Breaking News
Home / ठळक बातम्या / अश्याप्रकारे सावधगिरीने वाचवले पोलिसांनी आ’त्म’ह’त्या करणाऱ्या महिलेचे प्रा’ण, बघा हा व्हिडीओ

अश्याप्रकारे सावधगिरीने वाचवले पोलिसांनी आ’त्म’ह’त्या करणाऱ्या महिलेचे प्रा’ण, बघा हा व्हिडीओ

आपल्या आजूबाजूस अनेक घटना घडत असतात. त्यात अनेक वेळेस अतर्क्य घटनांना कधी कधी सामोरं जावं लागू शकतं. त्यात पोलीस म्हणून कार्यरत राहणं असेल म्हणजे आयुष्यात अगदीच अनिश्चितता ठरलेली. कामाच्या वेळा अनिश्चित, त्यात सामोरं जावं लागणारे प्रसंग अनिश्चित आणि या सगळ्यात डोकं शांत ठेऊन काम करण्याची जबाबदारी. त्यामुळे आपल्या पोलीस दलावर असणाऱ्या ताणाचा आपण केवळ विचारच करू शकतो. यात एखाद्या तणावाखाली असणाऱ्या व्यक्तीला समाजवयाची वेळ आली असेल तर? त्यात ती व्यक्ती आ’त्मह’त्या करण्याच्या पवित्र्यात असेल तर? तणावाची परिसीमा गाठली जाणारच ना. अशीच परिस्थिती नवी मुंबईतील एका इमारतीत उद्भवली होती. पण या परिस्थितीतही पोलिसांनी शांत डोक्याने आणि हुशारीने बजावलेली कामगिरी कौतुकास्पद ठरते.

याचा एक व्हिडियो आमच्या टीमच्या हाती सापडला आणि त्यावर लेख लिहावं असं ठरलं. या व्हिडियो मध्ये एक मध्यमवयीन स्त्री एका इमारतीच्या गच्चीवरील पाण्याच्या टाकीवर उभी असलेली दिसते. तर गच्चीवर पोलीस कर्मचारी आणि इतर बघे असावेत. टाकीवर उभी असलेली महिला ही गोंधळलेल्या आणि तणावाच्या परिस्थितीत आहे, हे तिच्या वागण्यावरून कळतं. तणावाखाली असणाऱ्या त्या महिलेशी बोलण्याचा प्रयत्न खाली उभे असलेले पोलीस कर्मचारी करताना दिसतात. पण ती महिला काही प्रतिक्रिया देत नाही. तेवढ्यात ती महिला पाठीमागे वळून उभी राहते आणि एक पोलीस कर्मचारी त्या पाण्याच्या टाकीवर जाण्याचा प्रयत्न करतो. पण तेवढ्यात मागे फिरून ती महिला उडी मारेल, अशी हालचाल करते. त्यामुळे तो पोलीस कर्मचारी पाठी येतो. मग खाली उभी असलेली स्त्री पोलीस कर्मचारी पुढे येते. त्या स्त्रीशी बोलणं चालू ठेवत ठेवत ती वर जाण्याचा प्रयत्न करताना दिसते. स्त्री असल्यामुळे तिला पुढे जायला मिळेल, असं बघणाऱ्याला वाटत राहतं. मग काही बोलणं होऊन त्या दोघी गच्चीवर येतील असं वाटत राहतं. पण परिस्थिती एवढी गंभीर असताना, पोलिसांच्या डोक्यात वेगळी योजना चालु असते, जी काही सेकंदात कळते. या दोघी काही बोलत असताना पाठून दोन पोलीस कर्मचारी येतात आणि त्या स्त्री ला पकडतात.

त्या स्त्रीने घाईघाईत पटकन काही अनुचित प्रकार करू नये म्हणून दोरी दिली जाते. तसेच तिला कोणीही मा’रणार नसल्याचं आश्वासन देण्यात येतं आणि काही काळात हा व्हिडीओ संपतो. एकूणच काय तर एखाद्या सिनेमात, मालिकेत दाखवला जाणारा थरार खऱ्या आयुष्यात घडल्यास काय होईल याची कल्पनाच आपल्याला येते. पण सुदैवाने पोलीस कर्मचारी सुसज्ज आणि कल्पक असल्याने अनर्थ टळतो. त्यात जराही चूक झाली असता काय झालं असतं याची कल्पनाही न केलेली बरी. पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवलेली समयसूचकता आणि त्यामुळे वाचलेले त्या स्त्रीचे प्राण यासाठी पोलिसांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. मराठी गप्पाच्या टीमकडून मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांना मानाचा मुजरा !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.