Breaking News
Home / मराठी तडका / अलका कुबल नाही तर बॉलिवूडची हि लोकप्रिय अभिनेत्री होती माहेरची साडी चित्रपटासाठी पहिली पसंत

अलका कुबल नाही तर बॉलिवूडची हि लोकप्रिय अभिनेत्री होती माहेरची साडी चित्रपटासाठी पहिली पसंत

मालिका, सिनेमा, नाटक वा अन्य कोणतंही मनोरंजन माध्यम असो. काही वेळेस अपरिहार्य कारणांमुळे एखाद्या कालाकाराऐवजी दुसऱ्या कलाकाराला त्या त्या कलाकृतीत घ्यावं लागतं. अनेक वेळेस ती कलाकृती प्रेक्षकांसमोर येण्याआधी किंवा आल्यानंतर असं होतं. असंच काहीसं काही वर्षांपूर्वी झालं होतं एका लोकप्रिय ठरलेल्या कालाकृतीबद्दल. चला जाणून घेऊयात कोणती कलाकृती होती ती. माहेरची साडी हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीमधील एक मैलाचा दगड असलेला चित्रपट आहे. ह्या चित्रपटाने जितकी लोकप्रियता मिळवली तितकीच लोकप्रियता चित्रपटातील कलाकारांनी मिळवली. अलका कुबल, रमेश भाटकर, अजिंक्य देव, उषा नाडकर्णी ह्या सर्व कलाकारांना खूप प्रसिद्धी मिळाली. माहेरची साडी चित्रपट म्हटलं कि सर्वात पहिला चेहरा समोर येतो तो अलका कुबल हिचा. परंतु ह्या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री म्हणून अलका कुबल हि दिग्दर्शकाची पहिली पसंती नव्हती. त्यामागे आहे एक वेगळीच कहाणी. चला तर जाणून घेऊया.

हा काळ होता १९९० च्या नंतरचा. नुकताच मैने प्यार किया हा चित्रपट प्रसिद्ध झाला होता. सलमान खान आणि भाग्यश्री या नवीन जोडीने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. भाग्यश्रीजी यांचा हा पहिलाच चित्रपट. त्याची लोकप्रियता पाहता अनेक निर्माते त्यांना आपल्या सिनेमांमध्ये अभिनय करण्यासाठी विचारत होते. आपल्या पहिलाच चित्रपट सुपरहिट झाल्यामुळे मराठमोळी भाग्यश्री ह्या चित्रपटामुळे खूपच लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांना बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. बॉलिवूडसह अनेक चित्रपटांसाठी त्यांना विचारण्यात येऊ लागले होते. त्याच दरम्यान निर्माते अभय कोंडके हे आपल्या आगामी ‘माहेरची साडी’ ह्या चित्रपटासाठी अभेनेत्रीच्या शोधात होते. त्यांना भाग्यश्रीमध्ये ‘माहेरची साडी’ चित्रपटातली अभिनेत्री दिसली होती. त्यामुळे ह्या चित्रपटात भाग्यश्री ह्यांनाच घ्यायचे असा निश्चयच त्यांनी केला होता. त्यांना विश्वास होता कि मराठी चित्रपटात बॉलिवूडचा लोकप्रिय चेहरा असेल, तर चित्रपट चांगलाच व्यवसाय करेल आणि चित्रपटाला सुद्धा चांगली प्रसिद्धी मिळेल. त्यामुळे ‘माहेरची साडी’ चित्रपटातली प्रमुख भूमिकेसाठी भाग्यश्री ह्यांना विचारण्यात आले. त्यांनी अनेकदा भाग्यश्री ह्यांच्या भेटीगाठी घेतल्या. परंतु भाग्यश्रीने कधीच चित्रपटासाठी होकार दिला नाही. त्यांनी जवळ जवळ दीड वर्षे त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा केली. परंतु तिचा कुठलाही प्रतिसाद भेटत नाही, हे पाहून मग विजय कोंडकेंनी आपला विचार बदलला.

शेवटी या निर्मात्याने दुसऱ्या एका अभिनेत्रीला, सदर चित्रपटात अभिनय करण्यासंदर्भात विचारणा केली. त्या अभिनेत्रीनेही होकार कळवला. चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आणि यथावकाश हा चित्रपट प्रदर्शितही झाला. प्रदर्शित झाल्यापासून तो तब्बल दोन वर्षे चालला. केवळ चाललाच नाही तर मराठी मनोरंजन विश्वातला एक मैलाचा दगड ठरला असे म्हंटल्यास वावगं ठरू नये. त्या अभिनेत्रीच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय चित्रपट म्हणून आजही हा चित्रपट ओळखला जातो. या चित्रपटाचं नाव, माहेरची साडी आणि अर्थात त्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अलकाताई कुबल. या चित्रपटाची निर्मिती केली होती ती विजय कोंडके यांनी. अलकाताईंनी या चित्रपटाआधीही काही चित्रपट केले होते. त्यातील एक म्हणजे लेक चालली सासरला हा होय. या चित्रपटातील अलकाताईंचा अभिनय आणि चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून विजयजी कोंडके यांनी अलका ताईंची निवड केली होती. अलका ताईंनीही ही निवड सार्थ ठरवली आणि पुढे जो घडला तो इतिहास सर्वज्ञात आहेच.

या चित्रपटात तब्बल सात गाणी होती. त्यातील सगळीच गाणी प्रसिद्ध झाली. ‘सासरला ही बहीण निघाली’ तर खूप प्रसिद्ध झालेलं गीत. जेष्ठ संगीतकार, गीतकार अनिल मोहिले यांनी या चित्रपटाची संगीताची बाजू सांभाळून धरली होती. तसेच या चित्रपटात सिनेकलाकारांची मांदियाळी होती. त्या काळात या चित्रपटाने तब्बल १२ कोटींचा व्यवसाय अवघ्या काही महिन्यांत केला होता. आजच्या काळात याचे मूल्यांकन केले असता, उर अभिमानाने भरून येतो. आजही अलका कुबल हे नाव घेतल्यावर माहेरची साडी हे नाव हमखास डोक्यात येतं, यावरून या चित्रपटाची लोकप्रियता लक्षात यावी. पुढेही अलका ताईंनी अभिनेत्री आणि निर्माती म्हणून अनेक कलाकृती केल्या. पण माहेरची साडी मधील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात ध्रुव ताऱ्याच्या स्थानाप्रमाणे अढळ आहे.

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *