Breaking News
Home / मनोरंजन / अशाप्रकारची लग्नाची वरात तुम्ही ह्या अगोदर कधी पाहिली नसेल, बघा हा अतरंगी व्हिडीओ

अशाप्रकारची लग्नाची वरात तुम्ही ह्या अगोदर कधी पाहिली नसेल, बघा हा अतरंगी व्हिडीओ

अतरंगी, बहुढंगी आणि विनोदी अशा कंटेंट ने भरलेले व्हिडियोज म्हणजे वायरल व्हिडियोज हे नकळत समीकरणच बनून गेलं आहे. अर्थात अनेक व्हिडियोज असेही असतात जे आपल्या हृदयाला भिडतात आणि आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात. आज चा हा लेख मात्र एका भन्नाट किंबहुना अतरंगी म्हणता येईल अशा वायरल व्हिडियो बद्दल आहे. कोणाचं डोकं कुठे धावेल आणि किती वेगाने याचा काही नेम नसतो. पण यांमुळे जी गंमत निर्माण होते ती मात्र असते एकदम झकास. आमच्या टीमने पाहिलेल्या एका व्हिडियोचं अगदी ताजं उदाहरण तुम्हाला देता येईल. हा व्हिडीओ आहे दक्षिण भारतातील. जवळपास दोन मिनिटांचा हा व्हिडीओ. याची सुरुवात होते ती गिफ्ट सारखं सजवलेल्या गाड्यांच्या ताफ्याने. सुरुवातीस एक गाडी येते, मग दुसरी, मग तिसरी आणि असं करता करता जवळपास सात ते आठ गाड्या ओळीत येत राहतात.

हा रस्ता रहदारीचा त्यामुळे बाकीची वाहनं सुद्धा त्यात भोंगे वाजवत सामील होत असतात. पहिली ४० – ४५ सेकंद काहीच कळत नाही. कोणाचं तरी लग्न असावं किंवा एखादी मिरवणूक असावी असं वाटत राहतं. कॅमेऱ्यामागून दक्षिण भाषेत गप्पा चालू असतात. तेवढ्यात आपल्याला समोरून एखादं अवघड वाहन येताना दिसतं. आपण नीट निरखून पाहतो तर जेसीबी. लग्नाच्या वरातीत जेसीबी घुसला असं वाटून आपल्याला हसायला येतं. पण खरी गोष्ट पुढच्या दहा सेकंदात कळते आणि आपल्या हास्यात भर पडते. या जेसीबीच्या पुढील भागात चक्क नवरा नवरी बसलेले असतात. या भागात पांढरा कपडा घालून नवपरिणीत जोडप्याला बसायला जागा केलेली असते. बहुतेक ही अतरंगी कल्पना नवरोबाची असावी असं वाटत राहतं. कारण ते महाशय सगळीकडे हात दाखवत मजा घेत अगदी ऐटीत बसलेले असतात. तर ‘नववधू प्रिया मी बावरते’ हा अंदाज असतो नवरीचा. आधीच लग्नाचं टे’न्शन.

त्यात हे असलं काही तरी. म्हणून बिचारी पहिल्यापासून चेहऱ्यावर जो रुमाल धरते ती शेवटपर्यंत. पण आपले अँ’टिक नवरोबा थोडी गप्प बसणार. तिच्या हातातील रुमाल ओ’ढत तिचा चेहरा सगळ्यांनी बघावा आणि तिने सगळ्यांना पहावं असं त्यांचं चाललेलं असतं. आधीच लाजेने ओशाळलेली ही नववधू कुठे तोंड लपवू अशा मनस्थितीत असते. बरं या नवरोबाला प्रोत्साहन द्यायला त्याचे तेवढेच अतरंगी मित्र असतातच. या धामधुमीत पाठून येणाऱ्या गाड्यांचे भोंगे वातावरण अगदी दणाणून सोडत असतात. आपण मात्र अगदी मस्त एन्जॉय करत असतो आणि हा व्हिडीओ संपतो.

त्या अतरंगी नवरोबाच्या कृतीस हसावं की काय बोलावं सुचत नाही. पण आपल्याला काही क्षण का होईना गंमत येते हे मात्र खरं. तसंच त्या बिचाऱ्या नववधुचं वाईटही वाटतं. असो. या दोघांचा संसार खेळीमेळीने चालू राहू दे, हीच मराठी गप्पाच्या टीमची सदिच्छा ! आपल्याला हा लेख आवडला असणारचं तेव्हा नक्की शेअर करा. पण त्यानंतर कुठे जाऊ नका बरं. आमच्या टीमने अनेक वायरल व्हिडियोज वर लेख लिहिले आहेत. त्या लेखांचा सुद्धा आनंद घ्या. त्यासाठी काय कराल ? तर आमच्या वे’बसाइ’टवरील स’र्च ऑप्शन चा वापर करा. त्यात जाऊन वायरल असं लिहून स’र्च करा. आपल्याला विविध गंमतीशीर, तसेच हृ’दयाला भि’डणाऱ्या वायरल व्हिडियोज वर केलेलं लेखन वाचता येईल. मराठी गप्पासोबत जोडले जाण्यासाठी धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *