Breaking News
Home / ठळक बातम्या / च’क्क भारतीय रस्तावर फिरताना दिसले कांगारू, पाहून तुमचा देखील विश्वास बसणार नाही

च’क्क भारतीय रस्तावर फिरताना दिसले कांगारू, पाहून तुमचा देखील विश्वास बसणार नाही

नाही म्हणता म्हणता वायरल व्हिडियोज हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग कधी झाले ते आपल्याला ही कळलेलं नाहीये. कदाचित असा एकही दिवस जात नसेल ज्या दिवशी आपण एखादा नवीन वायरल व्हिडियो बघत नसू. बरं या वायरल व्हिडियो विषयाला कशाची मर्यादा असावी तर तसंही नाही. जे जे लोकांना बघायला आवडतं ते ते वायरल ठरतं. मग तो कधी कोणी केलेला डान्स असो, गायन असो, एखादा जुगाड असो वा अजून एखादी कोणती घटना असो. पण सहसा अशा सगळ्या विषयांची आपल्याला सवय असते. त्यामुळे हे विषय समोर आले तरी आपल्याला एकदम असा उत्साह वाटेलच असा नाही. त्यातल्या त्यात नवीन काहीतरी अशी प्रतिक्रिया ही कदाचित आपल्या मनात उमटू शकते.

पण आयुष्य हे बरचसं अनिश्चित स्वरूपाच असतं. त्यामुळे कधी काय घडेल किंवा अनुभवायला मिळेल हे सांगू शकत नाही. त्यात वायरल व्हिडियोज हे फक्त निमित्तमात्र असतात. पण काही वेळा वायरल व्हिडियोजचं निमित्त होऊन अशा काही घटना समोर येतात की काही कळत नाही. आता अगदी काहीच दिवसांपूर्वीच उदाहरण घ्या ना. पश्चिम बंगाल मध्ये कांगारू आढळल्याची बातमी आली होती.

आता नुकताच एक एप्रिल म्हणजे एप्रिल फुल डे होऊन गेला. त्यामुळे अनेकांनी या बातमीला मस्करीत घेतलं असण्याची शक्यता आहे. आमच्या ही टीमने एक दोन दिवसांपूर्वी ही बातमी बघितली. यांचं एप्रिल फुल करणं अजून चालू आहे असं वाटून आम्हीही लक्ष दिलं नाही. पण आज एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या बातमीशी निगडित व्हिडियो बघायला मिळाला तेव्हा विश्वास बसेना. म्हणून थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, एका प्रथितयश वृत्त संस्थेची बातमी पाहण्यात आली. त्यातून सदर बातमीबद्दल काहीशा विस्ताराने कळालं आणि आश्चर्य वाटलं. म्हणून पुन्हा तो व्हिडियो पुन्हा एकदा बघितला. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एक गाडी रस्त्यावर उभी असल्याचं दिसून येत. तसेच गाडीच्या पुढील भागात थोडी हालचाल जाणवते. हळूहळू कॅमेरा पुढे सरकतो तसतसा एखादा ससा गाडीजवळ उभा असावा असं वाटतं. पण हळूहळू प्रकाश वाढत जातो आणि सदर प्राणी कांगारू असल्याचं दिसतं. एरवी हे प्राणी बरेचसे तगडे असतात. पण येथे दिसणारा कांगारू बराचसा खंगलेला वाटतो. तसेच त्याचं वय ही कमी असावं असा अंदाज आहे. असो.

आपण हा व्हिडियो पहिल्यांदा पाहत असू तर एखाद्या परदेशी रस्त्यावर (त्यातही ऑस्ट्रेलियात) हा कांगारू आल्याचं वाटून जातं. पण तेवढ्यात समोरून एक मोठाला ट्रक येतो आणि हा कांगारू पुढे सरकतो. त्याचवेळी कॅमेऱ्यामागून काही माणसांचं बोलणं ऐकू येत. त्यातून हे सगळे बंगाली भाषिक असावेत अस जाणवतं. तसेच गाडीचा नंबर ही चुकता चुकता दिसतो. त्यावरून हा भारतीय रस्ता असल्याचं लक्षात येतं. दरम्यानच्या काळात कांगारूचं चरणं चालू असतं. पण गाड्या आणि माणसं यांची संख्या वाढल्यावर मात्र हा प्राणी काहीसा बावरतो. एके ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ पाहतो. अर्थात माणसं ही त्याच्या पाठी जाऊ लागतात. पण त्यातील एक माणूस मात्र इतरांना अस करण्यावाचून रोखत असावा हे जाणवतं. या सगळ्या वातावरणात अजून एक कांगारू आपल्याला चुकता चुकता दिसतो. बाकी वेळ हा कांगारू आणि त्याचं आजूबाजूच्या परिसराचा वेध घेणं हे आपण बघत असतो. ट्रकने हॉर्न वाजवल्यावर होणारी त्यांची प्रतिक्रिया लक्षात राहते. असो. वर ज्या बातमीचा उल्लेख केला तिचा आधार घेतला असता हे दोन आणि अजून एक असे तीन कांगारू सध्या त्या परिसरातील बंगाल पार्क प्रशासनाने ताब्यात घेतल्याचं कळतं. तसेच त्यांची देखभाल सध्या केली जात असल्याचं कळतं.

हा सगळा प्रकार सिलिपाईगुडी येथील असल्याचं समजतं. एकंदर प्रकार हा ऐकावं आणि पाहावं ते नवलच वाटावं असा आहे. आपल्या वाचकांना याविषयी वाचायला घ्यायला आवडेल अस वाटून आमच्या टीमने आजचा हा लेख लिहिला आहे. तसेच वर उल्लेख केलेल्या वायरल व्हिडियोला ही आपल्या वाचकांसाठी, या लेखाच्या खाली शेअर करतो आहोत.

आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *