Breaking News
Home / मनोरंजन / अशी शिकवणारी बहीण असेल तर भाऊ कलेक्टर झाल्याशिवाय राहणार नाही, बघा व्हिडीओ

अशी शिकवणारी बहीण असेल तर भाऊ कलेक्टर झाल्याशिवाय राहणार नाही, बघा व्हिडीओ

‘सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती,
ओवळीते भाऊराया रे,
वेड्या बहिणीची वेडी ही माया’

दिपावलीच्या सणात अगदी हमखास ऐकू येणारं हे गाणं. भावा बहिणी मधलं प्रेम दाखवणारं. या खट्याळ पण तेवढ्याच मायाळू नात्यातील मर्म अधोरेखित करणारं. बहीण भावाचं नातं कसं असतं हे काही आम्ही वेगळं सांगायची गरज नाही. मायाळू असलं तरीही भांडणं ही ठरलेलीच. त्यातही लहान वयात तर काय बघायलाच नको. पण अनेक वेळेस या भांडणात विजय होतो तो ताईसाहेबांचा. मग तिचं वय लहान का असेना. आज आपल्या टीमने याचीच गंमतीदार अनुभूती घेणारा एक व्हिडियो पाहिला. पण यातील ताईसाहेब अगदीच छोट्या आहेत हे मात्र लक्षात घेतलं की तुम्हाला काय गंमत यात असेल याची कल्पना यावी.

हा व्हिडियो आहे एका पंजाबी कुटुंबातला. त्यात आपल्याला एक छोटा पंजाबी पुत्तर अभ्यासाची पुस्तकं घेऊन बसलेला दिसतो. सोबत असते ती त्याची त्याच्याहून छोटी बहीण. छोटी म्हणजे अगदीच चिमुकली म्हणा ना. तिला अजून व्यवस्थित बोलता ही येत नसतं हे जाणवतं. पण स्वभाव मात्र हुशार. जिला अजून व्यवस्थित बोलता येत नाही ती व्यवस्थित वाचू पण शकत नसणारच. पण जवळच बसलेला दादा काही तरी चुकीचं लिहितो आहे, हे ती त्याला सांगत असते. बघा म्हणजे. व्हिडियोच्या सुरुवातीलाच हसू ही येतं आणि तिच्या या ओरडण्याविषयी कुतूहल ही वाटतं. अर्थातच भाऊरायला ओरडत असताना घरातील कोणा वडीलधाऱ्या व्यक्तींचं अनुकरण करत असणार ही शक्यता आहे. पण ते दृश्य बघायला एवढं गमतीदार वाटतं की काही विचारु नका. जवळ बसलेला दादा पण गालातल्या गालात हसत असतो. हिला काय कळतंय का ह्या पुस्तकातलं असे भाव त्याच्या चेहऱ्यावर असतात. पण दादा चुकतो आहे हे दाखवून देण्याची जिद्द असलेली ताई पाठी हटते थोडी. सुरुवातीला तिचा स्वर थोडा नरम असतो. पुस्तकाच्या वरील भागाकडे हात दाखवत काही तरी बडबड करत असते. पण दादा हसण्या पलिकडे काहीच करत नाही म्हंटल्यावर मग मात्र ताईबाईंचा राग अनावर व्हायला सुरुवात होते.

हलके हलके टपल्या मारत ती भाऊरायला काय चुकलं हे दाखवत असते. मधेच कधी तरी कॅमेऱ्या मागे असलेल्यांकडे खट्याळपणे बघत असते. पण एक क्षण असा येतो की राग एवढा अनावर होतो की एकदाच ओरडते. आपण मात्र इथे मनापासून हसत असतो. बालपण देगा देवा हेच खरं असं आपल्या मनात येऊन जातं. पुढेही बराच वेळ हे असं चालू राहतं. दादा आपला टपल्या खात असतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर मात्र प्रश्नचिन्ह हे कायम असतं. मी काय चूक केली आहे आणि ही नक्की काय सांगतेय हे ते दोन प्रश्न त्याला पडलेले दिसतात. तो पण बिचारा न समजणारे बोल ऐकून घेत असतो. कौतुकच आहे दोघा बहीण भावाचं. हा व्हिडियो अगदी ५५ सेकंदांचा. त्यामुळे चट्कन संपतो हा व्हिडियो. पण या गोड ताईमुळे तो पुन्हा पुन्हा बघावासा वाटतो.

आपल्यापैकी ज्यांनी हा व्हिडियो पाहिला असेल त्यांना हा व्हिडियो आवडला असणार हे नक्की. त्याचप्रमाणे आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपण कमेंट्स करता, लेख शेअर करता तेव्हा आपला मराठी गप्पाविषयी असणारा जिव्हाळा कळून येतो. येत्या काळातही हा जिव्हाळा आणि प्रेम असंच जपून ठेवा. लोभ असावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *