Breaking News
Home / मनोरंजन / अर्रे बापरे.. ह्या मुलाच्या अंगात हाडं आहेत कि नाही, कसला डान्स करतोय पोरगा, पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

अर्रे बापरे.. ह्या मुलाच्या अंगात हाडं आहेत कि नाही, कसला डान्स करतोय पोरगा, पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, असं आपण म्हणतो… ते तसं का असेल हे या पोट्ट्यांचा डान्स पाहून तुम्हाला कळू लागलं असेलच. इतका परफेक्ट डान्स तर तुम्हाला कोरिओग्राफरही शिकवू शकणार नाही. लकबी, हावभाव अगदी तंतोतंत बसवणं, जूळवून आणणं तेही इतक्या लहान वयात ते रक्तातच असावं लागतंयं. या सगळ्या एक लक्षात येईल की पोरांना एक फॅब्युलस डान्स क्लब सुरू केलायं. त्याला ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळू लागलीत. त्यांचे व्हीडिओ आता सोशल मीडियामुळे पार एकदम व्हायरल होऊ लागलेत. त्यांच्या क्रिएटीव्हीटीला आणि कलेला जगात भारी दाद मिळतेयं. अवघ्या एका मिनटभराचा हा व्हीडिओ… मिनिटांत जग जिंकता येतं ते कसं तर असंचं… यांच्यासारखंचं. आत्तापर्यंत हा व्हीडिओ १० लाखहून अधिक जणांनी पाहिलायं. तर लाखो कमेंट्सही आल्या आहेत. प्रत्येकानंचं या पोरांना डोक्यावर उचलून धरलंयं.

ते म्हणतात न जाळ आणि धूर संगाटचं. तसंचं काहीसं यांचंही झालंयं. पोरांनी इंटरनेटवर आ’ग लावून टाकली. एका युझरनं म्हटलंयं. आय लव्ह देम… त्यांना खूप खूप प्रेम. काहींनी तर म्हटलंयं मलाही तसंचं माझंही बालपण पुन्हा अनुभवायला मिळेल तर किती चांगलं होईल. आपल्याकडे गोष्टी नाहीत, म्हणून रडत बसणारी लई पाहिली असतील. पण तुमच्याकडं जे आहे ना त्यातून सर्वात सुंदर असं काय बनू शकतंयं हेच आयुष्यात मानसाला कळतं नाही. अवघी वयाची साठी उलटून गेली तरी माझ्याकडं काय नाही, याचाचं शोध बरेचजण घेत असतात. आता या लहान निरागस मुलांकडेच पहा ना. त्यांनी तर चप्पलचा माईक तयार केला. गाणं गायलं, आनंदाने बागडले, या सगळ्यांनी प्रत्येकाला एकमेकांशी बांधून ठेवलंयं. डान्सनं ज्यांनी डान्स केला नाही, त्यांनी एकमेकांचं मनोबल उंचावलं. या छोट्याश्या परफॉर्मन्समध्ये प्रत्येकाचा रोल ठरलेला आहे. एका मिनिटांत त्यांनी आपली, सर्व ताकद लावून परफॉर्मन्स केला.

अर्थात मिनिटभर डान्स केला असेल, असंही नाही काही. त्यापेक्षा जास्त डान्स केला असेल. परंतू, त्यांनी जो काही वेळ यासाठी दिला तो अगदी परफेक्ट होता. बऱ्याचदा सिनेमाचं किंवा गाण्याचं शुटींग सुरू असताना एका परफेक्ट शॉटसाठी कित्येक रिटेक घ्यावे लागतात. पण या पोट्ट्यांच्या अंगात, नसानसांमध्ये डान्स भिनलायं… त्यांच्या प्रत्येक गोष्टीत डान्स आहे. अहो नाचायला लागतात तेव्हा कळतंचं नाही. की, अंगात हाडं आहे की नाही. कुठल्याबी अँगलनं कुठल्याही पोझिशनला डान्स सुचतोयं पठ्ठ्याला. डान्स करणं काही येऱ्यागबाळ्याचं काम नसतंयं. हे तर तुम्हीबी मान्य करालं की नाही. डान्स काय सोप्प काम नाय. पण पोट्ट्यांनी तो जगलायं. त्यामुळे श्वास घेण्याइतपतं त्यांनी ते करुन दाखवलंयं. अनेकदा त्यांनी ही कला, सादर केलीयं. खेळता खेळता केलेली प्रॅक्टीस, आनंदी बागडण्यासाठी केलेली प्रॅक्टीस कदाचित त्यांच्यापैकी एखाद्याला या क्षेत्रात उज्वल करिअर मिळवून देईल. आपल्या स्वप्नांच्या मागे धावण्यासाठी पार वेडं वैगरे व्हावं लागत नाही, इतकं सहजच ते होऊन जातंयं. तुम्हालाही हे जमतंयं का, ते पहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.