Breaking News
Home / मनोरंजन / अश्या महिलांपासून सावधान, तुमच्यासोबत सुद्धा असं घडू शकतं, बघा एकदा हा व्हिडीओ

अश्या महिलांपासून सावधान, तुमच्यासोबत सुद्धा असं घडू शकतं, बघा एकदा हा व्हिडीओ

आमची टीम असे काही भन्नाट व्हिडियोज शोधून काढते की विचारता सोय नाही. काल त्यांनी शोधून काढलेला व्हिडियो तर अगदी भन्नाट आहे. तुम्ही कधी एखाद्या चो’राला चो’री करताना पाहिलं आहे का? बहुतांश उत्तर नाही असेल. काही जणांना मग यावर काही पाश्चिमात्य टीव्ही शोज ची आठवण होईल ज्यावर अशा चोऱ्या सी.सी.टी. व्ही. फुटेजच्या माध्यमातून दाखवतात. आमच्या टीमच्या हाती सुद्धा असाच एक वायरल व्हिडियो लागला आहे ज्यामुळे या आठवणी ताज्या होतील. हा व्हिडियो म्हणजे एका किराणा दुकानातील सी.सी.टी.व्ही. फुटेज आहे. या फुटेज मध्ये एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या पिशवीतील पाकीट लंपास करताना आपल्याला दिसून येते. व्हिडियो सुरू होतो तेव्हा एक जोडपं या दुकानाच्या काउंटरवर उभं असतं. आजूबाजूला काही इतर गिऱ्हाईकंही असतात. तेवढ्यात एक महिला येते आणि या जोडप्यापैकी असलेल्या महिलेस अगदी खेटून उभी राहते.

तिच्या अश्या वागण्याने पहिली महिला काहीशी अस्वस्थ झालेली दिसून येते, त्यामुळे ती सावरून उभी राहते. ही दुसरी महिला मग दुकानदाराकडे एका गोष्टीची मागणी करते. पण तिचं खेटून उभं राहणं पहिल्या माहिलेस आणि आपल्यालाही खटकतं. बरं यात तिचं लक्ष सतत पहिल्या महिलेच्या पर्सकडे असतं. तेवढ्यात दुकानदार तिला हवी असलेली वस्तू घेऊन येतो आणि अचानकपणे तिच्या हातात एक पाकीट आलेलं आपल्याला दिसतं. या पाकिटातून ती काही पै’से काढून देते आणि चालू पडते. या दरम्यान हे सी.सी. टी. व्ही. फुटेज बघणाऱ्यांचं बोलणं आपण ऐकत असतो. त्यामुळे आपण पुन्हा एकदा हा व्हिडियो पाहतो. पण यावेळी अगदी काळजीपूर्वक पाहतो. तेव्हा खरी हातचलाखी लक्षात येते. चो’री करणारी ही महिला येतानाच थेट पहिल्या महिलेच्या मोठ्या पर्सची चैन उघडते. पण मानवी स्वभावाप्रमाणे पहिल्या महिलेचं लक्ष या दुसऱ्या महिलेच्या चेहऱ्याकडे असतं. पण खरं काम तर हातांनी होत असतं. म्हणजेच काय तर ज्याचे पाकिट लंपास करावयाचे त्याचे लक्ष विचलित करणे या गोष्टीचा उपयोग होताना दिसतो.

एकदा का मोठी पर्स ओपन झाली की त्यातून पै’शांची छोटी पर्स काढणं सोप्पं होऊन जातं. एवढंच नव्हे तर ती पर्स काढल्यावर पहिल्या महिलेच्या नजरेस पडणार नाही या पद्धतीने ही दुसरी महिला पकडते. त्यामुळे पर्स मधले पैसे देऊन ही महिला निघूनही जाते आणि बिचाऱ्या पहिल्या महिलेस कळतही नाही. एकूणच हा व्हिडियो आपल्याला काही क्षण विचलित करतो, पण जे शिकवायचं आहे ते शिकवूनही जातो. हे शिक्षण म्हणजे सदैव सतर्क राहणे आणि एखादी बाब अयोग्य वाटली तर आपल्याला त्यातून काही द’गा फटका तर नाही ना याची शहानिशा त्वरेने करणे.

या व्हिडियोवरील लेखाचा उद्देश आमच्या वाचकांनी सतर्क व्हावे हा आहे. आपल्या आजूबाजूला अशा चो’ऱ्या सतत घडत असतात. त्यामुळे आपण योग्य ती सावधानता बाळगावी. नाहीतर अश्या घटना आपल्याबाबतीतही घडू शकतात. ह्या व्हिडिओमागे चो’री करणे वा कशा पद्धतीने करणे यासारख्या गोष्टींना आमची टीम प्रोत्साहन देत नाही आणि यापुढेही प्रोत्साहन देणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. आपल्याला हा लेख आवडला असल्यास शेअर करा. तसेच आमच्या टीमने लिहिलेले अन्य लेखही नक्की वाचा आणि शेअर करा. आपल्याला पाठींब्यासाठी धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *