Breaking News
Home / मनोरंजन / अश्या महिलांपासून सावधान… काळा चष्मा घालून आलेल्या ह्या महिलेने ज्वेलरीच्या दुकानात काय करामत केली बघा

अश्या महिलांपासून सावधान… काळा चष्मा घालून आलेल्या ह्या महिलेने ज्वेलरीच्या दुकानात काय करामत केली बघा

उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने लाखो रुपयांचा नेकलेस चोरल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. तसेच तो इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओने लोकांना जबरदस्त धक्का दिला आहे. ही घटना 17 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील एका ज्वेलरी स्टोअरमध्ये घडली.

चोरी करणाऱ्याच्या चेहऱ्यावर तो चोर आहे असे काहीही लिहिलेले नसते, पण जेव्हा वास्तव समोर येते तेव्हा लोक नक्कीच चक्रावून जातात. चोरी करताना तो आपल्या बुद्धिमत्तेचा अतिशय हुशारीने वापर करतो, पण पूर्वीच्या तुलनेत आजच्या युगात चोरांना पकडणे थोडे शक्य झाले आहे. कारण ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये सहज पकडले जातात आणि त्यानंतर चोरट्याचा लवकरात लवकर शोध घेतला जातो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावरही समोर आला आहे, ज्याने सगळ्यांच्याच होश उडाल्या आहेत. हे प्रकरण उत्तर प्रदेशची राजधानी लखनौशी संबंधित आहे, जिथे एका महिलेने अश्याच एका चोरीच्या घटनेची पुनरावृत्ती केली आहे.

काळा चष्मा घातलेल्या महिलेने लोकांचे होश उडवले आहे. समीर अब्बास नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये एका महिलेचा अंदाजे 10 लाख रुपये किमतीचा सोन्याचा हार चोरल्याचे फुटेज समोर आले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हजारो आणि लाखो वापरकर्ते आश्चर्यचकित झाले. गडद काळा चष्मा घालून ज्वेलर्सच्या दुकानात आलेल्या महिलेवर कुणालाही संशय आला नाही आणि नंतर तिने साडीत लपवून एक हार चोरी केला आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे ही धक्कादायक घटना दुकानदारासमोरच महिलेने केली आहे. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात साडी नेसलेली वृद्ध महिला दागिने लपवताना कैद झाली आहे आणि ही घटना 17 नोव्हेंबर रोजी घडली असल्याचे कळत आहे.

10 लाखांचा हार क्षणात झाला दृष्टीआड…
युपीच्या लखनऊ येतील एका शोरूममध्ये ही महिला अस्सल ग्राहक असल्याची बतावणी करून घुसली. इतर ग्राहकांप्रमाणे तीही आत जाते आणि दुकानाच्या काउंटरसमोर बसते. लवकरच, विक्रेता तिला मागणीनुसार नेकलेस दाखवू लागतो. त्यांनतर दागिने बघत असतानाच ती एक हार तिच्या साडीखाली लपवते आणि सोन्याचे हार न आवडल्याचे नाटक करत तिथून निघून जाते.

शोरूममधील व्यस्त दुकानदारांना चोरी करणाऱ्या महिलेवर संशय आला नाही. गहाळ झालेल्या दागिन्यांची पेटी कर्मचाऱ्यांच्या लक्षातही आली नाही आणि ती महिला पळून जाण्यात सहज यशस्वी झाली होती.

ज्यावेळी शोरुम मधील कर्मचाऱ्यांनी स्टॉक तपासला त्यावेळी स्टॉक पाहून 1 नेकलेस गायब असलेला पाहून शोरूममध्ये एकच खळबळ उडाली. सुरुवातीला दुकानमालकाला कर्मचाऱ्यांवरच संशय आला, मात्र शोरूममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीची झडती घेतली असता, हे दृश्य पाहून सर्वजण चक्रावून गेले. ही संपूर्ण घटना शोरूममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, नेकलेस सेटची किंमत सुमारे 7 लाख रुपये होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बलदेव येथील बेचू लाल सराफा प्रायव्हेट लिमिटेड ज्वेलरी शॉपमध्ये 17 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. पोलिसांना अद्याप चोरट्याची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला आहे.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *