय बोलावं तुम्हीच सांगा.
बघा व्हिडीओ :