Breaking News
Home / मनोरंजन / अर्रे बापरे, हि रिक्षा आहे कि बस… पोलिसांनी अडवल्यावर रिक्षात कोंबलेले एकूण प्रवासी पाहून पोलिसही चक्रावले

अर्रे बापरे, हि रिक्षा आहे कि बस… पोलिसांनी अडवल्यावर रिक्षात कोंबलेले एकूण प्रवासी पाहून पोलिसही चक्रावले

सोशल मीडियावर सतत नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ हसवणारे, डोळ्यात पाणी आणणारे तर काही व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे असतात. आजकाल असाच एक व्हिडिओ खूप चर्चेत आहे. ज्यामध्ये काही लोकांचा वेडेपणा पाहून लोक डोक्याला हात लावत आहेत. तर हा व्हिडीओ आहे युपी मधला. आता विषय असा आहे की, भारतीय लोक जुगाडू असतात, हे सगळ्या जगाला माहिती आहे. पण हा जुगाड करण्याच्या नादात काहीतरी अति होऊन जातं. आणि अति तिथे माती असते, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे.

भारतात तर फुटाफूटावर जुगाडू लोक दिसतील. आपले लोक इतके जुगाडू आहे की, देवळात वाहिलेला नारळ पुन्हा बाहेर असलेल्या दुकानात विकायला आलेला असतो. आता हे कसं होतं, हे आपल्याला माहिती असतं पण बोलत कुणीच नाही. पता सबको होता है, लेकीन बोलता कोई नही. जगात जुगाडू लोकांची कमी नाही. हे जुगाडू लोक एकतर काहीतरी खूप मोठं करून दाखवतात. नाहीतर होतं नव्हतं ते सगळं मातीत घालतात. आजच्या या व्हिडीओतील जुगाडू लोक बघितल्यावर असं वाटतं की, आपण करत होते ते जुगाड याच्यासमोर काहीच नाही. तर या व्हायरल व्हिडीओत एक रिक्षा आहे, त्यात अनधिकृतपणे जास्तीचे लोक बसलेले आहेत आणि या रिक्षाला पोलिसांनी अडवले आणि नेमके किती लोक आहेत, हे चेक केले.

आजवर तुम्हीही कधी न कधी रिक्षाने प्रवास केलाच असेल. काही लोक तर अजूनही नियमितपणे रिक्षाने प्रवास करत असतील. आणि ज्यांनी कुणी केला नसेल तरी त्यांना याचा तर निश्चितच अंदाज असेल की एका रिक्षात किती लोक बसू शकतात. आजवर मीही एखाद्या रिक्षात जास्तीत जास्त लहान पोरासह एकून 8 जण बसलेले बघितले आहेत. मात्र आजच्या या व्हायरल झालेय व्हिडीओमधील रिक्षात आजवरचा सगळा रेकॉर्ड मोडू शकेल, इतके लोक बसलेले आहेत.
तर हा किस्सा आहे युपी चा म्हणजे उत्तर प्रदेशचा. इथे एका रिक्षात जुगाडू ड्रायव्हरने पैसे कमवण्यासाठी तब्बल 27 लोक एकाच वेळी बसवले आहेत. खरं तर बसवले आहेत म्हणणं चुकीचं आहे. कोंबले आहेत, असे म्हटलं तर योग्य राहील.

रिक्षातून पोलिसांनी जेव्हा प्रवाशांना बाहेर यायला सांगितलं, तेव्हा दोन तीन किंवा पाच नाही तर चक्क 27 लोक बाहेर आले. 27 लोक एकाच रिक्षात कसे बसले असतील असा प्रश्न आता तुम्हालाही पडलाच असेल. पण चक्क 27 लोक या रिक्षातून बाहेर आल्याचं पाहून पोलीस हैराण झाले. 27 माणसं बसण्यासाठी आपल्याला कमीत कमी मिनी बस तरी लागेल. मोठ्या जीप ट्रक्स मध्येही जास्तीत जास्त 10 माणसे बसवायला परवानगी असते. मात्र या जुगाडू ड्रायव्हरने जे स्किल वापरून 27 लोक रिक्षात बसवले आहेत, त्यांना मानलं पाहिजे. जर चुकून हुकून काही अघतीत घडलं तर जाग्यावर 27 जणांचा विषय संपलाच समजा…

विशेष बाब म्हणजे, रिक्षात बसलेल्यांना पण एवढे लोक बसण्याचा काही प्रॉब्लेम नाही. तेही निवांत प्रवास करत होते. व्हायरल झालेला हा व्हिडीओ उत्तरप्रदेशमधील फतेहपूर भागातील असल्याची माहिती मिळाली आहे. एखाद्या बॅगेत कपडे कोंबावे तसं अक्षरश: या रिक्षात चालकासोबत 27 प्रवासी कोंबले होते. 5 माणसांच्या जागी 10 माणसे बसवण्याची कला रिक्षावाल्याला अवगत असते, हे आपल्याला माहिती होते. पण 5 माणसाऐवजी चक्क 27 माणसे बसवण्याची ही कला नव्याने भारतीयांना शिकवल्याबद्दल तमाम रिक्षावाले खुश झाले असतील…

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना त्याचं हसू आवरणं अवघड झालं आहे आणि सोबत या व्हिडीओचा आनंद घेत आहेत. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *