शाळा म्हटलं की आपण शाळेत असताना कुठल्याही गोष्टी आपल्याला आवडत नसल्या तरी दोन गोष्ट जाम आवडायच्या. एक म्हणजे खेळाची सुट्टी आणि दुसरी म्हणजे कवायत… एखादे शिक्षक गैरहजर असले किंवा कार्यानुभव, पर्यावरण असे तास असले की वर्गाला कवायती करायला लावल्या जायच्या. कधी कधी शनिवारी सकाळच्या शाळा असायची तेव्हा भर सकाळी सकाळी प्रार्थना, प्रतिज्ञा झाली की लगेचच कवायत व्हायची. तेव्हा मात्र भलतीच मजा यायची. ज्यांची झोप झालेली नसायची ते तर पेंगळत कवायत करायचे.
कवायत म्हणजे सांघिक, शिस्तबद्ध शारीरिक हालचाल. कवायतीत एकच प्रकारची हालचाल, एकाच वेळी, एका हुकुमावर सर्वांनी करावयाची असते. संचलन म्हणजे एखाद्या मोठ्या समारंभाप्रसंगी अशा कवायतीद्वारा केलेले प्रदर्शन होय. ही झाली पद्धतशीर व्याख्या… पण खरं तर कवायत म्हणजे आपल्यासाठी अभ्यास बुडवायची एक संधी. तीही स्वतःहुन चालत आलेली संधी. म्हणून अनेकांना कवायत करायला आवडायची.
पण कवायत करताना पहिले 10-15 मिनिट बरे वाटते नंतर नंतर मात्र हात अवघडून येतात, पाय दुखायला लागतात, बोर पण व्हायला लागते. खरं पाहिलं तर कवायतीमुळे सैनिकांत, स्वयंसेवकांत, बालवीरांत शिस्त, सांघिक वृत्ती व आत्मनियंत्रण या गुणांची जोपासना व वाढ होते. संचलनात याच गुणांचे नेत्रदीपक व उत्साहदायक प्रदर्शन करून ते प्रेक्षणीय करण्यावर भर असतो. मात्र शाळेत असताना आपण याचा विचार करत नाहीच. मात्र आज अमच्याकडे एक असा इंटरेस्टिंग व्हिडीओ आला आहे, जो पाहून तुम्हीही म्हणाल, अशी कवायत करण्याची पध्दत आमच्या शाळेत असती तर किती भारी झालं असतं. कारणही तसंच आहे. हा व्हिडीओ ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यांनी त्यांनी तो नक्कीच शेअर केला आहे. काही लोकांनी बालपणीची आठवण म्हणून तर काही लोकांनी नाराज होऊन… कारण हे आमच्या शाळेत नव्हतं. हा व्हिडीओ पाहून काही लोक तर असेही म्हणतील की, अशी कवायत आमच्या शाळेत असती तर आम्ही रविवारी म्हणजेच सुट्टीच्या दिवशी सुद्धा शाळा सुरू ठेवायला लावली असती.
सर्वसाधारणपणे प्रत्येक शाळेत कवायत करताना एक ढोल असायचा आणि शाळेतील पिटीच्या मास्तरांच्या तोंडात असणारी शिटी असायची. या दोन्हींच्या तालावरच आपण कवायत करायचो. मात्र या व्हिडीओत दिसणाऱ्या शाळेत चक्क साऊंड लावून एका गाण्याच्या तालावर कवायत केली जात आहे. गाणं म्हटलं जातं नसलं तरी त्याचं म्युझिक भन्नाट आहे. आणि याच म्युझिकच्या तालावर एक शिक्षिका त्यांना कवायत करून दाखवत आहेत. मुलेही तशीच कवायत करत आहेत. शिक्षण घेताना त्याचा आनंद देता यावा आणि शिकताना विद्यार्थ्यांनी आनंद घ्यावा, यासाठी फार कमी शिक्षक काम करत असतात. मात्र या व्हिडीओमधील शाळेने आणि कवायत शिकवणाऱ्या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना कवायत करण्याची सवय, शिस्त आणि गोडी लागावी, यासाठी वेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले आहे, त्याचेही कौतुक व्हायलाच हवे. आता हा व्हिडीओ तुमचंही मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :