Breaking News
Home / बॉलीवुड / अश्याप्रकारे झाली होती अमेरिकेत राहणाऱ्या श्रीराम नेनेंची मधुरींशी पहिली भेट, बघा प्रेमकहाणी

अश्याप्रकारे झाली होती अमेरिकेत राहणाऱ्या श्रीराम नेनेंची मधुरींशी पहिली भेट, बघा प्रेमकहाणी

मनोरंजन क्षेत्रात येणं आणि स्वतःच असं आढळ स्थान निर्माण करणं हि मोठी वेळखाऊ आणि मेहनीतीची प्रक्रिया असते. पण अनेक कलाकार हा मार्ग चोखाळतात आणि यशस्वी होतात. माधुरी दीक्षित हे त्यातलं मोठं नाव आणि मराठी व्यक्ती म्हणून आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट. अगदी तरुणपणापासून त्यांनी काम करायला सुरुवात केली ती आजतागायत. पण त्यांच्या आयुष्यात मध्ये असा कालखंड आला ज्यात त्या अमेरिकेत स्थायिक होत्या आणि मोजकेच सिनेमे किंवा रियालिटी शोज त्यांनी केले. त्या तिथे स्थायिक झाल्या कारण त्यांचे अहो म्हणजेच श्रीरामजी नेने अमेरिकेत स्थायिक होते. आता पूर्ण कुटुंब पुन्हा भारतात परत आलंय. पण तुम्हाला माहिती आहे का कि माधुरीजी आणि श्रीरामजी एकमेकांना कसे भेटले ते ? त्याचा एक किस्सा आहे. चला वाचा तर मग.

झालं असं कि माधुरीजी कॉलेज जीवनापासून सतत कामात व्यस्त असत. असं म्हणतात कि त्याकाळी सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या त्या. त्यांच्या कामाचा आवाका नक्कीच मोठा होता. पण त्यांच्या घरी, माधुरीजींच्या लग्नाचा विषय चालला होताच. काही वेळेस मुलं निवडली पण गेली पण माधुरीजींचा पूर्ण फोकस कामावर होता. तर दुसरी कडे श्रीरामजी लहानपणापासून भारताबाहेर वाढले. युरोप आणि मग अमेरिका. त्यात ते डॉक्टरकीचा अभ्यास करत होते. त्यामुळे त्यांना अभ्यासातून डोकं वर काढायला वेळ नसे. पण त्यांच्या संपर्कात माधुरीजींचे भाऊ होते. माधुरी यांच्या भावाला मुलगा तर आवडला होता, पण माधुरीजींचा होकार आवश्यक होता. मग त्यांनी काही करणं काढून अमेरिकेत बोलावून घेतलं. भाऊ कळकळीने बोलावतोय म्हंटल्यावर त्यांनाही नाही म्हणता येईना.

बरं, त्यांना खरं कारण सांगितलं असतं तर त्या आल्याही नसत्या कदाचित. मग माधुरी यांच्या भावाने शक्कल लढवली. डॉ. नेने यांना एका पार्टीनिमित्त घरी बोलावलं. माधुरीजीही भारतातून आलेल्या होत्याच. त्या पार्टीनिमित्त त्यांची भेट घालून दिली गेली. ते दोघेही एकमेकांशी बोलले. तोपर्यंत बॉलीवूड आणि माधुरीजींचं स्टार असणं हे श्रीरामजींना एवढं माहित न्हवतं. पार्टी संपली. पण नेनेजी त्यांच्या साध्या स्वभावामुळे माधुरीजींच्या लक्षात राहिले. मग माधुरीजींच्या भावाने दुसऱ्या दिवशी पुन्हा पार्टीचा आणि त्याअनुषंगाने डॉक्टरांचा विषय काढला. एव्हाना, माधुरीजींना लक्षात आलं होतंच कि गाडी कुठे चालली आहे. पण इतर वेळेसारखं त्यांनी थेट नकार दिला नाही. स्वतःसाठी थोडा वेळ घेतला. आणि पुढे आपला होकार कळवला. यथासांग या गोड कपलचं लग्न झालं.

पुढे श्रीरामजींबरोबर मधुरीजी अमेरिकेत स्थायिक झाल्या. मुलं झाली. ती लहान असताना त्याचं संगोपन व्यवस्थित व्हावं म्हणून त्यांनी थोडा ब्रेक घेतला होता. पण पुन्हा त्यांनी कमबॅक केलं ते आजतागायत. आज हे चौकोनी कुटुंब पुन्हा भारतात आलंय आणि चांगलंच रुळलय. डॉ. नेने जे आधी भारताबाहेर राहिले होते त्यांना भारताच्या कानाकोपऱ्यात जाताना खूप मजा येतेय. भारत मनापासून आवडला आहे त्यांना. मधुरीजीसुद्धा पुन्हा आपल्या कामात पूर्वीसारख्या व्यस्त झाल्या आहेत. आणि आनंदाची बाब म्हणजे यावेळेस हिंदी बरोबर मराठी सिनेमांमध्ये सुद्धा त्या झळकल्या आहेत. बकेट लिस्ट हे त्याचं उत्तम उदाहरण. तर अशी हि गोड जोडी भारतातलं आपलं आयुष्य असंच आनंदात घालवू दे आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना मराठी गप्पा टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.