सध्या झी मराठी वाहिनीवरील देवमाणूस हि मालिका खूपच चर्चेत आहे. मालिकेतील कलाकार आणि मालिकेत येणारे रोज नवीन नवीन वळण ह्यामुळे हि मालिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरत आहे. त्यात आता डॉक्टरच्या करणामांची माहिती इन्स्पेक्टर दिव्या सिंगला झाल्यामुळे मालिकेत अजूनच रंगत वाढली आहे. त्यामुळे दिव्या सिंग डॉक्टरला केव्हा एकदाचे तुरुंगात टाकते ह्याची इतके दिवस प्रेक्षक वाट पाहत होते. आणि शेवटी तो क्षण सुद्धा आला. इन्स्पेक्टर दिव्या सिंगने डॉक्टला भर चौकात सर्वांसमोर धुलाई करत करत मग तुरुंगात डांबले. जेव्हा हा सिन टीव्हीवर दाखवला गेला तेव्हा सर्वांच्याच पसंतीस उतरला. सोशल मीडियावर देखील ह्या सिन वर लोकांनी चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आणि आपली पसंती दर्शवली. तसेच ह्या सीनमुळे मालिकेचा टीआरपी देखील खूपच वाढला. त्यामुळे देवमाणूस हि मालिका सध्या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांमध्ये अव्वल स्थानी आहे.
तर हा लोकप्रिय ठरलेला सिन पडद्यामागे कसा साकारला गेला हे आम्ही तुम्हांला दाखवणार आहोत. झी मराठीने ह्या सिन मागचा मेकिंगचा व्हिडीओ सोशल मीडिया अपलोड केला आहे. तर ह्या मेकिंग मध्ये मालिकेतील डॉ. अजित कुमार ह्यांची थोडक्यात मुलखत देखील घेतली गेली आहे. मुलाखत घेत असते वेळी त्यांचे शूटिंगच्या अगोदर मेकअप, मेकओव्हरसुद्धा एकाच वेळी चालू आहे. डॉक्टरच्या जवळ ३ मेकओव्हर आर्टिस्ट दिसत आहेत. एक त्यांचे कपडे फाडत आहे ज्यामुळे त्यांना खूप मारलं आहे, असं दिसून येईल. तर एकजण डॉक्टरच्या चेहऱ्यावर आणि मानेजवळ स्प्रे मारत आहे, जेणेकरून डॉक्टरला मार लागल्यामुळे चेहरा काळवंडलेला दिसेल. सोबत अजूनही मदतीला आहेत. मेकओव्हर करत असतानाच डॉक्टर मुलाखतीत सांगत आहेत कि प्रेक्षकांना फक्त आम्ही कलाकाराच दिसत असतो. परंतु एखादा सिन चांगला होण्यासाठी पडद्यामागील हि सगळी मंडळी देखील मेहनत घेत असते. त्यांच्यामुळे प्रत्येक सिन चांगला होत आहे. ते सर्व काळजी घेत आहेत.
त्याचसोबत डॉक्टर मजेशीरपणे सांगतात कि देवमाणूस सीरिअलसाठी स’र्वांनी र’क्त सांडले. सीरिअलमध्ये अगोदर ज्यांना मारले त्यांनी र’क्त वाहिले आता आम्हीही र’क्त वाहतो आहे. पुढे व्हिडीओमध्ये दिव्या सिंग डॉक्टरच्या डोक्यावर पाय देऊन उभी असल्याचा सिन शूट होत आहे. त्याअगोदर दिग्दर्शक स्वतः दाखवत आहेत कि हा सिन कश्याप्रकारे करायचा आहे ते. ते स्वतः त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवतात. त्यानंतर डॉक्टरला कश्याप्रकारे दिव्याने पट्ट्याने मारलं आहे हे दाखवलं आहे. बाजूलाच गावातील मंडळी डॉक्टरच्या सपोर्टला कश्याप्रकारे येतात हे हि दिसत आहे. जेव्हा डॉक्टरचा कुर्ता मेकओव्हर आर्टिस्टनी फाडल्यानंतर आतली पण बनियान फाडावी लागेल असे सांगितल्यावर डॉक्टरने बनियान फाडू नका असे सांगितले. अश्याप्रकारे हा सगळा सिन शूट झाला. आणि ह्या सिन मागील पडद्यामागची मज्जा तुम्ही ह्या व्हिडीओ मध्ये पाहू शकता. आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तसेच आपल्या मराठी गप्पाच्या यु’ट्युब चॅने’लला सबस्क्रा’ईब करायला विसरू नका.
बघा व्हिडीओ (व्हिडीओ सौजन्य – झी मराठी) :