Breaking News
Home / मनोरंजन / अशी अतरंगी बायको नको रे बाबा, पतीसोबत शॉपिंगला गेलेल्या महिलेने बघा सर्वांसमोर काय तमाशा केला तो

अशी अतरंगी बायको नको रे बाबा, पतीसोबत शॉपिंगला गेलेल्या महिलेने बघा सर्वांसमोर काय तमाशा केला तो

पती-पत्नीचे नाते म्हटले की प्रेम आले आणि मग त्या गोड गोड प्रेमासोबत रूसवे फुगवेही आलेच. लग्नानंतर काही मुलींना नवरा म्हणजे डोक्याची कटकट वाटू लागते. तर काही मुलांनाही बायको म्हणजे कटकट वाटू शकते. आता ही कटकट वाटण्याची कारणे प्रत्येकाची फारशी वेगळी नसतात. म्हणजे काहींची बायको कायमच खरेदी करायच्या मूड मध्ये असते तर काहींची बायको कायमच रुसण्याच्या मूडमध्ये असतात. मूड वेगवेगळे असले तरी त्या मागचा हेतू एकच असतो तो म्हणजे, सगळं काही आपल्या मनासारखं झालं पाहिजे. अगदी लग्नाआधी गर्लफ्रेंड असणाऱ्या मुली जेव्हा लव्ह मॅरेज करून बायको होतात, तेव्हाही त्या अशाच टिपिकल बायकोप्रमाणे वागतात. बऱ्याचदा असे होते की, नवऱ्याची कटकट कधी एकदाची संपते असं अनेक बायकांना वाटत असतं. पण नवऱ्याची कटकट वाटत असली तरी लग्न केल्यानंतर नवऱ्याचे अनेक फायदे हे मुलींना होतात. डोकेदुखी वाटणारा नवरा मुलींना बऱ्याच गोष्टींसाठी कामी पडत असतो. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे नवरा आपल्या सगळ्या खरेदीच्या बॅगा उचलतो आणि आपल्यासोबत असताना शॉपिंग केल्यावर बिल पण तोच भरतो.

नवरा बायकोचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी हे रुसव्या, फुगव्याचे तर कधी फुल कॉमेडी धमाल असतात. आता आमच्याकडे पण एक असा व्हिडीओ आला आहे, जो पाहून तुम्हाला पण त्या नवऱ्याची कीव येईल आणि त्या बायकोच्या वेडेपणाचं हसू येईल. खरं तर हा व्हिडीओ परदेशातील आहे मात्र जगातील सगळ्याच नवऱ्याना तो लागू होतो.

तर घडलं असं की एखाद्या निवांत सुट्टीच्या दिवशी बायकोला आला शॉपिंगला जायचा मूड. पण नवऱ्याचा आणि त्याच्या खिशाचा आराम करायचा मूड होता. कारण बायकोसोबत शॉपिंगला जाणे म्हणजे खिशाला झळ बसणार, हे नक्कीच होते. पण बायकोच्या हट्टापुढे कुणाचे चालणार? शेवटी गडी निघाला बायकोच्या मागे मागे… बायकोने शेवटी गड्याला नेला मोठ्या मॉलमध्ये… तिथे गेल्यावर ड्रेस घे, घड्याळ घे, मेकप करायला समान घे… असं काय नको नको ते घेतलं… हा गडी बिचारा होताच पिशव्या सांभाळायला आणि बिल भरायला… शेवटी गरजेच्या नसलेल्या वस्तू घेऊन बायकोला आनंद झाला.

बायकोचा हसरा चेहरा बघून याला पण बरं वाटलं. शेवटी खाऊन -पिऊन दोघे मॉलबाहेर पडायला लागले की बायकोला दिसली एका दुकानात आपल्या आवडीची वस्तू… आता मात्र नवऱ्याने बारीक तोंड केले. खिशातील पैसे संपायला आले होते, त्याने बायकोला समजून सांगितले.. पण ऐकेन ती बायको कसली… नवरा आपल्याला आवडीची वस्तू खरेदी करून देईना म्हणूम बाई थेट गडबडा खालीच लोळायला लागली. एवढ्या मोठ्या ठिकाणी, एवढ्या लोकांमध्ये बाईने एकदम ताल सोडून दिला. शेवटी झक मारली आणि हिच्यासोबत आलो, अशी भावना असलेल्या नवऱ्याने शेवटी मान्य केलं तेव्हा गडबडा फरशीवर लोळणारी बायको उठली.

नवऱ्याच्या फजितीचा हा एक मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहणं फारच मनोरंजक आहे. डोकेदुखी वाटणाऱ्या नवऱ्याची असेही काही रूप पाहून अनेक मुली-बायका या व्हिडीओलाचा मनमुराद आनंद घेताना दिसून येत आहे.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *