लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान…या लावणीच्या माध्यमातून अनेक अदाकारांनी भल्याभल्यांना पायातील घुंगराच्या तालावर नाचवलं आहे. तमाशाचा फडापासून ते ऑक्रेस्ट्राच्या स्टेजपर्यंत, शाळेतल्या गॅदरिंगपासून ते चित्रपटांपर्यंत, कुठेही लावणी सुरु झाली की, महाराष्ट्रातील मराठी माणूस वेडा झालाच म्हणून समजा. गेल्या कित्येक वर्षांपासून लावणी महाराष्ट्रातील लोकांचं मनोरंजन करत आली आहे. अलीकडच्या काळात लावणी देशातच नाही तर परदेशातही पोहोचली आहे. विदेशातील अनेक नृत्यांगणा महाराष्ट्रात येऊन लावणी शिकतात, तिचा अभ्यास करतात. काळानुसार लावणी बदलत गेली. समृद्ध होत गेली. अलीकडच्या काळात तर लावणी थेट डिजेवर सुद्धा वाजत आहे. आधी तमाशात असणारी लावणी आता थेट घराघरात पोहोचली आहे. लावणीकडे विचित्र नजरेने बघणाऱ्या नजरा ते आता आई-वडील हौसेने मुलीला लावणी ही नृत्यकला शिकवायला पाठवतात, असा प्रवास लावणीचा आहे. अगदी आता घरातील आया-बायाही हौसेने लावणी गातात आणि त्यावर नाचतात सुद्धा…
‘लटपट लटपट तुझं चालणं गं मोठ्या नखर्याचं.. बोलण गं मंजुळ मैनेचं…. नारी गं …… नारी गं ‘ इथपासून तर अगदी “चंद्रा” पर्यंत महाराष्ट्राने लावणी अनुभवली आहे. ‘कोमल काया कि मोहमाया पुनवचांदनं न्हाली, सोन्यात सजले रूप्यात भिजले रत्नप्रभा तनू ल्याली’ असे म्हणत सोनाली कुलकर्णीने महाराष्ट्राला अप्सरापुढे थिरकायला लावले होते. आता असाच एक व्हायरल डान्स आपल्यासमोर आला आहे.
अगदी घरगुती वातावरण असतानाही एका महिलेने लावणी सादर केली आहे. हौस असल्याने तिने ही लावणी सोशल मीडियावर पोस्ट केली आणि बघता बघता या लावणीला प्रचंड व्ह्यूज मिळाले. ‘मला लागली कुणाची उचकी’ या लोकप्रिय लावणीवर या महिलेने डान्स केला आहे. एक सर्वसामान्य महिला पण इतक्या उत्कृष्ट पद्धतीने नृत्य करू शकते, हे पाहून आम्ही थक्क झालो. ढोलकीवर थाप, घुंगरांची साथ रुपवतीचा ठुमका आणि मनाला चटका लावणारे खटकेबाज शब्द …. हे सगळं नैसर्गिकरित्या तिथे नसलं तरी कृत्रिमरित्या गाण्याच्या माध्यमातून होतंच पण तरीही ही लावणी बघताना जीव ओवाळून टाकू नये तर काय ?, अशी भावना आपल्या मनात येते.
या लावणीवर नाचणाऱ्या नृत्यांगनेच्या दिलखेच अदा पाहून युझर्सही लयभारी अशी प्रतिक्रिया देत आहेत. तिचे हावभाव आणि त्याच्या अदांपुढे तर भलेभले गार पडतील असा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालत आहे. लावणीमध्ये अदा आणि हावभावाला खूप महत्त्व असतं. त्या अदा या नृत्यांगनेने इतक्या सुंदर पद्धतीनं केल्या आहेत की तिच्या व्हिडीओची देशभरात चर्चा होत आहे.
गोंधळ, पोवाडे, लावणी आणि भारुड या प्रकारांनी महाराष्ट्राचे संगीत समृद्ध करण्यास मदत केली त्यातल्या त्यात लावणीचे स्थान अग्रगण्य मानले गेले ते काही उगाच नाही…. लावणी विना मराठी सिनेमाचा आणि पर्यायाने महाराष्ट्राचा इतिहास परिपूर्ण होऊच शकत नाही. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :